Saturday, November 12, 2022

 *🎤सूत्रसंचालनास उपयुक्त काही चारोळ्या...*

*1)येवु कशी मी नांदायला(शौचालयावर आधारीत..)*
स्वच्छतेचा बघा वसा
चला हो सारे घेवुया
शौचालय दारी बांधुनी
निर्मळ,सुंदर अवघा भारतदेश घडवुया...
शौचालयासाठी रुसुन बसलेल्या गृहिणीचं म्हणणे ऐकुया येवु कशी कशी मी नांदायला या गीतातुन...

*2)आई तुझी मुर्तिवाणी..*
 तुच ग आहे जननी
तूच आहे महिषासुरमर्दिनी
लढण्या बळ दिले सर्वास
तुच आहेस रणरागिनी
अशा जगन्मातेची स्तुती करणाऱ्या गीताचे सादरीकरण करीत आहे...

*3)तंबाखुविरोधी नाटिका...*
तंबाखू गुटखा बीडी सिगारेट
क्षणिक सुखाचा आभास
विळखा व्यसनाचा लागता
करती जीवनाचा विनाश...
अशा तंबाखू खाण्याचा दुष्परिणाम सांगताय या नाटिकेतुन...

*4)स्वागतगीत...*
हर्ष उल्हास आणि आनंदाने
स्वागत सर्व मान्यवरांचे...
सोहळ्याच्या शुभसमयी या
गाणी गातो सुस्वागताचे...
ऐकुया मधुर आवाजात स्वागतगीत...

*5)ईशस्तवन...*
विविध अडचणींवर मात करण्या
सदैव असते परमेश्वराची साथ
म्हणुनच कोणत्याही कार्यारंभी हवा
ईष्टदेवतांचा हो मंगल आशिर्वाद...
करीता ईशस्तवन सादर करीत आहे.....

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...