Saturday, December 10, 2022

 *🏵️🍃प्रत्येक व्यक्तिने कर्म कसे असावे ? व त्याचे फलस्वरूप काय? जरूर वाचा🍃🌻🌹🙏*


 *🌺देव कधीच नशीब लिहित नाही, आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर आपले विचार, आपला व्यवहार, आपली कर्मच आपले नशीब लिहितात. नीती व नियत योग्य असेल तर नशीब कधीच वाईट नसते...!!!*

*🌺समोरची व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवते, हिच आपल्या जीवनातील सर्वात मोठी सफलता आहे...!!!*

 *🌺दु:ख भोगणारी व्यक्ती, आयुष्यात पुढे जाऊन कदाचित सुखी होऊ शकेल, पण दुःख देणारी व्यक्ती आयुष्यात पुढे जाऊन कधीही सुखी होत नाही...!!!*

 *🌺माणुसकी मनात असते, परिस्थिती मध्ये नाही. परमेश्वर मात्र कर्मच पाहतो, मृत्यू पत्र नाही. तुम्ही कितीही मोठे बुद्धिबळातील खेळाडू असाल, पण सरळ व्यक्ती सोबत केलेले कपट तुमच्या वाईटाचे सर्व दरवाजे खुले करते...!!!*

*🌺जीव गेल्यानंतर शरीर स्मशानात जळते आणि नाते संबंधातील प्रेम गेल्या नंतर माणूस मात्र अंतर मनातुन जळत राहतों...!!!*

*🌺जीवनातील स्वार्थ पूर्ण झाल्यानंतर आणि शरीरातील श्वास निघून गेल्यावर, कुणीही कुणाचीच वाट बघत नाही...!!!*

*🌺जे पाहिजे ते मिळवूनच थांबायचे, ही कदाचित सफल माणसाची निशाणी असेल, पण जे मिळाले ते हसतमुखाने स्वीकारून जगणे ही सुखी माणसाची निशाणी आहे...!!!*
 
*🌺ईश्वर जेव्हा देतो तेव्हा चांगलेच देतो आणि देत नाही, तेव्हा अधिक चांगले मिळवण्याचा मार्ग दाखवतो. पण जेव्हा प्रतीक्षा करायला लावतो तेव्हा तो सर्वात उत्तम, सर्वोत्तम फळच... देतो...!!!*
  
*🌺हे आपले चरण फक्त मंदिरा पर्यंतच घेऊन जाऊ शकतात. परंतु चांगले ईश्वर आचरण तर परमात्म्या पर्यंत घेऊन जाते...!!!*

*🌺सर्वप्रथम आपण व आपल्या कुटुंबाच्या जीवनाची व आरोग्याची काळजी घ्या. सरकारी सुचनांचे, नियमांचे व कायद्याचे पालन करा...!!!*

*🌺एकमेकांना अडचणीत आणु नका, त्यापेक्षा मदत करा, जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा, नकोत्या उठाठेवी करू नका...!!!*

 *🌺खोट्या राजकारणी लोकांपासुन दूर रहा, अफवानवर विश्वास ठेवण्या आधी खात्री करा, नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा. नेहमी सावध रहा, सुरक्षित रहा व सतर्क रहा...!!!*

*🌺"प्रत्येकाचे जीवन, आयुष्य फार सुंदर आहे ते आनंदात जगा व दुसऱ्यांलाही आनंदी जगु द्या. स्वार्थ व अहंकार कधीही मनात ठेऊन वागू नका, वाईट व कठीण प्रसंगाची वेळ कधी कुणावर येईल हे सांगून शकत नाही हे लक्षात ठेवा"...!!!*🙏

🌹🌺🙏🌹🌺🙏🌹🌺🙏🌹

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...