कृषी बिलाच समर्थन करणाऱ्यांनो हे तुम्हाला माहित आहे का
आपण कृषी बिलाचे वाचन केले आहेत का...
ते समजून घेतले आहेत का..
आपण शेतकरी किंवा शेती तज्ञ आहात का..
वाचा पुढील मुद्धे...
१) शेतकऱ्याचा माल हमीभावपेक्षा कमी दरात घेता येणार नाही असे कायद्यात लिहिलले नाही हे तुम्हाला माहीत आहे का?
२) जमिनीचा ताबा आणि जमिनीवरचे सगळे व्यवहारांचे अधिकार शेतकऱ्यांकडे रहाणार नाहीत हे तुम्हाला माहीत आहे का
३) करार केल्यानंतर खासगी उद्योजकाशिवाय इतरांना माल देता येणार नाही हे तुम्हाला माहीत आहे का 

४) पूर्वी सिलिंग ऍक्ट आला आणि ज्याच्या ताब्यात जमीन तो मालक असा कायदा सरकार आणणार नाही हे सरकारने लिहून दिलेलं नाही हे तुम्हाला माहीत आहे का

५) देशभरात कुठेही माल विकता येईल असे म्हणताय, पण ज्या राज्यांनी हे कायदे राबवायला नकार दिलाय त्यांनी माल येऊ न दिल्यास शेतकरी काय करू शकतो हे कायद्यात कुठेही लिहिलेलं नाही हे तुम्हाला माहीत आहे का 

६) आतापर्यंत नाशवंत माल साठवणुकीवर मर्यादा होत्या, त्या उठवल्यात आणि आता मोठे गुंतवणूकदार मोठी गोदाऊन्स बनवून हा माल प्रिझर्व करायची आणि चढ्या दराने जनतेला विकू शकतील हे तुम्हाला माहीत आहे का 

७) केलेला करार रद्द करता येणार नाही हे तुम्हाला माहीत आहे का 

८) शेतकऱ्याचा 100%माल apmc विकत घेण्यास बांधील नाही हे तुम्हाला माहीत आहे का 

९) शेतकऱ्याला स्वतःच्या जागेचे कुठलेही व्यवहार करता येणार नाही हे तुम्हाला माहीत आहे का 

१०) अदानी ने कायदा येण्याआधी सेट अप रेडी केलाय हे तुम्हाला माहीत आहे का 

११) Jio मार्ट मध्ये शेतमाल मनमानी भाव लावून विकला जाईल हे तुम्हाला माहीत आहे का 

असे अनेक प्रश्न आहेत...
त्यासाठी राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश,उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू, मध्यप्रदेश, ओरिसा मधील शेतकरी लढत आहेत.
पण सध्याला शेतकरी आंदोलनाला कट करून बदनाम करण्यात येत आहे. त्या प्रयत्नाला उत्तर देण्याचा एक प्रयत्न
*FarmersProtest*
No comments:
Post a Comment