Saturday, December 10, 2022

*तुम्ही कधी सुखांशी भांडला आहात.?*

*आपण सर्वजण दु:खाशी भांडतो.*
*दु:ख देणाऱ्या देवाशी भांडतो.*
*पण सुखांशी भांडल्याचे चटकन,*
*आपल्याला आठवत नाही हे मात्र खरे...*
*माणूस फक्त सुखाचा शोध घेत असतो.*
*बालपणी आपले पालक आपल्याला सुख मिळावे,*
*म्हणून झगडत असतात.*
*आपण थोडे मोठे होतो,*
*आणि मग सुखाची चटक लागल्यामुळे,*
*आपण सुखासाठी पालकांशी भांडायला लागतो.*
*कधी ते सुख ओरबाडून घेण्यासही,*
*आपण मागेपुढे पाहत नाही.*
*बरेच वेळा सुख म्हणजे नेमके काय.?*
*ह्याचा शोध लागलेला नसतो.*
*आपण कधी तसा विचारही गांभीर्याने केलेला नसतो.*
*त्यामुळे आपल्याकडे जे नाही,*
*आणि जे दुसऱ्याकडे आहे,*
*ते मिळवणे म्हणजे सुख मिळवणे,*
*अशी ढोबळ व्याख्या करून,*
*आपण मार्गक्रमणा करतो.*
*स्वप्नं बघणे हा माणसाचा स्वभाव आहे.*
*हीस्वप्नं पालक मुलांच्यासाठी सुद्धा बघतात.*
*त्यांच्या स्वत:च्या स्वप्नाच्या मागे ती धावत असतातच.*
*आपण पालकांची स्वप्ने साकार करावी,*
*म्हणून आपल्याला सर्व सोई सवलती पुरवण्यात येतात.*
*किती तरी वेळा हे सर्व स्वत:च्या पोटाला चिमटा काढून केले जाते.*
*आपण मोठे होतो,*
*आणि स्वत:चं स्वप्नं बघायला लागतो,*
*बरेच वेळा पालकांच्या जीवावर पण,*
*आपल्या स्वप्नाच्यांत आई-वडील असतातच असे नाही.*
*जेव्हा आपली वेगळी स्वप्ने आई-वडिलांना कळतात,*
*तेव्हा ते वेडेपिसे होतात.*
*पण मग त्याना कळते की,*
*आपल्या तरुणपणी आपण हेच तर केले होते.*
*कदाचित भाषा वेगळी असेल,*
*स्थळ वेगळे असेल,*
*पण स्वप्नाचा गाभा तोच आहे.*
*स्वप्नासाठी किवा ध्येयासाठी,*
*लहानपणापासून आपण धावत असतो.*
*एकप्रकारची शर्यतच जणू.*
*त्याचे TRACK आई-वडिलांनी ठरविलेले असतात.*
*नव-नवीन ध्येय गाठताना,*
*आपण बरेच काही गमावत असतो.*
*सुरवातीला आपल्याला ह्याची,*
*थोडीफार जाणीव असते.*
*पण आपण जस जसे मोठे होतो,*
*तसे आपण आतला आवाज,*
*दाबून टाकण्याची कला अवगत करत जातो.*
*त्याचे justification ही करतो.*
*काळाच्या ओघात जेव्हा,*
*आपले मन बंड करून उठते,*
*तेव्हा आपल्या मनात बुद्धी,*
*आणि मन ह्यांचा झगडा सुरु होतो.*
*सुखाच्या शोधात घावताना,*
*अनेक सुखाच्या जागा निसटून गेलेल्या असतात.*
*ह्याची प्रकर्षाने आठवण होत राहते.*
*आपण वेडेपिसे होतो.*
*आपला आदर्शवाद कधीच,*
*आपली साथ सोडून गेलेला असतो.*
*आदर्शवाद पुस्तकजमा झालेला असतो.*
*मग जाणवत राहते की,*
*आपण फक्त आयुष्यभर तडजोड करत राहिलो.*
*खऱ्या सुखाकडे डोळेझाक करत राहिलो.*
*हेच आपले सुखाशी केलेले भांडण असते,*
*पण हे भांडण आपल्याला फार उशिरा कळते,*
*हे आपले दुर्भाग्य असते.*
*आपला रस्ता चुकीचा आहे,*
*हे सांगणारे ही आपल्याला पूर्वी भेटलेले असतात,*
*पण आपण त्यांचे बोलणे कधीही मनावर घेतलेले नसते.*
*उलट आपला पाय मागे खेचतात,*
*म्हणून आपण त्यांच्याशी भांडलेले सुद्धा असतो.*
*काही दु:खे सुखाच्या बरोबर,*
*आपल्या आयुष्यात चंचू प्रवेश करतात.*
*तात्पर्य म्हणजे आपला आतला आवाज वेळेवर ओळखा.*
*सुख म्हणजे नेमके काय,*
*ह्याचा ही एका वळणावर शोध घ्या.*
*सुख हे चौरस आहारासारखे पाहिजे.*
*ह्या सुखात आपली स्वप्ने, ध्येय,*
*कुटुंब, मित्र, शरीरस्वास्थ्य, शिक्षण,प्रतिष्ठा,*
*ह्या सर्वाचा समावेश आहे का नाही,*
*हे तपासून बघा.*
*असे झाले तर मला नाही वाटत,*
*तुम्हाला कधी सुखांशी भांडावे लागेल...!!*



🌺 🌺🌺🌺🌺🌺🌺
*जेव्हा आपल्यातून,*
*कुठल्याही गोष्टीची अभिलाषा,*
*ही गोष्ट वजा झाल्याची जाणीव होते.*
*आणि विचारांची दिशा,*
*पारमार्थिक क्षितिजाकडे ओढ घेऊ लागते,*
*तेव्हा समजून जावं,*
*नियती तुम्हाला...*
*वैराग्य वा अलिप्तता सुचवू पहाते आहे.*
*आजवर जे आयुष्य आपण जगलो,*
*त्यावर दृष्टिक्षेप टाकला की,*
*लक्षात येतं सगळं काही नियोजित होतं.*
*आयुष्य आपलं असूनही,*
*आपली ईच्छा ही गोष्ट नियतीच्या,*
*खिजगणतीत कधीच नव्हती.*
*तिने आपल्याला काय हवं,*
*त्यापेक्षा आपल्या नशिबात काय होतं,*
*तेच दान पदरात टाकलं.*
*अट्टहास नावाच्या गोष्टीने फक्त,*
*मनस्ताप दिला...*
*जे आहे ते नाकारण्याची वृत्ती जगणं,*
*अधिक कठीण करून गेली.*
*म्हणूनच तिची शरणागती पत्करून,*
*कधीही नियती जो मार्ग सुचवू पहाते,*
*किंवा जो मार्ग तिने आखून दिला आहे.*
*त्यावरून जाणं हेच हिताचं असतं.*
*मनाच्या ईच्छा हट्ट ह्यापेक्षा,*
*वास्तव हे अधिक शक्तीशाली असतं,*
*म्हणूनच त्याचा आदर ठेवून,*
*स्वीकार करावा.*
*शेवटी स्वीकृतीतच विरक्ती असते !!*

                🙏🏻🌹🙏🏻

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...