










*
।।श्री स्वामी समर्थ।। 
*

।।श्री स्वामी समर्थ।। 
* *
तुलसी विवाह कथा.
*
तुलसी विवाह कथा.
* *(कार्तिक शु. ११ ते कार्तिक शु. १५)*
*आपली संस्कृती मानवतेवर, स्रुष्टीवर प्रेम करणारी आहे. चराचर सोयरे व्हावेत, अशी अपेक्षा ज्ञानदेवांनी व्यक्त केली आहे. वनस्पतीप्रेम हा त्यातील एक भाग. तुळस ही एक अत्यंत उपयुक्त वनस्पती आहे. हिंदु स्त्रियांना तुळशीच्या पूजेचे महत्व फार वाटते. तुळस आरोग्यदायक औषधी वनस्पती आहे. दारात तुलसी वृंदावन असणे, ही हिंदू घर असल्याची महत्वाची खूण मानली जाते. अनेकजण तुलसी विवाह हा सण दिवाळीचाच एक भाग समजून तितक्याच उत्साहाने साजरा करतात.*
*कार्तिक शु. एकादशीपासुन ते कार्तिक शु. पौर्णिमेपर्यंत तुलसी विवाह करतात. या वेळेस विवाहातील सर्व विधी वाड़:निश्चयापासून, लज्जाहोम, सप्तपदी वगैरे सारे सोपस्कार करावेत. तुलसीविवाहामुळे घरातील मुला- मुलींचे अडलेले विवाह लवकर होतात, असे अनुभवातून आढळले आहे.*
*तुळस ही बहुगुणी व अत्यंत प्रभावी औषधी वनस्पती आहे, म्हणून तिचे नाते पितरांशी, देवांशी, मानवाशी जोडून दिले आहे. तुळस भगवान विष्णुंना अत्यंत प्रिय आहे. तुळशी शिवाय दररोजची पूजा पूर्ण होत नाही. तुळशीला प्रदक्षिणा घातल्यास स्त्रियांच्या विवाह मनोकामना पूर्णहोतात. मृत व्यक्तिच्या मुखात गंगाजलाप्रमाणे तुळशीचे पान ठेवण्यात येते. तुळशीला मानवी जीवनात महत्वाचे स्थान आहे.*
*भगवान श्रीकृष्णांची "तुला" करतांना एका पारड्यात भगवान श्रीकृष्ण व दुसऱ्या पारड्यात त्यांच्या वजनाचे दागिने, मुद्रा त्यांच्या सर्व पत्नींनी घातले, तरीही तुला पूर्ण होत नव्हती. त्यावेळेस हत्यभामेने तुळशीचे एक पान त्यावर ठेवले. त्याबरोबर अलंकाराचे पारडे झटकन खाली आले. तुळशीच्या पवित्र व निष्काम प्रेमामुळे ती तुला पूर्ण होऊ शकली. तेव्हा आशीर्वाद म्हणून भगवान विष्णूंनी तिला पत्नी स्वरूपात मान दिला, व "प्रत्येक वर्षी आधी माझा विवाह तुळशीशी होईल, व त्यानंतर इच्छित इतर वधु- वरांचे विवाह होतील !" असा आशीर्वाद दिला, त्याप्रमाणे आजपर्यंत ही प्रथा सुरू आहे.*











No comments:
Post a Comment