Saturday, November 12, 2022

 👌🏻*जर समजा प्रत्येकाच्या प्रोफेशन प्रमाणे त्याने त्याच्या गाडीवर लिहायचं ठरवलं तर ते कसं असेल बघा..*


*आर्थोपेडिक सर्जन, डॉक्टर्स लिहीतील..*
"सुरक्षितपणे ओव्हरटेक करा,
नाहीतर आमची बिले भरा.."

*गायनॅकॉलॉजिस्ट लिहीतील..*
"योग्य अंतर ठेवा वाहनांमध्ये आणि पाळण्यांमध्येही.."

*ऑप्टीशियन लिहीतील...*
"बुरी नजर वाले..
हमारा चष्मा लगाले..!"

*शिक्षक लिहीतील...*
"हि पाटी वाचण्यासाठी तरी शिका.."

*सरकारी कर्मचारी लिहीतील..*
"वाट बघा.... पाट्या टाकणं चालू आहे"

*इंजिनीअर लिहीतील..*
"चांगली गाडी बनविणे आमच्या हाती..
ती सुरक्षित चालवणे, फक्त तुमच्या हाती.."

*एखादा पर्यावरणवादी लिहील..*
"इलेक्ट्रिक कार वापरा सर्वांनी..
लई प्रदूषण करतयं, इराकचे पाणी..!

*वकील लिहीतील..*
"दे धडक.. बेधडक..
केस झाली तर..
ये माझ्याकडं.. तडक.."

*सायकोलॉजीस्ट, कौन्सेलिंग करणारे लिहीतील...*
"अरे... बघतोस काय रागानं..!
तू राग नियंत्रण कर आमच्या सहभागानं..!"

*सीए लोक लिहीतील..*
"पहाडों की राणी.. सडकों का राजा..
टॅक्स बचाना है.. तो ऑफिस आजा.."
खाली ऑफिसचा पत्ता असेल..

फुटाची नोट-

*आणि गाडी चालवत असलेला नवरा शेजारी बसलेल्या बायकोच्या सूचनांनी वैतागला असेल, तर तो लिहील..*

"सावधान... चालक ऐकत आहे..".

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...