*आयुष्यात संगतीला फार महत्त्व असते.*
*संगतीचा परिणाम विनासायास,*
*आणि बराचसा नकळत होत असतो.*
*संतसंगती लाभणे...*
*ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे.*
*ती पूर्वपुण्याईमुळेच लाभते.*
*ज्यांच्याशी आपण संगत करातो,*
*त्याचे गुणधर्म आपल्याला येऊन चिकटतात.*
*देहाच्या संगतीने सामान्य माणसाचेही गुणधर्म आपल्यात येतात,*
*तर संतसंगतीचा परिणाम,*
*किती होत असला पाहिजे ?*
*व्यसनी किंवा विषयी माणसाची संगत,*
*ही अशी तापदायक, घातक असते.*
*"सत्पुरूषाची संगत ही उत्तम,*
*लाभदायी ठरते.*
*संतसंगतीपासून 'सद्भावना',*
*आणि 'सद्विचार' प्राप्त होतात.*
*आपली वृत्ती अशी असावी की,*
*कुणाला आनंद पाहिजे असेल,*
*तर त्याने आपल्याकडे धाव घ्यावी.*
*इतर संपत्ती कितीही दिली तरी,*
*पुरी पडत नाही,*
*पण वृत्तीचा आनंद देऊन,*
*कधीच संपत नाही.*
*वृत्तीचे समाधान ही भगवंताच्या कृपेची खूण आहे.*
*मानवी जीवन हे अशाश्वत आहे.*
*या जीवनात आपले खरे पाठीराखे,*
*जीवलग जर कोणी असतील,*
*तर ते सद्गुरूच होय.*
*ईश्वरच होय.*
*कारण...*
*ते शाश्वत आहेत.*
*मानवी जीवनातील,*
*कोणत्याही प्रसंगातून 'सद्गुरू,*
*आणि प्रभुरामराय हेच माझे सखे सोबती आहेत,*
*याचा साक्षात्कार घडणे,*
*त्याची खात्री पटणे,*
*हे परमार्थाच्या वाटेवर,*
*गती घेण्यासारखेच आहे...!!*



No comments:
Post a Comment