Saturday, November 12, 2022

समाजास घडविण्यास प्रामाणिक, निष्ठावंत, विद्वान शिक्षकांचे खरे योगदान

 📓📔📒📕📗📘📙📚📖🧮

*🌺समाजास घडविण्यास प्रामाणिक, निष्ठावंत, विद्वान शिक्षकांचे खरे योगदान आहे...!!!*🙏✒️🖌️🖋️🖊️🖊️🖍️✏️🧮
                  
*✒️शिक्षक जेंव्हा शाळेत असताना बुकं शिकत होता,तेंव्हा तु बावळ्यासारखा शाळेतून पळून जात होतास.आणि आता शिक्षकी पेशावर भरभरून बोलताना पातळी सोडतोस...!!*

*✒️कधी पालक म्हणुन शाळेत आलास तर माझ्या पोरावर लक्ष ठेवा म्हणतोस......."सर,मी नाही शिकलो पण निदान पोराला तरी शिकवणार."असे अपेक्षेने म्हणतोस.आणि घरी गेल्यावर माव्याची पुडी लेकरालाच आणायला सांगतोस...!!*

*✒️शाळेत शिक्षकाला भांडताना पोरासमोर अद्वातद्वा बोलतो आणि मग तेच पोरगं लाडाऊन वाया जातं,तेंव्हा शिक्षकाची आठवण काढतोस...!!*

*✒️पण यार मित्रा,एखाद्या लग्नात पाहुण्यांच्या सत्कारासाठी शिक्षकाच्याच हातात माईक सोपवतोस...!!*

*✒️निवडणुकीत फुशारक्या मारत राडा करतोस पण मशिनची बटणं दाबताना गोंधळून जातोस...!!*

*✒️पोरांवर संस्कार चांगले होतील म्हणुन शिक्षक कॉलनीत रहायला उत्सुक असतोस,पण चार माणसात शिक्षकाचा पगार काढतोस...!!*

*✒️शिक्षकासारखा चिकट कुणीच नाही म्हणतोस,पण लेकीसाठी जावई हटकून शिक्षकच शोधतोस...!!*

*✒️वर्षभर पोरासमोर करु नाही ते करतोस,आणि मग बोर्डाच्या परीक्षेत खिडकीतून उडी मारुन पोराला कॉप्या पुरवतोस...!!*

*✒️अरे लॉकडाऊनमध्ये एक पोरगं सांभाळताना नाकी नऊ आले म्हणतोस,आणि भरगच्च वर्गात शिकवणा-या शिक्षकाला मास्तरडा म्हणतोस...!!*

 *✒️शिक्षकाला टोचून बोलताना,डबल इंजिन आहे म्हणतोस; पण इंजिनाच्या मागे निघणाऱ्या धुराकडे सोयिस्कर दुर्लक्ष करतोस...!!*

*✒️अरे मुलांच्या को-या पाटीवर आम्ही ओव्या लिहतोय तर तु त्याच्यासमोर शिव्या का लिहितोयस...!!*

*✒️शिक्षक आहे उद्याच्या भारताचा मैलाचा दगड म्हणुनच एखाद्या शिक्षकाने नमस्कार केला तर त्याला कमी समजु नकोस...!!*

📚 *चेक पोष्ट आणि विलगीकरणाची ड्युटी केली.* 
📚  *घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी केली.*
 📚 *विद्यार्थ्यांचे आधार लिंक केले.* 
📚 *प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली.*
📚 *ऑन लाईन क्लास घेतले.*
📚 *शालेय पोषण आहार वाटून कार्यालयीन कामे केली.*
 📚 *ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे राष्ट्रीय कर्तव्य केले.*
📚 *बीएलओ ची कामं केली.*
 📚 *कित्येक शिक्षकांचे कोविडमध्ये बळी गेले.*
📚 *कोविड निधीसाठी एक  दिवसाचे वेतन देऊन संवेदनशीलता दाखवली.*

*✒️मित्रा,माफ कर पण हे बघ आम्हाला तुझा राग धरुन चालणार नाही,कारण आम्हांला तुझ्या पाल्याला  उच्चविद्याविभुषीत झालेलं पहायचय,.*

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...