Saturday, December 10, 2022

आपुलकी - सुविचार

 🌅  आपुलकी - सुविचार "*


_*1) ज्या वेळी आपण इतरांमध्ये चांगले पाहण्याचा प्रयत्न करतो त्या वेळी नकळतच आपल्यामध्येही चांगले पाहण्याची ती सुरुवात असते.*_

_*2) "प्रतिष्ठित" व्यक्तिपेक्षा "चारित्र्यसंपन्न" व्यक्ती हा कधीही सरसच ठरतो, कारण "चारित्र्य" हे मूलभूत संस्काराने उपजत मिळालेले असते तर "प्रतिष्ठा" ही इतरांनी त्यांच्या गरजेपोटी बहाल केलेली असते.*_

_*3) सुंदर दिसणं आणि पैसा असणं ह्या दोन गोष्टी मनुष्याला खूप गर्विष्ठ बनवतात..!*_

_*4) जगातील कोणतीही वस्तू कितीही महागडी का असेना... परंतु देवाने तुम्हाला जी झोप, शांती आणि आनंद दिला आहे त्यापेक्षा कोणतीच गोष्ट मौल्यवान नक्कीच नाही.*_

_*5) कोणत्याही कामाची चांगली तयारी केल्याशिवाय त्या कामाला आरंभ न करणे आणि सुरु केलेले काम पूर्ण करूनच हातावेगळे करणे हे बुद्धीचे चांगले लक्षण आहे.*_

_*6) अडचणीच्या वेळी सर्वात चांगला आधार म्हणजे तुमचा स्वतःवरचा विश्वास... जो तुमच्या कानात हळूच सांगत असतो सर्व चांगलं होईल.*_

_*7) प्रेम व आनंद देणार्‍या व्यक्ती आपल्या सहवासात असणे ही निसर्गाची एक देणगी असते; आणि अशा व्यक्ती लाभणे हे आपल्याच सुस्वभावाची अनमोल मिळकत असते.*_

_*8) कधी कधी शांत राहणे खुप गरजेचे असते. आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नांची उत्तरे मागायची नसतात. कारण आपण ओंजळीत पाणी पकडू शकतो परंतू टिकवून ठेऊ शकत नाही.*_

_*9) ओठात आणि पोटात एकच असेल तर कशाचीच भीती रहात नाही, अन् तोंड लपवून दूर पळण्याची वेळ सुद्धा मग कोणावर येत नाही.*_

_*10) एकट्या सुईचा स्वभाव टोचणारा असतो.. पण धागा सोबतीला आला कि हाच स्वभाव बदलून एक दुसऱ्यांना जोडणारा बनतो.*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
    *❝ आपुलकीच्या माणसासाठी ❞*
     
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...