*चांगलं द्या, चांगलंच मिळेल*
एकदा श्रीकृष्ण व अर्जुन एका जंगलातून जात असताना अचानक अर्जुन श्रीकृष्णला बोलतो मला कर्णा पेक्षा मोठे दानशूर व्हायचे आहे, त्या साठी तू माझी मदत कर. कृष्ण त्याला समजावण्याचा प्रयत्न करतो की तुला ते शक्य नाही. पण अर्जुन हट्टालाच पेटलेला असतो तो श्रीकृष्णाच्या मागे सतत एकाच धोशा लावतो की मला कर्णा पेक्षा मोठे दानशूर व्हायचे आहे.
कृष्ण म्हणतो ठिक आहे मी तुला एक संधी देतो पण माझी पण एक अट आहे मी तुला जी संधी देईन तीच संधी कर्णाला सुद्धा देईन अणि ह्या परीक्षेत तू कर्णा पेक्षा मोठा दानशूर असल्याचे सिद्ध करून दाखवायचे. अर्जुन कृष्णाची ही अट मान्य करतो.
कृष्ण आपल्या शक्तीने जंगलातल्या दोन टेकडयांचे रूपांतर सोन्याच्या टेकडयांमध्ये करतो आणि अर्जुनाला म्हणतो ,आता हे सगळे सोने लोकांमध्ये वाटून टाक अट एकच एकूण एक सोने तू दान केले पाहिजेस.
लगेच अर्जून जवळच्या गावात गेला आणि तिथे त्याने जाहीर केले की...
मी प्रत्येक गावकऱ्यांना सोने दान करणार आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने टेकडीपाशी यावे.
लोक अर्जूनाच्या मागे टेकडीच्या दिशेने चालू लागले.
पुढे अर्जुन छाती काढून चालत होता. मागे गावकरी त्याचा जयजयकार करत होते. दोन दिवस, दोन रात्री काम चालू होते.
अर्जून खोदत होता आणि सोने काढून लोकांना देत होता.पण टेकडी थोडीदेखील संपली नव्हती.
लोक सोने घेऊन घरी जायचे आणि परत येऊन रांगेत उभे राहायचे.
आता अर्जून अगदी दमून गेला होता.पण त्याचा अहंकार त्याला माघार घेऊ देत नव्हता.
शेवटी त्याने कृष्णाला सांगितले की बास....!आता यापुढे मी काम करू शकत नाही.
मग कृष्णाने कर्णाला बोलावले आणि सांगितले की.......
या दोन सोन्याच्या टेकडया आहेत त्या तू लोकांना दान करून टाकायच्या......
लगेच कर्णाने पंचक्रोशीतील गावकऱ्यांना बोलवले आणि सांगितले की.....
या दोन सोन्याच्या टेकडया तुमच्या आहेत. ज्याला जेवढे शक्य आहे त्याने तेवढे सोने निःसंकोच घेवून जावे.
एवढे सांगून कर्ण तिथून निघून गेला. लोक सोने वाहून नेऊ लागले.
अर्जून चकित होऊन पाहात बसला. हा विचार आपल्या मनात का आला नाही.....या प्रश्नाने तो अस्वस्थ झाला. कृष्ण मिश्कीलपणे हसला आणि म्हणाला.....
अनावधानाने का होईना तू सोन्याकडे आकर्षित झालास.....!तू गर्वाने प्रत्येक गावक-याला सोने वाटू लागलास.जणू काही आपण उपकार करतो आहोत अशा थाटात तू दान करत होतास.....!
कर्णाच्या मनात असले काहीही नव्हते.त्याने दान केले आणि तो निघूनही गेला.
आपले कुणी कौतुक करतंय.....गुणगान गातंय......हे पाहण्यासाठी देखील तो थांबला नाही.
व्यक्ती प्रकाशाच्या मार्गावर चालत असल्याचे हे लक्षण आहे.
देणगीच्या बदल्यात लोकांनी आपले कौतुक करावे.....
शुभेच्छा द्याव्यात..... धन्यवाद द्यावेत अशी अपेक्षा ठेवणे.....
म्हणजे ते काही निरपेक्ष दान नसते.
कुठल्याही परताव्याची अपेक्षा न ठेवता दान करावे............. *म्हणून निसर्गाचा एक नियम आहे जे तुम्ही देणार ते तुम्हाला नक्की परत भेटणार.कोणत्या रूपात परमेश्वर देईल ते सांगता येत नाही. त्यामुळे चांगल द्या पदरी चांगलंच मिळेल.*
"काय चुकलं" हे शोधायला हवं,
पण आपण मात्र "कुणाचं चुकलं" हेच शोधत राहतो.....
[13/11, 7:29 am] +91 95950 50219: *
_मैत्री_
*
_मैत्री_
**_______________*
*मैत्री केली तर जात पाहू नका आणि मदत केली तर ती बोलून दाखवू नका !*
*कारण कोणत्याही बाटलीचा सील आणि दोस्तांचा दिल एकदा तोडला की विषय संपला !*
*मित्र गरज म्हणून नाही तर सवय म्हणून जोडा, कारण गरज संपते पण सवय कधीच सुटत*
*नाहीत
*
* *"मित्र" नावाची ही दैवी देणगी जीवापाड जपून ठेवा,*
*कारण..*
*जीवनांतील गोडवा हा मित्रांमुळेच असतो
*
**कोणीतरी विचारले मित्रांमध्ये एवढे काय विशेष नातेवाईकांपेक्षा..*
*त्यांना सांगितले,*
*मित्र हे फक्त मित्र असतात..*
*त्यात सख्खे, चुलत, मावस, सावत्र असं काही नसते. ते "थेट" मित्र असतात
*
**“मैत्रीचे धागे कोळ्याच्या जाळ्यापेक्षाही बारीक असतात. पण लोखंडाच्या तारेहुनही मजबूत असतात. तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वज्राघातानेही तुटणार नाहीत”
*
**प्रत्येक दुखण्यावर दवाखान्यातच उपचार होतात असे नाही.*
*काही दुखणी कुटुंब आणि मित्र मंडळी यांच्या बरोबर हसण्या, खिदळण्यानेही बरी होतात
*
**माणसाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात "सावली म्हातारपणात "शरीर"*
*आणि..*
*आयुष्याच्या शेवटच्या काळात "पैसा" कधीच साथ देत नाहीत साथ*
*देतात ती फक्त आपण जोडलेले "जवळचे मित्र"
*
**म्हातारपण केव्हा
*

**मित्र बोलवित आहे, पण तुम्हाला जावेसे वाटत नसेल तर समजा की तुम्ही म्हातारे झालात. म्हातारपण येवू न देणे आपल्या हातात आहे.*
*मित्रांसोबत रहा व आनंदात जीवन जगा
*
* *-आपल्या हक्काचा माणुस*-
No comments:
Post a Comment