*कोणत्याही गोष्टींचे आकर्षण असावे,*
*परंतु ती भेटलीच पाहिजे,*
*अशी जिद्द नसावी.*
*चांगल्या गोष्टींचे आकर्षण असेल,*
*तर चांगले अनुभव येतील,*
*व वाईट गोष्टींचे आकर्षण असेल,*
*तर येणारे अनुभव,*
*जीवनात अडचणी निर्माण करू शकतात.*
*मात्र जीवनात चांगल्या गोष्टींचे,*
*आकर्षण जगण्यासाठी,*
*नवी दिशा देतात.*
*कुणाच्या सांगण्यावरुन,*
*आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत,*
*चांगले वा वाईट मत बनवण्यापेक्षा,*
*आपण स्वतः चार पावले चालुन,*
*समोरासमोर त्या व्यक्तीशी,*
*संवाद साधुन मगच खात्री करा.*
*नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे.*
*कधी कधी जीवनात,*
*इतकं बेधुंद व्हावं लागतं.*
*दु:खाचे काटे टोचतांनाही,*
*खळखळून हसावं लागतं.*
*जीवन यालाच म्हणायचं असतं.*
*दुःख असूनही दाखवायचं नसतं.*
*पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत,*
*आणखी हसायचं असतं...!!*



*जीवनात...*
*अनेक समस्या निर्माण होतात,*
*व त्या समस्या चिघळत जातात,*
*याचे प्रमुख कारण म्हणजे,*
*माणसे Prestige Issue करतात;*
*म्हणजेच प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण करतात.*
*प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या लोकांना,*
*अगदी मनापासून वाटत असते की,*
*असा प्रश्न निर्माण करून,*
*तो तसाच तडीस नेण्यात,*
*फार मोठा पुरुषार्थ असून,*
*आपण स्वाभिमानी आहोत,*
*हे लोकांना दाखवून देण्याचा तोच एकमेव मार्ग आहे.*
*वास्तविक,*
*प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण करण्यात माणसाचा अहंकार पुरेपूर भरलेला असतो.*
*सामान्यपणे बहुतेक लोक,*
*मग ते अशिक्षित असोत किंवा सुशिक्षित असोत,*
*जीवनाच्या अनेक क्षेत्रांत प्रत्यही प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण करताना आढळतात,*
*व केवळ त्यामुळेच जीवनाच्या सर्व क्षेत्रांत तंटे-बखेडे,खून-मारामाऱ्या,*
*युद्ध-लढाया होत असताना आढळतात.*
*केवळ प्रतिष्ठेचा प्रश्न केल्यामुळेच,*
*वैयक्तिक व कौटुंबिक जीवन,*
*त्याचप्रमाणे सामाजिक,राष्ट्रीय व वैश्विक जीवन,*
*संघर्षाचे व दुःखाचे होत असते.*
*वास्तविक,प्रतिष्ठेचा प्रश्न करण्यात मोठा पुरुषार्थ नसून,*
*त्यात फार मोठा अनर्थ भरलेला असतो.*
*अज्ञानाला आलेला आकार म्हणजे,*
*अहंकार...*
*हे सत्य लक्षात घेतले म्हणजे,*
*प्रतिष्ठेचा प्रश्न करण्यात माणसे केवळ अज्ञानाचेच प्रदर्शन करीत असतात.*
*अज्ञान जितके अधिक तितका अहंकार मोठा,*
*व अहंकार जितका मोठा तितका प्रतिष्ठेचा प्रश्न बिकट होऊन बसतो.*
*याच्या उलट सामंजस्य वृत्तीची धारणा केल्याने,*
*माणसाच्या जीवनात समस्या निर्माण होत नाहीत,*
*किंवा जर समस्या निर्माण झाल्याच,*
*तर त्या सुटायला वेळ लागत नाही.*
*ज्ञानातून शहाणपण निर्माण होते,*
*व शहाणपणातून सामंजस्य वृत्ती उदयाला येते.*
*सामंजस्य वृत्तीचा स्वीकार करणारी माणसे,*
*जीवनात शहाणपणाचे म्हणजे,*
*ज्ञानाचे दर्शन घडवीत असतात.*
*थोडक्यात,प्रतिष्ठेचा प्रश्न करणारी माणसे खोटी असतात,*
*तर सामंजस्य वृत्तीची माणसे मोठी असतात,*
*हे त्रिकालाबाधित सत्य...*
*सर्वांनी लक्षात ठेवणे,*
*अतिशय आवश्यक आहे...!!*



*मन म्हणजे काय हो.?*
*त्याला कोणी पाहिलं नाही,*
*कसं असते ते माहीत नाही,*
*पण त्याला खूप मान्सनमान असतो.*
*कधी ते लिक्विड असतं,*
*"मन भरलं नाही"*
*असं म्हणतो आपण,*
*कधी ते सॉलिड असतं,*
*मनावर खूप ओझं आहे,*
*कधी ते घर होतं,*
*मेरे मन में रहने वाली,*
*कधी ते तहानलेल असतं,*
*मेरा मन तेरा प्यासा,*
*कोणी त्याला मोरा ची उपमा देतं,*
*मन मोराचा कसा पिसारा फुलला !!*
*असं हे मन आयुष्य भर,*
*आपल्याला झूलवत ठेवतं,*
*कधी स्वतःच्या मनाने तर,*
*कधी दुसऱ्याच्या मनाप्रमाणे,*
*आपण वागत असतो,*
*हे "मन" कधीच स्थिर का बरं नसतं.?*
*ते कधी प्रेयसीच्या तोंडातून,*
*मंदिर रूप धारण करतं,*
*आणि ती म्हणते...*
*"मन में तुझे बिठाके,*
*काही जण असतात की,*
*त्याच्या "मनात"काही रहात नाही,*
*तर काही "मन कवडे" असतात.*
*मन दिसत तर नाही.*
*पण त्याने ठरवले तर ते हरवून टाकतं.*
*तर कधी शक्ती नसताना जिंकून ही देतं.*
*मनात आणलं तर काहीही होऊ शकतं,*
*जरी त्याला कोणी पाहिलेले नाही,*
*तरी ते जर चांगलं असलं,*
*तर आपण आनंदी राहतो.*
*दुसऱ्याचं भलं करतो म्हणुन,*
*म्हंटलं जातं, "मन चंगा तो...*
*कधी हे खूप डेंजर असतं,*
*स्वतःकडे राग तिरस्कार साठवून ठेवतं,*
*आणि "मनातील" राग दुसऱ्याचे नुकसान करतं.*
*याचा वेग मोजण्याचं यंत्र अजून,*
*अस्तित्वात आलेलं नाही,*
*तरी लोकं म्हणतात,*
*"मनाचा ब्रेक,उत्तम ब्रेक,*
*"मन" दिसत नसलं तरी,*
*तेच आपणाला घेऊन फिरत असतं,*
*कधी घरी,कधी डोंगरदऱ्यांत,*
*कधी आकाशात,*
*पण ते निर्मळ असतं,*
*पारदर्शक असतं.*
*म्हणुन च आपण म्हणू शकतो.*
*"मोरा मन दर्पण कहलाये."*
*अशा या न दिसणाऱ्या,*
*पण सर्वस्व असणाऱ्या,*
*"मनाला" काबूत ठेवण्याचा,*
*अनेकजण प्रयत्न करतात.*
*पण "मनाप्रमाणे" जगता आलं नाही,*
*तर त्याला काही अर्थ आहे का.?*
*मग "मनसोक्त" जगा ! !*
*आणि त्यासाठी...*
*मनापासून शुभेच्छा...!!* *आपला दिवस आनंदात जावो!!*



*माणूस हा...*
*विचार करणारा प्राणी आहे.*
*जीवन जगत असताना,*
*त्याच्या मनात असंख्य विचार येतात व जातात.*
*सर्वसाधारण माणसाला आपल्या मनामध्ये असंख्य विचार येतात,*
*आणि जातात याचाच पत्ता नसतो.*
*यातील बहुतेक विचार अनिष्ट स्वरूपाचे असतात.*
*हे अनिष्ट स्वरूपाचे विचार माणसाच्या जीवनात अरिष्ट निर्माण करतात.*
*सर्वांत कळस म्हणजे आपण अनिष्ट विचार करतो,*
*याबद्दल तर तो पूर्ण अनभिज्ञ असतो.*
*परिणामी,जसे विचार तसा जीवनाला आकार,*
*किंवा "As you think so you become"*
*या निसर्गनियमाप्रमाणे माणसाला सर्व प्रकारच्या अनिष्ट प्रसंगांना सामोरे जावे लागते.*
*कळत किंवा नकळत विष घेतले,*
*तरी त्याचा अनिष्ट परिणाम होतोच.*
*त्याचप्रमाणे कळत किंवा नकळत,*
*अनिष्ट विचार केल्याने,*
*माणसाला अनिष्ट परिणाम भोगावे लागतात.*
*Thoughts of jealousy, fear, worry and anxiety tear down and
destroy your nerves and glands bringing about mental and physical diseases of all kinds.*
*दुसरा मुद्दा असा की,*
*माणसाचे विचार करणारे मन,*
*घड्याळाच्या लंबकासारखे असते.*
*घड्याळाचा लंबक एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे,*
*व दुसऱ्या टोकाकडून परत पहिल्या टोकाकडे,*
*अशा पद्धतीने सतत हेलावत असतो.*
*अगदी त्याचप्रमाणे माणसाचे मन,*
*भूतकाळातून भविष्यकाळाकडे,*
*व भविष्यकाळाकडून परत भूतकाळाकडे,*
*अशा पद्धतीने सतत सातत्याने फिरत असते.*
*भूतकाळात घडून गेलेल्या अनिष्ट गोष्टींचे चिंतन,*
*व भविष्यात काय वाढून ठेवलेले आहे,*
*याची चिंता,अशा पद्धतीने माणूस चिंता व चिंतन करीत असतो.*
*कोळसा जितका उगाळावा,*
*तितका तो अधिकच काळा होत जातो.*
*त्याचप्रमाणे भूतकाळातील अनिष्ट गोष्टींचे चिंतन,*
*व भविष्याची चिंता,केल्यामुळे,*
*माणसाची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत,*
*व चिघळत जाते.*
*वर्तमान काळाच्या विटेवर मनाला स्थिर उभे करणे,*
*माणसाला जमतच नाही.*
*परंतु नित्य विश्वप्रार्थना केल्याने,*
*माणसाच्या मनात येणारे विचार,*
*कमी-कमी होऊ लागतात,*
*हळुहळू विश्वप्रार्थनेकडे मन ओढ घेऊ लागते,*
*प्रार्थनेची गोडी लागते,*
*आणि परिणामी माणसाचे मन,*
*विश्वप्रार्थनेत रमायला व रंगायला लागते.*
*नामस्मरणाच्या किंवा,*
*विश्वप्रार्थनेच्या बळावर माणसाला,*
*वर्तमानकाळाच्या विटेवर,*
*मनाला स्थिर उभे करण्याचे सामर्थ्य मिळते.*
*चालता-चालता माणूस मुक्कामाला पोहचतो,*
*त्याप्रमाणे विश्वप्रार्थना करता -करता,*
*साधक विश्वंभराचे चरणी विसावतो.*
*विश्वप्रार्थनेत रमलेले व रंगलेले माणसाचे मन,*
*रंगता-रंगता पांडुरंग स्वरूप होते.*
*या संदर्भात तुकाराम महाराज सांगतात.*
*कृष्ण गाता गीती ।*
*कृष्ण ध्याता चित्ती ।*
*तेची कृष्ण होती ।*
*कृष्ण ध्याने ।।*
*उन्मनीच्या सुखाआत ।*
*पांडुरंग भेटी देत ।।*
*विश्वप्रार्थना सतत करीत राहिल्यामुळे,*
*बहिर्मनाच्याद्वारे अंतर्मनाच्या संगणकाला,*
*सतत सुंदर विचारांचे feeding मिळाल्यामुळे,*
*अंतर्मनाचा पॅटर्न बदलतो.*
*विश्वप्रार्थनेच्या द्वारे शुभचिंतन घडत राहिल्यामुळे,*
*बहिर्मनाचे शुद्धिकरण होऊन,*
*अंतर्मनाचे उन्नयन होते,*
*परिणामी,अंतर्मनाचे रूपांतर दिव्य जाणीवेत होते.*
*Sublimation of the conscious mind results in elevation of the sub-conscious mind
which is eventually transformed into Divine consciousness.*
*दुसरा मुद्दा असा की,*
*नित्य विश्वप्रार्थना करता-करता,*
*साधकाला इतर लोकांबद्दल आपलेपणा वाटू लागतो,*
*सर्वांचे भले व्हावे कल्याण व्हावे,*
*असे त्याला अगदी मनापासून वाटू लागते.*
*थोडक्यात माणसाच्या जीवनात,*
*परिवर्तन घडवून आणण्याचे सामर्थ्य,*
*या विश्वप्रार्थनेतच आहे...!!*


.
No comments:
Post a Comment