Saturday, December 10, 2022

--बायको वाल्याकोळयाची--

 🌷 बायको वाल्याकोळयाची🌷


वाचायला जर विचित्र वाटतंय ना ? पण आज तिचीच गरज आहे.

 बायको कशी असावी ?
 बायको असावी तर, वाल्या कोळयाच्या बायको सारखी.....

   रामायण न वाचलेला किंवा टीव्हीवर रामायण न पाहिलेला, निदान रामायण या ग्रंथाचे नाव माहिती नसलेला माणूस, या भारतात तरी अपवादानेच असावा. रामायण, म्हटले की, आम्हां भारतीयांचा ऊर केवढा भरुन येतो.          
रामायण आपल्या संस्कृतीचा ठेवा असून रोजच्या जगण्यात, पावलो-पावली त्याचे दाखले दिले जातात...!

   'पुत्र असावा तर, प्रभुरामासारखा' !
 'पती असावा तर, मर्यादापुरूषोत्तम श्रीरामासारखा !', 
भाऊ असावा तर, लक्ष्मणासारखा !',
 'पत्नी असावी तर, सीतेसारखी !'
 'भक्ति व शक्ति असावी तर, ती हनुमंतासारखी'

*सहजच माझ्या मनात एका प्रश्नाने घर केले, बायको कशी असावी ?*

        मी तो प्रश्न आजपर्यंत बऱ्याच जणांना विचारला, खूप साऱ्या जणांनी त्याचे उत्तर त्यांना आवडणाऱ्या वेगवेगळ्या स्त्रियांचे दिले. अगदी रामायण महाभारतात असलेल्या आदर्श स्त्रिया ते अगदी आताच्या आघाडीवर असलेल्या अभिनेत्रीचे ! खरं तर या सर्व दाखल्यापूर्वी आणखी एक दाखला आवर्जून द्यायला हवा. 
तो म्हणजे,

*'बायको असावी तर वाल्या कोळ्याच्या बायकोसारखी !'*

  *कारण तीच खरी रामायणकर्त्याची 'कर्ती ' आहे !* हे दुर्लक्षीत सत्य कायमच दुर्लक्षीतच राहिले आहे.

  रामायणकर्त्या वाल्मिकी ऋषीच्या जडण-घडणी संबधी, अगदी जुजबी इतिहास सांगितला जातो.

  वाल्याकोळी वाटसरूंना जंगलात
अडवून, प्रसंगी त्यांचे मुडदे पाडून, त्यांची लूट करुन चरितार्थ चालवायचा. 
*एकदा नारदमुनींनाच वाल्याने अडवले. तेव्हा नारदमुनींनी त्याचे तिथल्या तिथे बौधिक घेतले !*

*'अरे मूर्खा हे पापकर्म कशासाठी करतोस ?' असे विचारल्यावर, 'माझ्या बायको-पोरांसाठी' !* 
   असं सांगितल्यावर, नारदमुनी त्याला म्हणतात...!
 *'जा तुझ्या बायकोला विचारुन ये, ते तुझ्या पापात सहभागी आहेत काय ?*
'तुम्ही इथेच थांबा, मी विचारुन येतो' असे म्हणत, वाल्या पळतच घरी येतो. दारावर धाडकन् लाथ मारुन घरात घुसतो. बायकोमुलं घाबरतात. 
*वाल्या बायकोला धमकाऊन विचारतो. 'बोल तू माझ्या पापात सहभागी आहेस की, नाही ?'*

   आता असा विचार करा ! *शेकडो माणसांचे मुडदे पाडलेला, खाद्यांवर लखलखती कुऱ्हाड घेतलेला, क्रुरकर्मा, दरोडेखोर नवरा असा संतापल्यावर, एक अशिक्षीत, अडाणी, परावलंबी स्री दुसरं काय उत्तर देणार ?*

*पण नाही. त्या तडफदार आदिमाया शक्तीने, क्षणाचाही विचार न करता, 'नाही, मी तुमच्या पापात सहभागी नाही !'* असे सडेतोडपणे सांगितले.

नंतर 

*तीच घटना वाल्या कोळ्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणारी ठरली......*

  गरीब-बापड्या बायकोच्या अनपेक्षीत तडफदार उत्तराने वाल्या कोळ्याचे डोळे खाडकन् उघडतात. 
*तो नारदमुनीची क्षमायाचना करतो. नारदमुनी त्याला दिक्षा देतात. तो तप करतो आणि दरोडेखोर वाल्या कोळ्याचा वाल्मिकीऋषी* होऊन *रामायण* हे महाकाव्य रचतो.....

   ही साधी-सरळ गोष्ट आपण वाचून सहज सोडून देतो. पण, एक साधी शंका कुणाच्याही मनात का येत नाही ! की, 
    *समजा, वाल्या कोळ्याच्या बायकोने, 'व्हयं..आम्ही आहोतच की, तुमच्या संग !' असं सर्वसाधारण, सोईचं उत्तर दिलं असतं तर ?*

     *नारदाचं काही खरं नव्हतंच पण, वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी होऊन, त्याने रामायण तरी कसे काय रचले असते ?*
 अशी रास्त शंका घेता येऊ शकते !

  *पापाचा पैसा कमावणाऱ्या पती -परमेश्वराला, उंबऱ्यातच अडवून ते पाप घरात घ्यायला, त्या पापात सहभागी व्हायला, आजच्या " "सुसंस्कृत भारतीय गृहिणी" नकार देतील तर, बोकाळलेला भ्रष्टाचार नक्कीच कमी होईल..!*

 फक्त त्यांनी *वाल्याच्या बायकोचा आदर्श मात्र अंगिकारला पाहिजे.*
          *असे घडल्यास भारत भ्रष्टाचारमुक्त होऊन जागतिक महासत्तेच्या दिशेने निश्चित वाटचाल करेल !*
       *पुन्हा एकदा आपल्या भारत 'भू' वर निश्चितच रामराज्य अवतरेल व अनेक वाल्या कोळ्याचे वाल्मिकी मुनींमध्ये रुपांतरीत झालेले पाहण्याचे भाग्य आपणांस लाभेल...यात शंकाच नाही...!!!*

हा लेख मला एका ग्रुप वर आला होता तो तसाच्या तसाच पुढे पाठवला आहे.

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...