Saturday, December 10, 2022

 *🌴🛕🌜सूर्य आणि चंद्र ग्रहणात मंदिरे का बंद (झाकली) असतात..?*

१) सर्व प्रथम मंदिराचे दरवाजे हे ग्रहण संपेपर्यंत बंद ठेवले जाते.

२) मान्यतेनुसार ग्रहणाच्या दिवशी अन्नपदार्थामध्ये तुळशीची पाने टाकूनच त्यांचे सेवन केले जाते.

३) पण ग्रहणाशी संबंधित नेमक्या परंपरा काय आहेत?याबाबत अनेकांना प्रश्न आहे.

४) वैज्ञानिक दृष्टीकोनातून ग्रहणकाळात पृथ्वीच्या वातावरणात हानिकारक किरणांचा प्रभाव अधिक असतो.त्यामुळे या काळात खाण्यापिण्यास मनाई आहे.

५) हिंदू धर्मात ग्रहणाबाबत काही परंपरा प्राचीन काळापासून चालत आल्या आहेत.

६) ग्रहण काळात अन्न खाऊ नये असं सांगितलं जातं.
तसेच या काळात पूजा आणि 
झोपेवरही याचा प्रभाव पडतो,
अशी या मागची धारणा आहे.

७) यातील एक परंपरा म्हणजे मंदिराचे दरवाजे बंद करणे,मान्यतेनुसार ग्रहणकाळात मूक अवस्थेत राहून मंत्राचा जप करावा.

८) हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, ग्रहण समाप्त झाल्यानंतर सर्व 
मंदिरातील देवतांच्या मूर्ती चांगल्या प्रकारे धुवाव्यात.
असे मानले जाते की असे केल्याने मनुष्याला शुभ प्राप्त होते.

९)आपणही ग्रहणसुटल्यानंतर नवीन पाण्याने आंघोळी करावी.
🌙🌜🌔🌓🌒🌘🌑🌕🌖🌗

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...