










*आयुष्यात " संकटं "आलीच पाहिजेत, तसेच "समस्याही" निर्माण झाल्या पाहिजेत, त्यामुळे "कठीण काळ "आला पाहिजे... तेव्हाच अशावेळीच माणसाला खरंतर कळून येतं की आपण समाजात कसे वागले पाहिजे...*
*संकटाच्यावेळी किंवा माणुस अडचणीत असताना कोण आपला "हात सोडून" मध्येच पळून जाते, आणि कोण आपला "हात " धरून आपली शेवटपर्यंत "साथ " देते ते पाहा आणि विचार करा तेव्हाच समजेल आपल्याला खरे नक्की कोण फसवत आहेत...!*
*आपला खरा मित्र.. सच्चा दोस्त*
*हा "ढालीसारखा " असतो आणि असलाच पाहिजे... तो संकटकाळात, आणीबाणीच्या प्रसंगी तुमच्या "पुढे " असतो. इतर वेळी... तो "मागे " असतो...!! असा ही मित्र लाभणे ही दुर्लभ गोष्ट आहे.*
*आयुष्यात कितीतरी प्रसंगी... आपल्याला डिप्रेशन आल्यासारखे वाटते... कुठलीतरी अनाकलनीय निराशा मनाला वेटोळे घालते... ग्रासून टाकते... अशावेळी... तुम्हाला दाटून आलेले मन कुणाजवळ तरी मोकळे करावेसे वाटत असते...*
*विश्वासाने मान आपल्या माणसाच्या खांद्यावर ठेवावी असे वाटत असते. पण... तसे होत नाही..*
*तुम्ही कितीही मोकळ्या स्वभावाचे, बोलके असला तरी... मन मोकळे करायला "आपल्या माणसाची" सोबत तुम्हाला लाभतेच असे नाही.. विश्वासाने मान ठेवावी खांद्यावर असा "विश्वासच" भेटत नाही...*
*नेहमी "जवळ" असणारी माणसं "आपलीच" असतील, याचा भरवसा असतोच असे नाही...! अशावेळीच तुमची खरी कसोटी असते...!*
*कधीकधी दूर असणारी व्यक्ती आपली असते... तुम्हाला समजून घेणारी, तुमची शुभचिंतक असते.. फक्त ती ओळखणे आणि जपणे महत्त्वाचे...मग.. तुम्ही तुमचं मन अशा व्यक्तीजवळ मोकळे करू शकता... तुमचा त्या व्यक्तीशी संवाद झाला पाहिजे व आपण देखील त्या व्यक्तिशी जवळचे संबंध ठेवले पाहिजेत ..*
*एकदा तुमचं साचलेलं मन मोकळे झाले... मनातले मळभ कमी झाले की... निराशेची ओहोटी सुरू होईल... तुमच्या मनाला खूप हलके वाटेल, आणि तुम्ही आपले ध्येय नक्कीच गाठू शकतो..*
*तुमच्यापेक्षाही अनेकांना विविध दुःखानी वेढलेलं असते व आहेत.. याची तुम्हाला जाणीव होईल. आणि मग त्यामुळे तुम्हाला मनाला एक नवा हुरूप व चैतन्य वाटेल तुम्हाला जगण्याला बळ येईल...*











: 





















*मानवी जीवन जगत असताना,*
*मनुष्याच्या जीवनात,*
*अनेक प्रकारच्या चिंता* *आहेत.*
*जन्माला आल्यापासून मरेपर्यंत,*
*मनुष्याच्या जीवनात अनेक प्रकारच्या चिंता असतात.*
*त्या चिंता करत करत मनुष्य,*
*आपलं जीवन कसतरी जगतो.*
*आयुष्यभर मनुष्याला,*
*चिंता कमी व्हाव्या असं वाटत असतं.*
*परंतु चिंता काही कमी होत नाही.*
*चिंता कशाने कमी होतील,*
*यावर मनुष्य आयुष्यभर विचार करतो.*
*शोधाशोध करतो.*
*धावपळ करतो.*
*परंतु चिंता कमी होताना दिसत नाही.*
*परंतु चिंता कमी करण्याचे,*
*औषध संताजवळ आहे.*
*संत महात्मे सांगतात,*
*चिंता कमी करायची असेल,*
*तर चिंतन करणं महत्त्वाचं आहे.*
*माणसं चिंतन करतात,*
*पण जे चिंतन करायचं,*
*ते करत नाही.*
*मनुष्याच्या जीवनातील चिंता,*
*ही भगवत् चिंतनाने कमी होते.*
*उदा:- उत्तरेच्या गर्भामध्ये,*
*वाढत असलेला परीक्षेतीला,*
*मारण्याकरता अश्वत्थाम्याने,*
*ब्रह्मास्त्र सोडले,*
*परंतु उत्तरेने भगवंताचं,*
*चिंतन केलं म्हणून,*
*चिंता संपली.*
*द्रौपदीचे वस्त्रहरणावेळी,*
*द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाचे,*
*चिंतन केलं.*
*त्यामुळे चिंता संपली.*
*अशा अनेक गोष्टी आहेत,*
*म्हणुन मनुष्याने मिळालेला काळ,*
*भगवत चिंतनामध्ये घालवावा.*
*काळ सारावा चिंतने ।*
*एकांतवासी गंगा स्नाने ।।*
*देवाच्या पूजने ।*
*प्रदक्षणा तुळशीच्या ।।*
*मिळालेला काळ हा,*
*भगवंत चिंतना मध्येच गेला पाहिजे*
*चिंतनाने चिंता संपते,*
*म्हणूनच नाथ महाराज सुद्धा,*
*म्हणतात.*
*आवडीने भावे हरिनाम घेसी ।*
*तुझी चिंता त्यासी सर्व आहे ।।*
*तो भगवंत आपली सर्व प्रकारची चिंता करतो आहे.*
*मुंगी पासून ब्रह्मदेवापर्यंत,*
*सगळ्या जीवाचा,*
*सांभाळ करणारा तो भगवंत आहे.*
*म्हणून आपण आपला सर्व,*
*भार भगवंतावर टाकावा,*
*व भगवंताचे चिंतन करावे.*
*चिंता केल्याने,*
*मनुष्य आणखीन बलहीन होतो.*
*तर उलट भगवंताचे चिंतन केल्यानंतर मनुष्य तेजस्वी होऊन,*
*आपलं जीवन व्यवस्थित जगू शकतो.*
*म्हणून मनुष्य जीवनात,*
*भगवंताचे नामस्मरण करून,*
*आपल्या जीवनाचा,*
*आपणच उद्धार करावा.*
*सध्या अनेक चर्चा चालू असून,*
*कोरोना महामारीने परत,*
*डोकं वर काढले आहे.*
*परंतु याही काळामध्ये,*
*आपल्याला ऊर्जा देण्याचे काम,*
*भगवत चिंतन करू शकते.*
*भगवंताचे नांव अतिशय श्रेष्ठ आहे.*
*आकाशापेक्षा नाम मोठे आहे.*
*माऊली म्हणतात.*
*ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड ।*
*गगनाहूनी वाड नाम आहे ।।*
*म्हणून नाम जप आपण करावा.*
*नाम जपता चंद्रमौळी ।*
*नामे तरला वाल्याकोळी ।।*
*अश्या अनेकांचा उद्धार,*
*नामानेच झालेला आहे.*
*चांगल्या माणसांचा उद्धार,*
*नामाने तर होतोच,*
*परंतु राक्षसांचा सुद्धा उद्धार,*
*नामस्मरणाने केला आहे.*
*मन स्थिर करण्याचे साधन,*
*म्हणजे नाम आहे.*
*चिंता कमी करण्याचे एकमेव साधन,*
*म्हणजे भगवंताचे नाम आहे.*
*नामाने जड दगड तरले आहेत.*
*तरले तरती हा भरवसा ।*
*नामधारकाच्या ठसा ।।*
*म्हणून चिंता करू नका,*
*काळजी करू नका,*
*नामस्मरण करा.*
*हेच महत्त्वाच आहे,*
*आपला उद्धार होईल,*
*यात तिळमात्र शंका नाही...!!*
*आयुष्य खुप सुंदर आहे. सर्वानी आनंदात जगा, आपला समाजातील माणसांवर जिव्हाळा कायम राहो.....!!!*
.










: 





















*
मणुष्य जन्मापासून मरेपर्यंत आपला स्वतःचा स्वार्थ पाहुनच कर्म करीतच जगत आलेला आहे. मग जे गरजेपेक्षा खुप जास्त कमावलेले असते ते फ़क्त स्वतःची प्रतिष्ठा, अहंकार, मोठेपणा व अभिमान या साठीच असते व आहेत ते सर्व व्यर्थ जाणार आहे हे माहीत असून कुणीही त्याचा त्याग करीत नाहीत. तरी त्याचे ते पुढे काय करणार??? मग जगायचं, कमावयाचे तर ते कुणासाठी????*
मणुष्य जन्मापासून मरेपर्यंत आपला स्वतःचा स्वार्थ पाहुनच कर्म करीतच जगत आलेला आहे. मग जे गरजेपेक्षा खुप जास्त कमावलेले असते ते फ़क्त स्वतःची प्रतिष्ठा, अहंकार, मोठेपणा व अभिमान या साठीच असते व आहेत ते सर्व व्यर्थ जाणार आहे हे माहीत असून कुणीही त्याचा त्याग करीत नाहीत. तरी त्याचे ते पुढे काय करणार??? मग जगायचं, कमावयाचे तर ते कुणासाठी????**
माणूस जन्माला येतो, लहानाचा मोठा होतो. पुढे सुख दुःखाची अनेक वादळे झेलत आयुष्य जगतो. पण.. आयुष्य जगतो?, कशासाठी जगतो? आणि कुणासाठी जगतो? याची मात्र त्याला काहीच कल्पना नसते. पोटाची खळगी भरण्यासाठी आयुष्यभर काबाडकष्ट करतो. पैसा मिळवण्यासाठी कुठेतरी नोकरी करतो, लहान-सहान उद्योग, धंदा, व्यवसाय व इतर छोटी मोठी कामे करतो, अंगमेहनतिचीही कामे करतो. तरी लोक पूर्वी 80-90 वर्षांचे आयुष्य जगायचे, पण आता 60-70 वर्षेच जगतो आणि मरून जातो. मेल्यानंतर कुटुंबीय, नातेवाईक चार दिवस रडतात आणि विसरून जातात. मेल्यानंतर पृथ्वीतलावरचं आपलं अस्तित्व मात्र कायमचंच संपुष्टात येतं... आपण कितीही चांगले असलो तरी मेल्यानंतर आपली आठवण ही फक्त १५/२० दिवसांपुरतीच असते... कारण आपण जगलेलो असतो ते केवळ आपल्या कुटुंबापुरतंच. मी व माझं कुटुंब एवढंच आपलं जग असतं...!!!*
माणूस जन्माला येतो, लहानाचा मोठा होतो. पुढे सुख दुःखाची अनेक वादळे झेलत आयुष्य जगतो. पण.. आयुष्य जगतो?, कशासाठी जगतो? आणि कुणासाठी जगतो? याची मात्र त्याला काहीच कल्पना नसते. पोटाची खळगी भरण्यासाठी आयुष्यभर काबाडकष्ट करतो. पैसा मिळवण्यासाठी कुठेतरी नोकरी करतो, लहान-सहान उद्योग, धंदा, व्यवसाय व इतर छोटी मोठी कामे करतो, अंगमेहनतिचीही कामे करतो. तरी लोक पूर्वी 80-90 वर्षांचे आयुष्य जगायचे, पण आता 60-70 वर्षेच जगतो आणि मरून जातो. मेल्यानंतर कुटुंबीय, नातेवाईक चार दिवस रडतात आणि विसरून जातात. मेल्यानंतर पृथ्वीतलावरचं आपलं अस्तित्व मात्र कायमचंच संपुष्टात येतं... आपण कितीही चांगले असलो तरी मेल्यानंतर आपली आठवण ही फक्त १५/२० दिवसांपुरतीच असते... कारण आपण जगलेलो असतो ते केवळ आपल्या कुटुंबापुरतंच. मी व माझं कुटुंब एवढंच आपलं जग असतं...!!!* *
सुंदर असा लेख सर्वांनी आवश्य वाचावा असा आहे. मग ठरवा नक्की जगावं तरी कुणासाठी?...!!!*
सुंदर असा लेख सर्वांनी आवश्य वाचावा असा आहे. मग ठरवा नक्की जगावं तरी कुणासाठी?...!!!* *
तर जगावं तर ते समाजासाठी तुम्ही जगाच्या कोणत्या समस्या सोडवता? तुम्ही काय उभारता? तुम्ही कुणाच्या तरी कामी येता का? यालाच तुमच करियर म्हणतात. तर तुम्ही स्वतःच्या पलीकडे जाऊन जेव्हा विचार करता त्याला उच्च शिक्षण असं म्हणतात... करियर म्हणजे केवळ नोकरी मिळवणं किंवा व्यवसायात प्रगती करणं एवढाच संकुचित विचार नसावा... समाजाचा विचार करून जगणं म्हणजेच आयुष्य होय...!!!*
तर जगावं तर ते समाजासाठी तुम्ही जगाच्या कोणत्या समस्या सोडवता? तुम्ही काय उभारता? तुम्ही कुणाच्या तरी कामी येता का? यालाच तुमच करियर म्हणतात. तर तुम्ही स्वतःच्या पलीकडे जाऊन जेव्हा विचार करता त्याला उच्च शिक्षण असं म्हणतात... करियर म्हणजे केवळ नोकरी मिळवणं किंवा व्यवसायात प्रगती करणं एवढाच संकुचित विचार नसावा... समाजाचा विचार करून जगणं म्हणजेच आयुष्य होय...!!!**
खूप पैसा, गाडी, बंगला, दागदागिने आहेत म्हणून एखादा माणूस श्रीमंत असतो असं मुळीच नाही. चांगल्या स्वभावाचा, चांगल्या विचारांचा माणूस हाच खरा सर्वात श्रीमंत असतो. पैसा, गाडी, बंगला ही तर केवळ क्षणिक व भौतिक सुखाची साधने आहेत... यातील एकही वस्तू तुम्ही मेल्यानंतर तुमच्या सोबत घेऊन जाऊ शकत नाहीत. सोबत नेता ते तुमचं कर्म, तुमच्याप्रति असलेली समाजाची आपुलकी, आणि वर्षानुवर्षे काढली जाणारी तुमची आठवण हिच आयुष्यभराची कमाई असते...!!!*
खूप पैसा, गाडी, बंगला, दागदागिने आहेत म्हणून एखादा माणूस श्रीमंत असतो असं मुळीच नाही. चांगल्या स्वभावाचा, चांगल्या विचारांचा माणूस हाच खरा सर्वात श्रीमंत असतो. पैसा, गाडी, बंगला ही तर केवळ क्षणिक व भौतिक सुखाची साधने आहेत... यातील एकही वस्तू तुम्ही मेल्यानंतर तुमच्या सोबत घेऊन जाऊ शकत नाहीत. सोबत नेता ते तुमचं कर्म, तुमच्याप्रति असलेली समाजाची आपुलकी, आणि वर्षानुवर्षे काढली जाणारी तुमची आठवण हिच आयुष्यभराची कमाई असते...!!!* *
आजवर पैशाने खूप श्रीमंत असणाऱ्या एखाद्या व्यक्तीची आपण आठवण काढतो असं मला तरी वाटत नाही... पण समाजासाठी झटणारे साधुसंत आणि अनेक थोर समाजसेवक आजही आपल्या स्मरणात आहेत. कारण ते जगले होते समाजासाठी. त्यांनी समाजाला काहीतरी दिलं म्हणूनच आजवर त्यांच्या आठवणी जिवंत आहेत...!!!*
आजवर पैशाने खूप श्रीमंत असणाऱ्या एखाद्या व्यक्तीची आपण आठवण काढतो असं मला तरी वाटत नाही... पण समाजासाठी झटणारे साधुसंत आणि अनेक थोर समाजसेवक आजही आपल्या स्मरणात आहेत. कारण ते जगले होते समाजासाठी. त्यांनी समाजाला काहीतरी दिलं म्हणूनच आजवर त्यांच्या आठवणी जिवंत आहेत...!!!**
उदाहरण घ्यायचच झाल तर आताच दोन दिवसांपूर्वी आपण ज्यांची पुण्यतिथी साजरी केले ते "संत गाडगेबाबा"... काय होतं त्यांच्याकडे फक्त हातात एक खराटा, डोक्यावर फुटलेल्या मडक्याच खापर आणि अंगावर फाटका सदरा...पैश्याचा तर विषयच नव्हता...चलनाचं एक नाणंसुद्धा खिशात नसायचं. गाव झाडत फिरायचं आणि एखाद्याने दिलेला भाकर तुकडा खाऊन आयुष्य जगायचं. पण त्यांनी जगाला अनमोल शिकवण दिली ती स्वच्छतेची आणि अंधश्रद्धा निर्मूलनाची. याच विचारांमुळे आज ते अजरामर झाले...!!!*
उदाहरण घ्यायचच झाल तर आताच दोन दिवसांपूर्वी आपण ज्यांची पुण्यतिथी साजरी केले ते "संत गाडगेबाबा"... काय होतं त्यांच्याकडे फक्त हातात एक खराटा, डोक्यावर फुटलेल्या मडक्याच खापर आणि अंगावर फाटका सदरा...पैश्याचा तर विषयच नव्हता...चलनाचं एक नाणंसुद्धा खिशात नसायचं. गाव झाडत फिरायचं आणि एखाद्याने दिलेला भाकर तुकडा खाऊन आयुष्य जगायचं. पण त्यांनी जगाला अनमोल शिकवण दिली ती स्वच्छतेची आणि अंधश्रद्धा निर्मूलनाची. याच विचारांमुळे आज ते अजरामर झाले...!!!**
आपणही समाजात असं काही करतो का? समाजाला काही देतो का? भले नसेल आपली महती साधुसंतांएवढी कि लोक आपल्याला वर्षानुवर्षे लक्षात ठेवतील. पण निदान एक पिढी तरी लक्षात ठेवेल एवढं कर्तुत्ववान व्हावं प्रत्येकाने एकमेकांचा राग, द्वेष करत आयुष्य घालवण्यापेक्षा चांगलं रहायला शिका...!!!*
आपणही समाजात असं काही करतो का? समाजाला काही देतो का? भले नसेल आपली महती साधुसंतांएवढी कि लोक आपल्याला वर्षानुवर्षे लक्षात ठेवतील. पण निदान एक पिढी तरी लक्षात ठेवेल एवढं कर्तुत्ववान व्हावं प्रत्येकाने एकमेकांचा राग, द्वेष करत आयुष्य घालवण्यापेक्षा चांगलं रहायला शिका...!!!* *
ज्या कुटुंबासाठी आज जगतोय आपण, ज्या मुलांना लहानाचं मोठं करतोय...तीच मुलं तुम्हाला म्हातारपणात सांभाळतीलच याची कुठलीही शाश्वती नाही... म्हातारे झाल्यावर आई-बाप काम काहीच काम करत नाहीत म्हणून त्यांना एखाद्या वृद्धाश्रमात नेवून ठेवलं जातं...!!!*
ज्या कुटुंबासाठी आज जगतोय आपण, ज्या मुलांना लहानाचं मोठं करतोय...तीच मुलं तुम्हाला म्हातारपणात सांभाळतीलच याची कुठलीही शाश्वती नाही... म्हातारे झाल्यावर आई-बाप काम काहीच काम करत नाहीत म्हणून त्यांना एखाद्या वृद्धाश्रमात नेवून ठेवलं जातं...!!!**
बालपणासारखंच तुमचं म्हातारपणही जाईल असंही नाही. बालपणी लाड होतात तर म्हातारपणी हाल-अपेष्टाही सहन कराव्या लागतात. ज्या मुलांसाठी जगलो तीच मुले एका क्षणात परके करून जातील... या सगळ्यानंतर जीवनाच्या शेवटच्या क्षणी प्रश्न पडतो कि आपण आयुष्यभर जगलो ते कुणासाठी?....*
बालपणासारखंच तुमचं म्हातारपणही जाईल असंही नाही. बालपणी लाड होतात तर म्हातारपणी हाल-अपेष्टाही सहन कराव्या लागतात. ज्या मुलांसाठी जगलो तीच मुले एका क्षणात परके करून जातील... या सगळ्यानंतर जीवनाच्या शेवटच्या क्षणी प्रश्न पडतो कि आपण आयुष्यभर जगलो ते कुणासाठी?....**
समाजासाठी जगा...*
समाजासाठी जगा...**दान-धर्म करा, भुकेल्या माणसांना अन्न द्या. आनंदात जगून घ्या... फिरावंस वाटलं तर भरपूर फिरून घ्या. म्हातारपणी फिरावंस वाटल तरी तुमच शरीर मात्र साथ देणार नाही. येताना एकटे असलो तरी जाताना मात्र सर्वांचे होऊन जाण्यातच खरी मजा आहे...!!!*










जगामध्ये मोडतोड करणारी व तडजोड करणारी अशी दोन प्रकारची माणसे असतात.*
' *मोडेन पण वाकणार नाही ' अशा वृतीची किंवा ' एक घाव दोन तुकडे करणारी 'उध्दट मूर्ख माणसे ही सर्व मोडतोड करणार्या माणसातच जमा होतात.*
*मोडतोड करायला काही अक्कल लागत नाही तर तडजोड करायला माणसाजवळ शहाणपण लागते.*
*मोडतोड करणारी माणसे अहंकारी असतात तर तडजोड करणारी माणसे विवेकी असतात*.
*मोडतोड करणारी माणसे जीवनात अपयशी ठरतात तर तडजोड करणारी माणसे जीवनात यशस्वी होतात.*
*'जीवनाला दु:खाचा तडा जाऊ न देता सुखाची जोड करणे' म्हणजे तडजोड.*
*-- सदगुरु श्री वामनराव पै.*









*..........सुप्रभात.........*
*पु. ल. म्हणतात -*
*खर्च झाल्याचं दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो...*
*शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो...बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो...*
*माणूस अपयशाला भीत नाही...अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर? याची त्याला भिती वाटते...*
*रातकिडा कर्कश ओरडतो यात वादच नाही, त्याचा त्रास होतो...*
*पण त्याहीपेक्षा जास्त त्रास तो कुठे बसून ओरडतो हे सापडत नाही, याचा होतो...*
*सगळे वार परतवता येतील पण अहंकारावर झालेला वार परतवता येत नाही आणि पचवताही येत नाही...*
*कोणत्याही सुखाच्या क्षणी आपण होशमध्ये असणं यातच त्या क्षणाची अपूर्वाई आहे...*
*रातराणीचा सुगंध पलंगावर लोळता लोळता उपभोगू शकतो. पण तुळस वृंदावनातच राहते... तिच्यापुढे आपल्यालाच उभं राहावं लागतं...*
*आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की समजावं आपला उत्कर्ष होतोय...*
*ज्यांच्या असण्याला अर्थ असतो, त्यांच्याच नसण्याची पोकळी जाणवते...*
*आयुष्य फार सुंदर आहे...*
*ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे...*
*माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे...*
*शिळ्या भाकरीला आणि तुटक्या चप्पलला कधी नावं ठेवायची नाहीत.. कारण,* *भाकरी आज शिळी आहे तिनं काल आपलं पोट भरलं होतं..आणि चप्पल आज तुटली तिने काल आपल्याला आधार दिला होता...!!*
*म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ति ही फार मोलाची आहे फक्त तिची किंमत ही सुख दुःखाची वेळ आल्यावरच कळते.
*
* *स्वतःशीच वाद कराल तर सर्व प्रश्नांची उत्तरं सापडतील जर दुसर्यांशी वाद घालाल तर नवीन प्रश्न उभे राहतील..*

*शुभ सकाळ* 

*आपला दिवस आनंदमय जावो* 
=============================================
*
आपण आयुष्यात निस्वार्थीपणे राहावे, आपल्या चांगुलपणाचा कोणी फायदा घेईल एवढे साधे पण राहु नये...!!!*

आपण आयुष्यात निस्वार्थीपणे राहावे, आपल्या चांगुलपणाचा कोणी फायदा घेईल एवढे साधे पण राहु नये...!!!*

*
आपण आपल्या सगळ्याच नात्यात कितीही समजून, सांभाळून, जपून कितीही चांगले वागत असलो तरी काही लोक फक्त आपल्या वागण्यात, कामात, शब्दात, किंवा विचारात कुठेतरी चूक काढून अडचणीत आणण्यासाठी काही मिळते का?? म्हणून फक्त चुकाच शोधून आपल्याला पकडण्यासाठीच त्यांना बसलेले आहेत का?? असे वाटत असतात. म्हणजे आपल्या ध्यानी मनी नसलेल्या गोष्टींनी सुद्धा कोणी दुखावून घेत असतं...!!!*
आपण आपल्या सगळ्याच नात्यात कितीही समजून, सांभाळून, जपून कितीही चांगले वागत असलो तरी काही लोक फक्त आपल्या वागण्यात, कामात, शब्दात, किंवा विचारात कुठेतरी चूक काढून अडचणीत आणण्यासाठी काही मिळते का?? म्हणून फक्त चुकाच शोधून आपल्याला पकडण्यासाठीच त्यांना बसलेले आहेत का?? असे वाटत असतात. म्हणजे आपल्या ध्यानी मनी नसलेल्या गोष्टींनी सुद्धा कोणी दुखावून घेत असतं...!!!**
आपल्याला सगळी माणसं नेहमीच महत्त्वाची वाटत असतात. आपल्याला आपली माणस म्हणून आपण त्यांना दरवेळी स्पष्टीकरणं देत राहात असतो. आपण कधी त्यांची चटकन माफीही मागून टाकतो. आपल्या स्वतःच्या इगोपेक्षा आपली माणसं महत्त्वाची हे तत्त्व आपण डोक्यात ठेवून वागत असतो. पण हे असेच सतत घडत राहीले तर तो आयुष्याच्या पोरखेळ होऊन बसतो...!!!*
आपल्याला सगळी माणसं नेहमीच महत्त्वाची वाटत असतात. आपल्याला आपली माणस म्हणून आपण त्यांना दरवेळी स्पष्टीकरणं देत राहात असतो. आपण कधी त्यांची चटकन माफीही मागून टाकतो. आपल्या स्वतःच्या इगोपेक्षा आपली माणसं महत्त्वाची हे तत्त्व आपण डोक्यात ठेवून वागत असतो. पण हे असेच सतत घडत राहीले तर तो आयुष्याच्या पोरखेळ होऊन बसतो...!!!**
आपण जपून तरी नेहमी किती वागावं हा प्रश्न नेहमी पडत असतो??, मग आपल्या नात्यात एक अदृश्य भीती तयार होत असते..!! अरे आपण थोडंसं जरी चुकलो तरी आपल्याला कोणी तरी आपल्या काहीतरी बोलणार, ओरडणार अशी सतत आपल्या डोक्यावर ही देखील टांगती तलवार राहते...!!!*
आपण जपून तरी नेहमी किती वागावं हा प्रश्न नेहमी पडत असतो??, मग आपल्या नात्यात एक अदृश्य भीती तयार होत असते..!! अरे आपण थोडंसं जरी चुकलो तरी आपल्याला कोणी तरी आपल्या काहीतरी बोलणार, ओरडणार अशी सतत आपल्या डोक्यावर ही देखील टांगती तलवार राहते...!!!**
आपल्याकडून काही नकळत एखादी चूक किंवा गोष्ट घडली, जिच्यामागे आपला कोणाला मुद्दाम हेतूत: दुखावण्याचा उद्देश नसला तरी कोणीतरी आपल्याबद्दल गैरसमज करून देणार/घेणार आहेच. तो आपल्याला आरोपीच्या पिंजऱ्यात निष्कारण उभं करणार आहे. आणि हीच भीती आपल्या नात्यात मोठाल्या भिंती उभ्या करीत असते. या अश्या गोष्टी अगोदारच सुरु झालेल्या असतात व यातून नाती तुटण्याची प्रक्रिया कधीच सुरू झालेली असते...!!!*
आपल्याकडून काही नकळत एखादी चूक किंवा गोष्ट घडली, जिच्यामागे आपला कोणाला मुद्दाम हेतूत: दुखावण्याचा उद्देश नसला तरी कोणीतरी आपल्याबद्दल गैरसमज करून देणार/घेणार आहेच. तो आपल्याला आरोपीच्या पिंजऱ्यात निष्कारण उभं करणार आहे. आणि हीच भीती आपल्या नात्यात मोठाल्या भिंती उभ्या करीत असते. या अश्या गोष्टी अगोदारच सुरु झालेल्या असतात व यातून नाती तुटण्याची प्रक्रिया कधीच सुरू झालेली असते...!!!**
तरीही आपण नातेसंबंधात चिवटपणे आपल्या माणसांसाठी तग धरून राहिलेलो असतो. कारण आपल्याला आपल्या नात्यातील माणसांसोबत राहायच असत, आयुष्यातलं प्रत्येक माणसांचं मोल फार अधिक वाटलेलं असतं. म्हणून आपण त्यांना मनःपासून त्यांच्या चूका पोटात घालून सांभाळीत असतो. त्याच्याच सोबत आपल्याला जगायचे ही असते असे आपण समजतो, पण तीच माणसे आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊन आपल्या विरुद्ध कटकार्यस्थान करीत असतात हेच फार मोठ दुखः मनात वाटत असत..!!!*
तरीही आपण नातेसंबंधात चिवटपणे आपल्या माणसांसाठी तग धरून राहिलेलो असतो. कारण आपल्याला आपल्या नात्यातील माणसांसोबत राहायच असत, आयुष्यातलं प्रत्येक माणसांचं मोल फार अधिक वाटलेलं असतं. म्हणून आपण त्यांना मनःपासून त्यांच्या चूका पोटात घालून सांभाळीत असतो. त्याच्याच सोबत आपल्याला जगायचे ही असते असे आपण समजतो, पण तीच माणसे आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊन आपल्या विरुद्ध कटकार्यस्थान करीत असतात हेच फार मोठ दुखः मनात वाटत असत..!!!**
आपल्याला जेव्हा समजते की आपलीच माणसे आपल्या विरोधात जाऊन आपल्या विरोधात वागत असतात तेव्हा मन खुप असह्य होत असते. त्यावेळी आपल्याला त्यांचे स्पष्टीकरणं नको वाटतं. आपणच फक्त वारंवार रिव्हर्स गिअरवर जाऊन कोणाची तरी सतत समजुत काढीत बसणं योग्य वाटत नाही. तेव्हा असे वाटते की 'जाणाऱ्याला कधी अडवू नये असे म्हणतात,' असं एका सुहृद व्यक्तीने मला सांगितलेलं आठवते...!!!*
आपल्याला जेव्हा समजते की आपलीच माणसे आपल्या विरोधात जाऊन आपल्या विरोधात वागत असतात तेव्हा मन खुप असह्य होत असते. त्यावेळी आपल्याला त्यांचे स्पष्टीकरणं नको वाटतं. आपणच फक्त वारंवार रिव्हर्स गिअरवर जाऊन कोणाची तरी सतत समजुत काढीत बसणं योग्य वाटत नाही. तेव्हा असे वाटते की 'जाणाऱ्याला कधी अडवू नये असे म्हणतात,' असं एका सुहृद व्यक्तीने मला सांगितलेलं आठवते...!!!**
ज्यांना आपल्या जवळचे समजतो त्यांना आपल्यासोबत आयुष्यभर चांगले संबंध ठेऊन राहायचं आहे, ज्यांना आपण कोणत्याही अटी शर्तीशिवाय हवे आहोत, जे लोक आपण त्यांना हवे आहोत ते पन जसे आहात तसे म्हणजे as it is असण्यावर मनःपासून वाटते त्यांच्यावर सोबत निस्वार्थीपणे कायम प्रेम करत राहावे. त्यांना आयुष्यात आवर्जून वेळ देऊन आयुष्यभर सांभाळून मेंटेन करीत राहावे...!!!*
ज्यांना आपल्या जवळचे समजतो त्यांना आपल्यासोबत आयुष्यभर चांगले संबंध ठेऊन राहायचं आहे, ज्यांना आपण कोणत्याही अटी शर्तीशिवाय हवे आहोत, जे लोक आपण त्यांना हवे आहोत ते पन जसे आहात तसे म्हणजे as it is असण्यावर मनःपासून वाटते त्यांच्यावर सोबत निस्वार्थीपणे कायम प्रेम करत राहावे. त्यांना आयुष्यात आवर्जून वेळ देऊन आयुष्यभर सांभाळून मेंटेन करीत राहावे...!!!**
आपल्याशी जे नेहमी वाईट वागत असतील तर त्यांना आपल्या आयुष्यात कधीच थांबू देऊ नये. जे लोक आपल्या आयुष्यात येताना परतीचा दरवाजा उघडा ठेवूनच आले आहेत, जे मनापासून अस्थिर आहेत, सतत पुढे पुढे करुन आपला सर्व गोष्टींचा फायदा घेऊन पुढे गेलेत, तेच पुन्हा त्यांच्या आयुष्यात (Reversed) फार मागे जात आहेत, अशा लोकांनी 'मी तुमच्या आयुष्यातून जातो/जाते' म्हटल्यावर त्यांना थांबण्याचा फार आग्रह करूच नये. तसं केल्याने फार तर तेवढी वेळ टळू शकते, आजच मरण उद्यावर ढकलणं इतकाच त्याचा अर्थ राहतो...!!!*
आपल्याशी जे नेहमी वाईट वागत असतील तर त्यांना आपल्या आयुष्यात कधीच थांबू देऊ नये. जे लोक आपल्या आयुष्यात येताना परतीचा दरवाजा उघडा ठेवूनच आले आहेत, जे मनापासून अस्थिर आहेत, सतत पुढे पुढे करुन आपला सर्व गोष्टींचा फायदा घेऊन पुढे गेलेत, तेच पुन्हा त्यांच्या आयुष्यात (Reversed) फार मागे जात आहेत, अशा लोकांनी 'मी तुमच्या आयुष्यातून जातो/जाते' म्हटल्यावर त्यांना थांबण्याचा फार आग्रह करूच नये. तसं केल्याने फार तर तेवढी वेळ टळू शकते, आजच मरण उद्यावर ढकलणं इतकाच त्याचा अर्थ राहतो...!!!**
ज्यांना जायचंच आहे ते काहीतरी निमित्त व कारणे देऊन कधी ना कधी ते आपल्या आयुष्यातून जाणारच असतात. तेथे आपण अडकून आपलीच ऊर्जा वाया घालवत बसू नये. त्या नात्याला 'कृष्णार्पणमस्तु' असेच म्हणावं आणि पुढे आपल्या ध्येयाकडे चालत राहावे...!!!*
ज्यांना जायचंच आहे ते काहीतरी निमित्त व कारणे देऊन कधी ना कधी ते आपल्या आयुष्यातून जाणारच असतात. तेथे आपण अडकून आपलीच ऊर्जा वाया घालवत बसू नये. त्या नात्याला 'कृष्णार्पणमस्तु' असेच म्हणावं आणि पुढे आपल्या ध्येयाकडे चालत राहावे...!!!**
आपल्या वागण्याने कोणी दुखावेल का? ही सततची भीती मनात बाळगण्याऐवजी आपला हा विश्वास मनात असू द्यावा की 'जे लोक माझे आहेत, जे माझ्यावर विनाशर्त मनःपासून प्रेम करतात', माझ्यावर कायम विश्वास ठेवतात, ते लोक मला समजून घेतील. माझ्याकडून नकळत काही चुकलं तरी मला चटकन आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणार नाहीत. कारण त्यांना माहित आहे की, माझी कृती आणि माझे शब्द यापेक्षा माझे त्यांच्याप्रती असणारे माझ्या मनातील भाव जास्त महत्त्वाचे आहेत...!!!*
आपल्या वागण्याने कोणी दुखावेल का? ही सततची भीती मनात बाळगण्याऐवजी आपला हा विश्वास मनात असू द्यावा की 'जे लोक माझे आहेत, जे माझ्यावर विनाशर्त मनःपासून प्रेम करतात', माझ्यावर कायम विश्वास ठेवतात, ते लोक मला समजून घेतील. माझ्याकडून नकळत काही चुकलं तरी मला चटकन आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणार नाहीत. कारण त्यांना माहित आहे की, माझी कृती आणि माझे शब्द यापेक्षा माझे त्यांच्याप्रती असणारे माझ्या मनातील भाव जास्त महत्त्वाचे आहेत...!!!**
जी आपली माणस मनाने निर्मळ आणि निरपेक्ष आहेत. त्यांना अनावधनाने कधी एखादा अप्रिय शब्दही जरी मुखातून नकळत जातो, मग आपल्यालाच वाटतं की माझ्या मनात नसताना अशी चूक झालीच कशी?, त्यावेळी 'आपली' माणसं आपल्याला कानकोंडं होण्याची वेळ येऊ देत नाहीत...!!!*
जी आपली माणस मनाने निर्मळ आणि निरपेक्ष आहेत. त्यांना अनावधनाने कधी एखादा अप्रिय शब्दही जरी मुखातून नकळत जातो, मग आपल्यालाच वाटतं की माझ्या मनात नसताना अशी चूक झालीच कशी?, त्यावेळी 'आपली' माणसं आपल्याला कानकोंडं होण्याची वेळ येऊ देत नाहीत...!!!**
प्रत्येक माणसाचे '"शब्द हे फसवे असतात, शब्द हे रडवे ही असतात तर कधी शब्द हे हसरे ही असतात. आपण नेहमी विश्वास आपल्या माणसांच्या वृत्तीवर ठेवावा, तात्कालिन त्यांच्या शब्दांवर नाही'", हे जी माणसे जाणून असतात. ती आपल्या अशा नकळत होणाऱ्या चूका समंजसपणे पोटात घालत असतात. अशा माणसांच्या भल्यासाठी आपल्याला कितीही पावलं मागे यावं लागलं तरी चालेल तेव्हा तेच केलेल बेहतर असते...!!!*
प्रत्येक माणसाचे '"शब्द हे फसवे असतात, शब्द हे रडवे ही असतात तर कधी शब्द हे हसरे ही असतात. आपण नेहमी विश्वास आपल्या माणसांच्या वृत्तीवर ठेवावा, तात्कालिन त्यांच्या शब्दांवर नाही'", हे जी माणसे जाणून असतात. ती आपल्या अशा नकळत होणाऱ्या चूका समंजसपणे पोटात घालत असतात. अशा माणसांच्या भल्यासाठी आपल्याला कितीही पावलं मागे यावं लागलं तरी चालेल तेव्हा तेच केलेल बेहतर असते...!!!**
माझा अहंकार मनातील इगो या नात्यांपेक्षा कधीच मोठा नसेल हे मनाशी असू द्यावं. मलासुद्धा इतरांसाठी असं समंजस माणूस म्हणून असावे असे वाटालेच पाहिजे, असे ही नेहमी मनाशी पक्कं असू द्यावं...!!!*
माझा अहंकार मनातील इगो या नात्यांपेक्षा कधीच मोठा नसेल हे मनाशी असू द्यावं. मलासुद्धा इतरांसाठी असं समंजस माणूस म्हणून असावे असे वाटालेच पाहिजे, असे ही नेहमी मनाशी पक्कं असू द्यावं...!!!**
"'अतिविचार"' हे एक स्ट्रॉंग पॉयझन आहे. ह्याला काय वाटेल, तिला काय वाटेल आणि त्यांना काय वाटेल...!! या विचारात आपले आयुष्यच संपून जातं, पण आपल्याला जगण्याचा आनंद काही घेता येत नाही. आपले हेतू मनःपासून शुद्ध व प्रमाणिक असतील तर कोणाला काय वाटेल याचा आपण फार जास्त विचार करत बसूच नये...!!!*
"'अतिविचार"' हे एक स्ट्रॉंग पॉयझन आहे. ह्याला काय वाटेल, तिला काय वाटेल आणि त्यांना काय वाटेल...!! या विचारात आपले आयुष्यच संपून जातं, पण आपल्याला जगण्याचा आनंद काही घेता येत नाही. आपले हेतू मनःपासून शुद्ध व प्रमाणिक असतील तर कोणाला काय वाटेल याचा आपण फार जास्त विचार करत बसूच नये...!!!**
ज्यांचं आपल्यावर प्रेम आहे ते मोकळेपणाने आपल्या चुका सांगतील, आपले मुद्दे समजून घेतात आणि सुधारण्याची संधी देतात. जे आपले नाहीत ते नेहमी आपली कुठेतरी काहीतरी छोटोशी चूक मिळते का?? हे शोधत राहतील व आपली शेंडी कशी हातात सापडेल या प्रयत्नात राहतील. निमित्त काढून नात्याचा कडेलोट करण्याचा बेशरम प्रयत्न करीत राहातील. त्यांचा विचार करीत तुम्ही बसु नका...!!!*
ज्यांचं आपल्यावर प्रेम आहे ते मोकळेपणाने आपल्या चुका सांगतील, आपले मुद्दे समजून घेतात आणि सुधारण्याची संधी देतात. जे आपले नाहीत ते नेहमी आपली कुठेतरी काहीतरी छोटोशी चूक मिळते का?? हे शोधत राहतील व आपली शेंडी कशी हातात सापडेल या प्रयत्नात राहतील. निमित्त काढून नात्याचा कडेलोट करण्याचा बेशरम प्रयत्न करीत राहातील. त्यांचा विचार करीत तुम्ही बसु नका...!!!* *
आपल्या नात्यांना मोकळेपणानं सामोरं जाऊया. आपलं कोण, परकं कोण हे काळाच्या परीक्षेत सिद्ध होतंच असते. त्यावेळी काय पकडून ठेवायचं आणि हातून काय निसटू द्यायचं हे फक्त आपणास ठरवता यायलाच पाहिजे...!!!*
आपल्या नात्यांना मोकळेपणानं सामोरं जाऊया. आपलं कोण, परकं कोण हे काळाच्या परीक्षेत सिद्ध होतंच असते. त्यावेळी काय पकडून ठेवायचं आणि हातून काय निसटू द्यायचं हे फक्त आपणास ठरवता यायलाच पाहिजे...!!!* *
'let it go' is a powerful chant. It makes you more light, so you can fly high...!!!*
'let it go' is a powerful chant. It makes you more light, so you can fly high...!!!*3: 

















*!! प्रामाणिकपणा !!*
*प्रामाणिक लोकांनी एकदा मन लावून वाचाच....*
*कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असताना जसजशी प्रगती सुरु होते तसतसा छुपा विरोध हा वाढू लागतोच; सुंदर वेलीच्या खोडावर बांडगुळ वाढावा तसा. हा निसर्गाचाच नियम आहे. पण आपल्याला त्याची पुसटशीही कल्पना नसते. मग तुमची प्रगती डोळ्यात सलते आणि डोक्यात भनाणु लागते तेव्हा कारस्थानांच्या बिया पेरल्या जातात. खुरटय़ा विचारांचे कावळे एकत्र जमू लागतात आणि तुंम्हाला कमी लेखण्याची संधी शोधू लागतात.*
*मग तुमच्यावर आरोप होतात- गैर व्यवस्थापनाचे, गैर कारभाराचे, भ्रष्टाचाराचे,गैरजिम्मेदारीचे, असे लोक आपल्याला अप्रत्यक्ष विरोध करत असतात, तुमच्यातला चांगुलपणा झाकुन,तुंम्ही किती वाईट आहात हे दाखविण्यासाठी तुमच्यातल्या ऊनिवा ओरडुन सांगत छुप्या चर्चा सुरु होतात !*
*सत्यनिष्ठ, प्रामाणिक लोक कामाच्या ओझ्याने दबून जात नाहीत ; पण मिथ्या आरोपांच्या हल्ल्यामुळे खचून जातात. त्यांच्या आत्मविश्वासाला तडा जातो आणि मग प्रत्युत्तरे देण्याच्या घाईगर्दीत तो आजवर सांभाळलेले संतुलन गमावून बसतो. खरे नुकसान हे या क्षणाला होते.*
*अशावेळी शांत रहाने ही समंजस पणाची भूमिका आहे. प्रत्युत्तर देणे, आवाज चढवणे म्हणजे एका अर्थी होणाऱ्या आरोपांना स्वीकृती देण्यासारखेच ठरते. प्रत्येक प्रत्युत्तराची एक वेळ असते. अपमान विसरायचे नसतात, तर ते मनाच्या हळव्या कोपऱ्यात जपायचे असतात.*
*यश पचविणे एक वेळ सोपे; पण आरोप रिचवणे खूप कठीण.*
*आरडा ओरड करायला शक्ती लागत नाही, ती शांत रहायला लागते. अशावेळी बाळगलेले मौन हे तुमच्या दुर्बलतेची निशाणी नसून तुमच्या आत्मिक शक्तीचा तो साक्षात्कार आहे. तुमच्या शांत रहाण्यात तुमचा पराभव नसतो, तर ती तुमची प्रगल्भता असते.*
*द्वेष भावनेने तुमच्यावर आरोप करणाऱ्यांचे तुमच्या विरुद्ध कट कारस्थान रचनारांचे कालांतराने पितळ उघडे पडतेच आणि सत्य काय ते समाजाला समजते.त्यांना प्रति उत्तर न, देता यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने तुमचा वेळ आपल्या कार्यात लावल्याने तुंम्ही बरीच प्रगती केलेली असते तर जे तुमच्या सतत प्रगतिशील वाटचालीस पहात त्यांच्या कुटिल वृत्तीमुळे पारावरच हात चोळत जैसे थे स्थितित रसातळाला जात असतात व काळ त्यांना योग्य ती शिक्षा देत असतो*
*शेवटी काय तर ''आपण प्रत्येकाच्या दृष्टीने चांगले असू शकत नाही,, ''पण आपण त्यांच्यासाठी उत्कृष्ट आहोत जे आपल्याला चांगले समजतात,,*
*''माणसाने स्वत:च्या नजरेत चांगलं असलं पाहीजे. लोकांचे काय ते तर देवालापण अपेक्षित स्वार्थासाठी व गरजेपुरतच पुजतात*
*जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही.*
*तेंव्हा ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करतात.*
*त्यामुळे प्रत्येक वेळेस तुम्हाला लोकांची साथ मिळेलच असे नाही,*
*कधीकधी एकटे पण लढावे लागते,पण असे लढा कि साथ न देणारे पण हात जोडून प्रणाम करतील*
*आयुष्य खुप सुंदर आहे. सर्वानी आनंदात जगा, आपला समाजातील माणसांवर जिव्हाळा कायम राहो.....!!!*










No comments:
Post a Comment