Saturday, November 12, 2022

: 🌺☘️🍁🌺☘️🍁🌺☘️🍁🌺 


*परमेश्वर हा स्वत:*
*अप्रतिम महान कलाकार आहे.*
*म्हणूनच त्याने आपली कला,*
*इतकी प्राण ओतून,*
*मानव घडवला आहे की,*
*स्वत: ह्या कलाकृतीच्या पलीकडे,*
*निराळा म्हणून उरलेला नाही.*
*परमेश्वराला स्वत:ची बुद्धी असलेला,*
*स्वत:च्या कलेला दाद देणारा,*
*मानवासमान आपल्या कलेला,*
*दाद देणारा रसिक हवा होता,*
*तेव्हां त्याने माणूस म्हणून,*
*प्रज्ञावंत रसिक निर्माण केला.*
*माणूस हा ईश्वराची शेवटची सर्वश्रेष्ठ,*
*आणि परिपूर्ण अलौकिक कलाकृती आहे !*
*Every individual is potential Divine.*
*परमेश्वर वस्तुत्वाने अनुभवायचा असतो.*
*अस्तित्वाने जाणावा लागतो.*
*सिद्धपुरुष आणि साधक,*
*ह्यांच्यातल्या नात्यात एक गहन श्रद्धा असावी लागते.*
*श्रद्धा म्हणजे प्रेमाचे नवनीत.*
*भक्तीचं शेवटचं चरण.*
*श्रद्धेला जोपर्यंत विवेकाचे अस्तर असते.*
*तोपर्यंत श्रद्धा माणसाच्या जीवनाला,*
*समृद्ध करणाऱ्या ऊर्जेचे काम करते,*
*पण विवेकशून्य श्रद्धा,*
*माणसांच्या जीवनात,*
*भावनिक कोलाहल निर्माण करते.*
*त्याच्याच जीवन मंदिरात आनंदाचा,*
*आणि समाधानाचा अखंड,*
*घंटानाद होत राहतो.*
*अशांसाठीच...*
*श्रद्धा ही प्रेरकशक्ती ठरते...!!*


🌹🙏🌹 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
 *शेतकऱ्याला अक्कल शिकवू नका*...🌹🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*🌹तो तुमच्या बापाला ऐकणार नाही. त्याच्या घरातील शेणाचा उकिरडा जगातील सर्वोत्तम असा नैसर्गिक खताचा कारखाना होता...!!*

*🌹तुमच्या नादी लागला आणि त्याने युरिया मारायला सुरुवात केली. उत्पन्न दुप्पट करायच्या नादात त्याचे कर्ज चौपट झाले. तुमच्या घरात येणारी प्रत्येक भाजी विषारी आहे. कीड आणि तुम्हीं ही बरोबरच मरायला लागला आहात...!!!*

*🌹पंजाब हरियानातून जी कॅन्सर ट्रेन येते त्याला शेतकरी जबाबदार नाही तर तुम्हीं फुकटे जबाबदार आहात. कारण तुम्हांला जास्त आणि स्वस्त भाजी फुकटात हवी होती. त्यामुळे तुम्हीं शेतकऱ्यांना हायब्रिड ची इंजेक्शन मारायला सुरुवात केली आणि त्या मुळेच त्याच्या मेंदूचा पचका झाला...!!!*

*🌹माझा शेतकरी बांधव त्याच्यापाशी असलेले सोने विसरला आणि तुमच्या पीतळाला भुलला... देशी वाण संपूर्ण पणे संपले आहेत. द्या त्याला अजून वाढीची औषधे. गवता सारख्या भाज्या येतात फुकटे दोन रुपयाने खरेदी करतात आणि बाकी त्याला फेकून द्याव्या लागतात...!!!*

*🌹फुकट्यानंच्या बेंबटावले काहीच जात नाही. म्हणे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार अरे बाबांनो त्याच्या आहे त्या शेतमालाला,दुधाला योग्य बाजारभाव द्या! तो आपसूकच उत्पन्न दुप्पट करील...!!!* 

*🌹शेतकरी साऱ्या जगाचे ओझे उचलायला तयार आहे. पण त्याला थोडी फार तरी साथ द्या! नुसतेच तुम्हीं त्याचे रक्त पीत असताल तर कधीना कधी तो मरणारच आहे त्यालाच सगळे अक्कल शिकवतात...!!!*

*🌹ज्यांच्या बापाला उकिरडा म्हणजे नक्की काय भानगड असते हे माहीत नाही ते आम्हांला सेंद्रिय शेतीचे महत्व सांगतात. जो खरा खानदानी शेतकरी आहे त्यालाच माहीत गावरान गाय नक्की किती दूध देते? आणि लाथा किती मारते?...!!!*

*🌹गावरान गायचे दूध तीच्या वासरालाच पुरत नाही तर त्याचे तूप कधी काढायचे? रामदेव बाबाने हा प्रताप केला आहे. घंट्याचे देशी तूप! तुम्हीं आणि तुमची लेकरं आता आजारी पडायला लागला आहात म्हणून तुम्हांला शेंद्रिय शेतीचा पुळका आला आहे...!!!*

*🌹जा शेतकऱ्याच्या बांधावर जा. जसे देवळात जाऊन देवाला आणि पुजाऱ्याला दान देता तसे शेतकऱ्याला (त्याच्या घामाचे मोल) दान द्या. तोच तुमची खरी अन्न देवता आहे...!!!*

*🌹शेती हे तुमचेही आणि त्याचे ही मंदिर आहे!! तुमची शेतकरी देवता तुम्हीं निवडा कारण त्यांच्या नावावर जशी देवाच्या नावावर पुजारी मलिदा हादडतो तसे शेतकऱ्याच्या नावावर मलिदा हडपणारे देखील कमी नाहीत...!!!**

*🌹शेतकऱ्याला म्हणा तुला तुझ्या हक्काचे पैसे देतो तू चांगला माल पीकव. पहा तो पिकवतो का नाही ते?...!!!* 

*🌹त्याला फक्त अक्कल शिकवू नका. त्याला ही चांगले वाईट कळते. तुमच्या ताटात येणाऱ्या फळे भाजीपाल्यावर औषधें फवारायची त्याला काही मुद्दाम हौस नाही... तुमच्याच हव्यासापायी त्याला कर्जबाजारी होऊन आत्महत्या करायला तुम्हीच भाग पाडले. कोण पोसणार त्याच्या पोराबाळांना...!!!*

*🌹ज्यादा उत्पन्नासाठी हायब्रीड वान आणले. त्याच्यासोबत कीड-रोग सुद्धा दिले. किड आणि रोगावर औषध मारता-मारता शेतकरी स्वतः मरू लागला त्याला जबाबदार कोण. माझ्या मायबापांनो आता तरी डोळे उघडा आणि शेतकऱ्याला त्याच्या हक्काचे द्या. तो तुम्हाला भरभरून देईल...!!!*



🌹🙏🌹 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*🌹तळतळाट कुणाचाही घेऊ नका, आयुष्य दुःखात जाईल*🙏

*🌹एखाद्याला हा विषय पटणार नाही पण ज्यांनी अनुभव घेतला असेल त्यांना मात्र नक्कीच पटेल.. जर कोणी कोणाला वैवाहिक, शारीरिक, मानसिक, आर्थिक किंवा कोणत्याही प्रकारचा त्रास त्याच्या सहनशक्तीच्या पलीकडे देत असेल, कोणाचं निष्पाप मन दुखावलं जात असेल, कोणावर निष्कारण अन्याय होत असेल किंवा कोणत्याही प्रकारचा धोका, छळवणूक होत असेल व त्यामुळे त्या व्यक्तीला असह्य मानसिक वेदना होत असतील तर* *"त्या व्यक्तीच्या मनातून कळत नकळत कोणताही चमत्कार किंवा दैवी शक्ती नसताना एक प्रचंड अफाट अज्ञात मानसिक नकारात्मक ऊर्जा शक्ती निघते व समोरच्या व्यक्तिमध्ये शोषली जाते त्यालाच आपण तळतळाट किंवा हाय लागणे म्हणू शकतो...!!!"*

 *🌹मग समोरच्या व्यक्तिचेही अपेक्षेनुसार कार्य यशस्वी होत नाही आणि झाले तरी ते बिघडते. आयुष्यात आपण किती खरे-खोटे वागलो हे फक्त दोन व्यक्तींना माहित असते एक म्हणजे परमात्मा आणि दुसरी आपली अंतरात्मा. त्यामुळे तुम्ही कितीही परिपूर्ण असाल तरीही तुमच्यामुळे एखाद्याच्या मनाचा दाह होत असेल तर तुमच्या आयुष्याचा एक तरी कोपरा तुम्हाला नक्कीच अपुरा भेटेल...!!!*

 *🌹एक वेळेस खिशात खळखळाट नसेल तरीही चालेल पण कोणाचा तळतळाट घेऊ नका. आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या पण स्वतःच्या स्वार्थासाठी व फायद्याकरता किंवा सुखाकरता इतरांना दुखवू नका, दुसऱ्यांचा तळतळाट व हाय घेऊ नका...!!!*




🌷🌹🌺🌷🌹🌺🌷🌹🌺🌷

*🌻मला काय झालं हे संमजतच नाही असे जेव्हा वाटते, तेव्हा पण मनासारखं काहीच घडत नाही, कशातच मन लागत नाही, कधी वाटतं सोडुन पाश सारे,खुल्या आसमंतात उडान भरावे,नको कसलीच बंधन, नको कुणाची काळजी. नको ती नाती, नको कुणामधे ही गूणतूंन राहणे...!!!*

*🌻प्रत्येक गोष्टीला मर्यादा असतात,पण माझ्याकडे सगळंच अमर्याद सुखाचे क्षण असो की दुखाचा डोंगर ,माणसांच अयुष्यात येण असो की ,दुर जाण कसलीच मर्यादा नाही...!!!*

 *🌻सगळंच कसं समजण्यापलीकडेच आहे. कोण म्हणतं तुटल्यावर आवाज झाला,घरभर काचा पसरलेल्या तरच वेदना जाणवते, हे सर्वांनाच समजत,पण मनाच काय ते तुटत हे खरय पण त्याचा आवाज होत नाही म्हणून काय मनाला वेदना होत नाहीत. मी तुटले पण खळकण आवाज नाही आला ,म्हणजे मला दुखापत नाही झाली आसे होत का. मला तर असं वाटतंय तुला जाणूनच नाही घ्यायचय...!!!*
 
*🌻मला ही मन आहे,मला ही भावना आहेत मग का नाही समजुत घेत कोणी माझ्या जिवाची होणारी घालमेल का नाही जाणीव होत माझ्याच माणसाला माझी होणारी घुसमट. दोघांच्या समंतीने नात विणल होत ना, मग निर्णय तु एकटयाने का घेतला.चुरगळलेल्या स्वप्नाचे कागद हवेत ऊडवून देताना तुला काहीच कसे नाही वाटले,एक नजर टाकून जाताना पहिलय तुझ्या डोळयात, तुझ तटून पडण...!!!*

*🌻तुझे जड झालेले पाय, तुझ्या ओठाआड लपलेले अबोल शब्द , तुझ्या पाणावलेल्या डोळयात साठलेल माझ प्रतिबिंब लख्ख दिसतय,तरी ही तुझ मला नाकारण नाही समजत,का आणि कशासाठी हा अट्टाहास. मला नाही का कळणार तुझ्यातला बदल. तुझ्यातील प्रत्येक बदल मला रोज तीळ तीळ मारतोय, तुझे रोजचे नविन आघात सहन होण्या पलीकडे आहेत.पण ठरलच तुझ दुर जायचं तर मी ही नाही थांबवणार...!!!*

*🌻तुटलेली नाती कितिही बांधायचा प्रयत्न केला तरी गाठ दिसणारच मग कशाला हा व्यर्थ अटाहास. चंद्राच्या साक्षीने जेव्हा चादंणी प्रकाशमान होईल तेव्हा आठवणी तुझ्याही उजळतील तेव्हा तरी स्वतःच्या मनाला देशील का खर उत्तर, पहा जमेल का ते,स्वताशी खरे बोलणे...!!!*



🌹🙏🌹 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...