*
*सुंदर बोधकथा*
*
*
एकदा एका व्यक्तीवर लक्ष्मी रुसली आणि जाता जाता त्याला म्हणाली.... आता माझ्या जागी तुझ्या घरात दारिद्र्य येणार अाहे. परंतु मी तुला एक वरदान मागण्याची संधी देत अाहे. तुझी इच्छा असेल ते माग.*
एकदा एका व्यक्तीवर लक्ष्मी रुसली आणि जाता जाता त्याला म्हणाली.... आता माझ्या जागी तुझ्या घरात दारिद्र्य येणार अाहे. परंतु मी तुला एक वरदान मागण्याची संधी देत अाहे. तुझी इच्छा असेल ते माग.**
माणूस खूप समजूतदार होता, तो म्हणाला जर दारिद्र्य येणारंच असेल तर त्याला कोणी थांबवू शकत नाही, बस्स फक्त त्याला म्हणावं माझ्या परिवारात एकमेकांत प्रेम आणि जिव्हाळा राहू दे.*
माणूस खूप समजूतदार होता, तो म्हणाला जर दारिद्र्य येणारंच असेल तर त्याला कोणी थांबवू शकत नाही, बस्स फक्त त्याला म्हणावं माझ्या परिवारात एकमेकांत प्रेम आणि जिव्हाळा राहू दे.**
लक्ष्मी तथास्तु म्हणाली आणि निघून गेली.*
लक्ष्मी तथास्तु म्हणाली आणि निघून गेली.**
काही दिवसानंतर - धाकटी सून स्वयंपाक बनवत होती, तिनं भाजीला मीठमसाला टाकला आणि दुसरं काम करायला निघून गेली. त्यानंतर मोठी सून आली, न चाखताच मीठ टाकलं, आणि कामाला निघून गेली. त्याचप्रमाणे आणखी दोन सुनांनी न चाखताच भाजीत मीठ टाकलं आणि निघून गेल्या.*
काही दिवसानंतर - धाकटी सून स्वयंपाक बनवत होती, तिनं भाजीला मीठमसाला टाकला आणि दुसरं काम करायला निघून गेली. त्यानंतर मोठी सून आली, न चाखताच मीठ टाकलं, आणि कामाला निघून गेली. त्याचप्रमाणे आणखी दोन सुनांनी न चाखताच भाजीत मीठ टाकलं आणि निघून गेल्या.**
जेव्हा माणूस आला आणि जेवायला बसला तर भाजी खारट लागल्यावर तो समजून गेला की दारिद्र्य आलेलं आहे. त्यानं काही न बोलता जेवण केलं आणि निघून गेला.*
जेव्हा माणूस आला आणि जेवायला बसला तर भाजी खारट लागल्यावर तो समजून गेला की दारिद्र्य आलेलं आहे. त्यानं काही न बोलता जेवण केलं आणि निघून गेला.**
त्या नंतर मोठा मुलगा जेवायला बसला, तेव्हा खारट लागल्या नंतर विचारलं.. बाबांनी जेवण केलं का? तेव्हा बायकोनं हो म्हटलं. नंतर त्यानं विचार केला जेव्हा वडील काही बोलले नाही तर मी कशाला बोलू? त्याचप्रमाणे परिवारातल्या सगळ्या लोकांनी एकमेकांविषयी विचारलं आणि काही न बोलता सर्वांनी जेवण केलं.*
त्या नंतर मोठा मुलगा जेवायला बसला, तेव्हा खारट लागल्या नंतर विचारलं.. बाबांनी जेवण केलं का? तेव्हा बायकोनं हो म्हटलं. नंतर त्यानं विचार केला जेव्हा वडील काही बोलले नाही तर मी कशाला बोलू? त्याचप्रमाणे परिवारातल्या सगळ्या लोकांनी एकमेकांविषयी विचारलं आणि काही न बोलता सर्वांनी जेवण केलं.**
संध्याकाळी दारिद्र्य त्या माणसासमोर आलं आणि म्हणालं मी निघून चाललो आहे.*
संध्याकाळी दारिद्र्य त्या माणसासमोर आलं आणि म्हणालं मी निघून चाललो आहे.**माणूस म्हणाला कां? दारिद्रय म्हणालं, तुम्ही लोकांनी अर्धा किलो मीठ खाल्लं तरीपण भांडण केलं नाही. ज्या घरात इतक्या खारटपणानंतरही तुमची गोडी कमी झाली नाही, त्या घरात मी राहू शकत नाही.*
*
लक्ष्यात ठेवा......*
लक्ष्यात ठेवा......* *
भांडण आणि इर्षा यामुळं आपलं नुकसानच होतं. ज्या घरात प्रेम, शांती, आणि आपुलकी असते तिथं लक्ष्मी नेहमी नांदते...*
भांडण आणि इर्षा यामुळं आपलं नुकसानच होतं. ज्या घरात प्रेम, शांती, आणि आपुलकी असते तिथं लक्ष्मी नेहमी नांदते...**
लेख माझा नाहीये पण छान आहे. काम आहे की सर्वांपर्यंत चांगले विचार पोहोचवायचे.....*
लेख माझा नाहीये पण छान आहे. काम आहे की सर्वांपर्यंत चांगले विचार पोहोचवायचे.....**
आनंदी राहा.....
*
आनंदी राहा.....
* 


No comments:
Post a Comment