Saturday, November 12, 2022

🌻🍁🌻🍁🌻🍁🌻🍁🌻🍁🌻

*"आपले आयुष्य हे आपणास रोजच व नेहमीच एक खुप छान संधी घेऊन येत असते, त्या संधीचे आपण सोन करायला विसरु नका...!!!*🌹🙏

*🌷आपल्या घरातील झाडू जो पर्यंत एकञ बांधलेला असतो तो पर्यंत तो झाड़ू " घरातील कचरा " साफ करतो. पण तोच झाडू जेव्हा सुटतो व विखुरला जातो तेव्हा तो स्वतः "कचरा" होवून जातो, आणि तोच कचरा आपली डोकेदुखी होतो. तसेच माणसांचे पन आहे, त्यासाठी मनाने एकत्र रहा, एकमेकांवर निस्वार्थी प्रेम करा, एकमेकांचा मनापासून आदर करा, एकमेकांना अडचणीत सढळ हाताने मदत करा. यातच जीवनातील आयुष्यात खरा आनंद मिळत असतो. म्हणूनच "हाक तुमची साथ आमची" असे समाजात वागत राहा...!!!*

*🌷कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी फक्त "शक्ती" असून चालत नाही तर त्याला "सहनशक्ती" चीही जोड आसावीच लागते. माणुस " कसा दिसतो" ह्यापेक्षा, तो "कसा वागतो", "कसा बोलतो" ," कसा राहतो व समाजात " कसा आहे" ह्याला जास्त महत्व असतं... कारण शेवटी सौंदर्याचं आयुष्य तारुण्यापर्यंत तर गुणाचं आयुष्य मरणापर्यंत असतं. समाजात सौंदर्याला किंमत नाही तर त्याच्या गुणानां महत्व दिले जाते...!!!* 
            
*🌷जेव्हा एखाद्याचा "डोक्यामध्ये दगड घालून ..., त्याचा खुन त्याचा केला जातो... तेव्हा मरणारा तर मेला .. मात्र नंतर मारणाराही कालांतराने काही कारणाने मरतो... पण ज्या दगडाने तो मरतो, तो दगड मात्र तिथेच पडलाय, आणि जगातील लोकांना सांगतोय.... "मी किती पराक्रम केला पाहा..., मी "मरणारा" व "मारणारा" या दोघांचाही जीव घेतला आहे...!!!*

*🌷मित्रांनो, आपण सर्व सावध व्हा, व यातूनच बोध घ्या... ! समाजात असे खुप काही दगड आहेत ... जे आपल्याला मुद्दाम निष्कारण भांडायला लावतात. त्यांच्या भडकवण्याने आपण आपल्याच एकमेकांची डोकी फोडतो... आणि नुकसान आपलेच होते.... आपणच एकमेक भांडत बरबाद होतो ... आणि जे समाजात भांडण लावणारे (माणसे)दगड मात्र बाजूला उभे राहून आपली गंमत बघत असतात...!!!*

*🌷समाज बंधुनो म्हणून शिवतंत्र सांगते " आपला वध होण्या आधी आपण सावध व्हा... बरबाद होण्याआधी आबाद व्हा.... " मित्रांनो, शिवरायांचे शिवतंत्र समजून घ्या जे काही स्वार्थी लोक त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी ..., किंवा मोठेपणा साठी ... आपल्याच जवळचीच माणसे प्रथम तोडतात.. असे लोक छोट्या छोटया ... लुटूपुटूच्या लढाया जिंकतील ... पण अंतिम युद्ध कधीच जिंकू शकत नाहीत...!!!*

*🌷कारण समाजात आपण आपले घरातच शत्रूत्व निर्माण केल्यामुळे बाहेरच्या माणसांना ती संधी मिळते ..., त्यामुळे बाहेरचा शत्रू न लढताही आपल्या अंतर्गत भांडणाने तो आपोआप जिंकतो... म्हणून शिवतंत्र नेहमीच सांगते की... " तुम्हाला नविन माणसे जोडता आली नाहीत तरी चालतील... परंतु तुम्ही आपलीच माणसे अंतर्गत कलहाने तोडू नका" याचे पालन कराल, तरच तुम्ही कुठल्याही ठिकाणी यशस्वी होऊ शकता...!!!...*

*🌷समाजात आपण आपले म्हणून मानतो अश्या आपल्या लोकांना कधीही तोडू नका, तीच आपली श्रीमंती आहे. ती संपत्ती गेल्यावर सुख दुःखाच्या वेळी, अडचणीच्या वेळी कळते की त्यांचीं किंमत काय आहे, हे समजत असते, त्यांची व्याप्ती व महत्त्व तेव्हाच कळते जेव्हा लोक त्यांच्यामुळेच तुम्हाला समाज ओळखत असतात, याची मनापासून जाणीव ठेवा. एक सामाजिक बांधीलकी म्हणून तरी तसे नेहमी समाजात वागण्याचा प्रयत्न करा...!!!*



🌵🏵️🌵🏵️🌵🏵️🌵🏵️🌵🏵️🌵

*आपल्या आयुष्यात जीवनाच्या प्रवासात निस्वार्थी मित्र खुप जोडा, पण जोडलेल्या त्या मित्रांसोबत कधीही घानेरडे राजकारण खेळू नका.*🌹🙏
*समाजात साधन संपत्ती, शिक्षण, अर्थकारण, राजकारण यावरून माणूस कधीच श्रेष्ठ किंवा मोठ्ठा होत नसतो. तर खुप मेहनत, कष्ट, अनुभव व माणुसकी हेच माणसाच खर श्रेष्ठत्व असते. समाजातील प्रथम माणुसकी आणि नाती प्रामाणीकपणे जपा, कारण आपण किती चांगले आहोत हे आपण सांगून नाही तर आपल्या वागण्यातूनच समजते...!!!*

*या धावत्या जगात आपण तीन गोष्टी कधीही बदलू नका. समाजात आपले चांगले उच्च विचार, उत्तम ध्येय आणि प्रामाणीकपणे जीव लावणारी माणसं. मेलेल्या माणसाला खांदा देण्याचे काम कितीही पवित्र आणि परोपकारी असले तरी जो मेलेला आहे, त्याला त्याचा काहीच उपयोग नसतो. आपण किती ही मेलेल्या माणसांना (प्रेताना) खांदा दिला. "यापेक्षा" तो मेलेला माणूस जीवंत असताना त्या माणसांना किती वेळा मदतीचा हात दिला होता हे तपासा, यावरुन आपली माणूसकी व प्रेम किती होत हे ठरत असते...!!!*

*माणूस मेलेला कळताच धाऊन जाणारी माणसे तो जिवंत असताना, अडचणीत असतानाच का बरं धाऊन जात नाहीत? खरे तर माणूस मेल्यानंतर धावणाऱ्या माणसांची धावपळ व्यर्थ असते, कारण तुम्ही नाही गेला तरी माणसे त्याला जाळल्याशिवाय किंवा पुरल्याशिवाय राहणार नाहीत. पण तरी देखील ही व्यर्थ धावपळ करणारे खुपच आहेत...!!!*

*खरतर आजकालच्या या खोट्या दिखाव्याच्या शर्यतीत, तु मोठा की मी मोठा ही क्षणभंगुर श्रीमंती दाखविण्यासाठी माणुस माणसाला, आपल्या नात्याला विसरत चाललाय. म्हणुनच बोलतोय जीवंतपणी, जिवंत माणसासाठी, जिवंत असणाऱ्या व अडचणीत सापडलेल्या, एखाद्याला" तरी आयुष्यात खरा प्रामाणिक हात द्या. झालं गेलं विसरून, तुझं माझं सोडून, खरा माणुस व्हा! तेव्हाच मरेपर्यंत त्याचा खरा अभिमान वाटेल. बघा हे पटतयं का. थोडासा माणुसकीने विचार करा. धन्यवाद🙏🏻*

*आयुष्य खुप सुंदर आहे. आनंदात जगा, आपला जिव्हाळा नेहमीच कायम राहो.....!!!* 

*स्वतःची व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची नेहमी योग्यती काळजी घ्या*. *आपल्यामुळे कोणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या, व तसे वागा एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या...!!!*

*जागृत राहा, सतर्क रहा, सुरक्षित रहा*. 

🌹🙏🌹 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
[2/15/2021, 12:03 AM] +91 94233 63843: ☘️🍁🌺☘️🍁🌺☘️🍁🌺☘️🍁
 
*🌻आयुष्यातील अनेक क्षण हे आनंदाचे असतात, त्यांचा योग्यवेळीच समाधानाने आनंद घ्या*💐🙏

*🌻प्रत्येक माणसाला इतरांपेक्षा सर्व स्तरावर सर्वश्रेष्ठ होण्याची महत्वाकांक्षा, इच्छा व अपेक्षा ही असतेच. परंतु ठराविक मर्यादेनंतर त्याचा अतिरेक झाल्यास त्या अपेक्षांचा आपोआप अपेक्षा भंग व शेवट होतो...!!!*

*🌻एक छोटासा दृष्टान्त बघा, आपल्या भारतात सिकंदर बादशहा हा भारत जिंकण्यासाठी आला असता, एका निर्भेळ क्षणी एका खेडुत मुलीने त्यास सहजच प्रश्न विचारला, महाराज भारत जिंकल्यावर तुम्ही काय करणार.? तो म्हणाला, पुढचे देश जिंकीन, आणि मजल दरमजल असं जिंकून, मी जगज्जेता होईन. मग काय करणार.? हा प्रश्न पुन्हा त्या मुलीने विचारला. यावर तो म्हणाला, मग काय, निवांतपणे जगेन. यावर ती मुलगी खुदकन हसत म्हणाली, मग आतापासुनच का निवांत जगत नाहीस.? यातुन सिकंदर बादशहा खुप विचार करीत बसला व पुढे काय घडलं हे माहीत नाही पण खरंच ही कहाणी बरंच काही सांगुन जाते...!!!*

*🌻आपणही असेच जगण्यातला निवांतपणा घालवून सतत धावपळ करतोय, आपण या पुढे कधीतरी भाबड्या आशेवर निवांत जगू, या आशेवर बऱ्याचदा इतरांना मागे टाकण्याच्या नादात काही महत्वाचे विसरून जातो, आपल्याला इच्छित स्थळी जावयाच्या रस्त्याचे वळण कधी येऊन गेल हे तो विसरुणच जातो, याचं भानही रहात नाही. आपण कितीही वेगाने पळालो, तरी आपल्यापुढे कोणीतरी असणारच आहे...!!!*

*🌻आपल्या पेक्षा कोणाजवळ काही तरी वेगळे ज्ञान, माहीत असणारच आहे, कोणाला तरी ती संधी मिळणारच आहे, कोणाचं तरी विचारांचे वलय आपल्यापेक्षा अधिक असणारच आहे, कोणीतरी आपल्याहुन ज्ञानी, हुशार, वरचढ असणारच, हे आपण आपल्या अहंकारने विसरतो. प्रत्येकाला एक संधी, वेळ, काळ मिळत असतो. त्यावेळी तो योग्य वेळेचा फायदा घेतच असतो, तेव्हा आपले लक्ष आपल्या स्वाभाविक इच्छित ध्येयावर, आणि जगण्यावर मर्यादितच केंद्रित करावं. प्रत्येकची अपेक्षा असते की मी सर्व श्रेष्ठ व्हावे परंतु "अति तेथे माती" या उक्ती प्रमाणे अपेक्षा मर्यादित ठेवा, अण्यथा कुठलीही चांगली अथवा वाईट वेळ कधी येईल हे सांगता येत नाही, याची जाणीव प्रत्येक कर्माच्यावेळी ठेवा..!!!*

*🌻आपली कर्मगती आपल्या प्रक्रुतीला साजेशी ठेवीत आनंदाने जगत जावं, अण्यथा आपले जीवलग मित्र, जवळचे नातेवाईक, आप्त सहकारी, यां सर्वांच्यापेक्षा मीच खुप श्रेष्ठ व मोठे आहोत, हे सिद्ध करण्याच्या अहंकारी नादात सर्वाना विसरतो किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो, आपण आपल्या आयुष्याला अश्या वेगळ्याच विनाशकारी वळणाच्या दिशेला नेऊन ठेवले, हे कधी कळालेच नाही...!!!*

*🌻म्हणूनच आपण केवळ एकटंच पुढे जाऊन राहाण्यापेक्षा, आपल्या जीवलग माणसासोबत व मित्रांसोबत थोडं बरोबरीन राहिलेलं उत्तम नाही का?. अन्यथा त्यामुळे बऱ्याचदा आपणास विनाकारण असुरक्षिततेची भावना जाणवते व ती वाढतच जाते, त्यामुळे काही महत्वाच्या गोष्टी करायच्या राहुन जातात...!!!*

*🌻आयुष्यात काही गोष्टी वैफल्य निर्माण करतात. यासाठी पहिल्यांदा आपली खरी गरज , आणि विलासी चैन यात फरक काय हे समजून घेणे नितांत गरजेचं आहे. इतर लोक धावतायेत म्हणून आपणही त्याप्रमाणे धावणं ठीक नाही. आपल जगणं हे रोजच्या राईसप्लेटसारखं असावं, त्यात कसं साऱ्या पदार्थांना आपापलं मर्यादेत स्थान असतं आणि त्यामुळेच ते जेवण खुप रुचकर ठरत असतं. जर चटणीची जागा भाजीला दिली, तर ताटाचं संतुलन बिघडतं आणि जेवणाचा गोंधळ उडतो' तसेच आपल्या आयुष्य घडत असते...!!!*

*🌻जगण्याचंही काहीसं असंच आहे, जीवन सर्वसमावेशक व चौफेर समाधान कारक असेल, तरच ते खुप सुखकर वाटते. एखाद्या मोठ्या यशाच्या प्रतिक्षेत रोजच्या जगण्यातील छोटे छोटे आनंदाचे क्षण निसटुन जाऊ देऊ नका, ते आनंदी क्षण जेव्हाचे तेव्हाच मजेत घालवा, जगून घ्या व आनंदात लुटून घ्या. आपल्या आवडीच्या व आनंद देणाऱ्या गोष्टींसाठी, आपले संपूर्ण आयुष्य पडलेय ते क्षण वेळाच्या वेळी वेचा...!!!*

*🌻आपल्या तारुण्यात चांगली शक्ती असते, खुप वेळ असतो, परंतु त्यावेळी आपल्यालाकड़े पुरेसा पैसा नसतो. पुढे प्रौढ वयात शक्ती असते, हवा तेवढा पैसा असतो, परंतु त्यावेळी आपल्याकडे वेळ नसतो. परंतु वार्धाक्यात म्हणजेच उतारवयात वेळही असतो, पैसाही बऱ्यापैकी असतो पण शरीरात शक्ती, त्राण उरत किवा राहात नाही. यातील सुवर्णमध्य गाठुन समरसुनं, मनसोक्त आयुष्य जगावं...!!!*

*🌻आपल्या हरवलेल्या वस्तु कदाचित गवसतील, मिळतील किंवा सापडतील. परंतु आपल्या आयुष्यातील महत्वाची मौल्यवान वेळ निघुन गेलेल्यावर ती वेळ परत मिळत नाही. आपण आजारी पडून शस्त्रक्रियेच्या टेबलावर पोचल्यानंतर, "निरोगी कसं राहावे व जगावं" हे आयत्यावेळी पुस्तक वाचुन काय उपयोग.? त्यासाठी आयुष्यात योग्यवेळी निस्वार्थी जीवन जगण्याच्या आनंद घ्या, आनंदात जगा व इतरांना देखील आनंदात जगु द्या...!!!*


No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...