Saturday, November 12, 2022

 🌷🍁🌷🍁🌷🍁🌷🍁🌷🍁🌷

 *🌹आपली माणसे तीच असतात जी आपण आपली म्हणूनच समजून वागत असतो . त्यांना प्रथम ओळखायला शिका व त्यानंतर तसे त्यांच्याशी वागण्याचा प्रयत्न करा*💐🤝🙏

*🌹आपली माणसे तीच असतात, ज्यांच्याबद्दल आपण अतोनात प्रामाणिक विश्वास ठेवतो व तसे वागत असतो, तीच माणसं कधीकधी इतकी धक्कादायक वागतात की, त्या धक्क्याने आपण कधी कधी मनातून कोसळून जाऊ असं वाटू लागतं. आपल्या जवळच्याच माणसांनवर ठेवलेला विश्वास जेव्हा आपलीच माणसे विश्वासघात करीत असतात तेव्हा ते आपल्या जिव्हारी फार लागणारे असतात. त्यामुळे लौकिक या अर्थाने आपलं फारसं नुकसान झालेलं नसलं तरी आपल्या भावनिक पातळीवर मात्र कधीही भरून न निघणारी हानी मनात झालेली असते...!!!*

*🌹त्यामुळे आपल्या माणसांवरचा विश्वास अशाने उडू लागतो. त्यांच्याकडे कुठलाही प्रकारे, कश्याहीसाठी आणि कोणाहीसाठी वागण्याचा, बोलण्याचा फार हट्ट करावा असे कधीच वाटत नाही. मग अर्थात या सर्व पासिंग फेजेस असतात, त्या येतात आणि पुरेशी मनाला वेदना सोसून झाल्यावर परत जातातही. त्यामुळे कालांतराने आपण आपल्या मूळ स्वभावावर पुनःपुन्हा परत येतच असतो...!!!*

*🌹आपण तरीही फार जवळून अनुभवलं असते की प्रत्येक माणसाचे पाय अगोदर जमिनीवर मातीला लागलेलेच असतात. मग आपण उदास का होऊ लागतो. एवढ्यातेवढ्याने, तसा भारावून जाण्याचा आपला स्वभाव असूच नये आणि त्या कोणालाही पराकोटीचा आदर्श म्हणून जास्त मानत बसू नये...!!!*

*🌹माणसं म्हटली की त्याच्या वागण्यात, बोलण्यात व त्याच्या वर्तनात कमी जास्त गोष्टी व्हायच्याच आणि ते अगदी नैसर्गिक आहे. प्रत्येक माणसांतली नाती ही पूर्णतः नि:स्वार्थ कधीच नसतात, आणि त्यात फारस वावगंही काही नसते, हे आपण नेहमी लक्षात ठेवायलाच हवं. म्हणजे आपल्याला अपेक्षाभंगाचं दुःख वाट्याला येत नाही...!!!*     

*🌹प्रत्येक मानवी नात्यात अडचणी ह्या येतातच. पण त्या सगळ्या अडचणींवर, कसोट्यांवर आपण मात करून अखेरपर्यंत त्या आठवणी आपल्या सोबत उरत असतात. आपली खरी माणसं कोण असतात हे आपल्याला ओळखता आले पाहिजेत. ज्यांचे हात आपण घट्ट धरून पुढे जातो, तीच माणसे उगीचच आपले हात मध्येच सोडुन जात असतात किंवा गेलेले असतात, ती माणसे आपल्या प्रवासातले तात्पुरते सोबती होते, इतकंच आपण समजायचं असते आणि पुढे चालू लागायचं असते...!!!*

*🌹आपण रस्त्यात चालताना हातातून सांडून गेलेले सगळेच मोती वेचून आणायचं ताकद त्यावेळी आपल्यात नसते आणि प्रत्येकवेळी तसा प्रयत्नही आपण परत करायचा नसतो. फक्त निमूटपणे विनातक्रार आपल्यासोबत चालत आलेल्या पावलांवर आपली भिस्त ठेवायची असते आणि पुढे जायचे असते...!!!* 

*🌹आपल्या सोबत आलेली तीच आणि तेवढीच माणसं फक्त आपली समजायची असतात, जी माणसे आपल्या बरोबर नेहमी साथ देत आली आहेत त्यांना घेऊन पुढे चालायच असते. आपल्या नेहमीच्या वागण्या, बोलण्याच्या सरावाने आपल्याला आपली 'ओरिजिनल' माणसं ओळखून येतात. भले ती लाखदा चुकत असतील, पण ती आपला हात मध्येच कधीच सोडून जाणार नाहीत, त्यांची आपल्यावर असलेली माया, ममता व प्रेम कदापीही कमी होणार नाही...!!!*

*🌹आपल्या आयुष्यात अनेक अशी खुप चांगली, निस्वार्थी, प्रेमळ माणसही असतात. आपण ती माणसे मात्र नेहमी नक्कीच जपायलाच हवीत...!!!*

*🌹आपल्या काही लोकांसाठी आपण केवळ त्यांच्या कामासाठी 'सोय' असतो. ते आपला त्यांच्या सोयीने आपल्याशी वागतात व आपला त्यांच्या सोईनुसार आपला वापर करीत असतात, आपण जेव्हा त्यांना त्यांचीं गैरसोय किंवा त्यांना आपण बिनकामाचे वाटत असतो, तेव्हा ते आपल्याला वापरून घेऊन नंतर त्यांच्यापासून दूर करीत असतात. आपल्याला कोणीतरी त्यांच्या स्वतःच्या सोयीनुसार वापरत आहे हे माहीत असून देखील आपण मात्र त्यांच्याशी किती जेन्युईनली वागत असतो, आणि तीच स्वार्थी माणस आपण जपण्याचा प्रयत्न केला हे जेव्हा आपल्या लक्षात येतं, तो क्षण आपल्या मनाला फार फार दुखःदायक, वेदनादायक व दुखरा वाटत असतो...!!!*

*🌹आयुष्यात जगताना सगळीच माणसं आपलीच आहेत म्हणून आपण त्यांना जीव लावीत असतो. आपल्याला ती माणसे आपली कोणीही नाहीत असं कधीच वाटत नाही. पण आपण मात्र नक्की कोणावर विश्वास टाकायचा, कोणाला जवळ करायचं आणि कोणासाठी नात्यात काही अदृश्य भिंती कायम घालून ठेवायच्या हे आपल्याला कधीतरी ठरवावंच लागतं. नाहीतर आपला साधेपणा हा भाबडेपणाच्या मार्गाने जाऊन आपण त्यांच्या दृष्टीने बावळट ठरू शकतो...!!!*

*🌹आपल्याला आपली माणसं कोण हे तपासने व जोखणं जमायलाच हवं. आपणास समोरच्या माणसाचं "'असत्य"' स्वार्थी रूप माहिती असूनही आपण ते माहिती नसल्यासारखं दाखवणं आणि त्याच्या वागण्यातून दिसणारे विरोधाभास अनुभवणं ही गमतीदार गोष्ट असते. ती माणसे खोटं-नाटं, उलटं-पालटं, बोलून-वागून आपण समोरच्याला फसवू शकतो असं त्या काही लोकांना अजिबात वाटत नसतं. जेव्हा त्यांच्या वर्तनातल्या विसंगती आपल्या लक्षात आलेल्या असतात. मग तर तेव्हा त्यांची अक्षरशः कीव करावीशी वाटते. समाजात आपली माणसे अशी का वागत असतील?, आणि स्वतःसह इतरांना का फसवत असतील? याचा विचार करीत बसतो. काही लोक समाजात अशी का वागतात हा संशोधनाचाच विषय आहे...!!!*

*🌹समाजात आपल ज्यांच्याशी कधीच पटतच नाही, त्यांच्यासोबत सुद्धा केव्हाही वादविवाद घालून किंवा त्यांना नाहक स्पष्टीकरणं देत बसु नये, तसेच त्यांना फुकटचा सल्ला देऊन आपण आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडून, वेळ वाया घालवू नये, असं मला मनापासून वाटतं. आपण मनात कटुता आणून, मनातील मनात खळबळ निर्माण करत आपली नाती कधी संपवू नयेत. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातुन बाजूला होताना जसे झाडावरून जितक्या सहजतेने फूल निसटतं, तितकी सहजता आपल्यात देखील असावीच लागते...!!!*
🌹

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...