कविता



*गृहिणी आहे हे सांगतांना*
*अजिबात लाजायचं नाही*
*" घर सांभाळणं " हे काम*
*वाटतं तेवढं सोप्पं नाही*
*ती घर सांभाळते म्हणून*
*बाकीचे relax असतात*
*आपापल्या क्षेत्रामध्ये*
*उत्कृष्ट काम करू शकतात*
*घराघरातली प्रसन्न गृहिणी*
*पायाचा दगड असते*
*घराण्याची सुंदर इमारत*
*तिच्यामुळेच उभी असते*
*घर सांभाळणाऱ्या गृहिणीला*
*कधीही कमी लेखू नये*
*नौकरी करत नाही म्हणून*
*कोणीच तिला टोकू नये*
*तिच्या कष्टाचं मोल लावल्यास*
*पगार देऊ शकणार का ?*
*इतके काबाड कष्ट आपण*
*कधी करू शकणार का ?*
*नौकरी करणाऱ्या स्त्रियांचं*
*निश्चितच कौतुक आहे*
*पण समजू नका गृहिणी मध्ये*
*काहीतरी कमी आहे*
*खरं सांगा गृहिणी सारखी*
*कोणती व्यक्ती उदार असते*
*घरातल्या सर्वांसाठी*
*जी फुकटात राबत असते*
*दर महिन्याला पगार मिळतो*
*म्हणून आपण नौकरी करतो*
*चोवीस तास राबणाऱ्या*
*गृहिणीला काय देतो ?*
*गृहिणीला पॅकेज देण्याची*
*तुमची माझी श्रीमंती नाही*
*डॉक्टर , इंजिनियर , बँकर पेक्षा*
*तिचा हुद्दा कमी नाही*
*मानधन नाही , सुट्टी नाही*
*तरीही हसमुख असते " ती "*
*घराचं घरपण टिकून असतं*
*जोपर्यंत असते " ती "*
*गृहिणी आहे हे सांगतांना*
*मान खाली घालू नका*
*बाकीच्यांनी तिच्या समोर*
*मुळीच चरचर बोलू नका*
*म्हणून म्हणतो गृहिणीचा*
*आदर आपण केला पाहिजे*
*अन्नपूर्णा , लक्ष्मीला*
*पहिला मान दिला पाहिजे*







खरं तर ती एक घरातली राणीच असते,,
No comments:
Post a Comment