Saturday, November 12, 2022

 



*🍁दिवसाच्यावेळी कंदील जरी सूर्याची बरोबरी करू शकत नसला, तरी अंधारात त्याच कंदीलाच महत्व सूर्याइतकच असतं. माणसाचं देखील तसेच आहे, सत्तेवर असताना व सत्तेवरून खाली आल्यानंतर त्यांचीही तशीच अवस्था होते. त्यामुळे स्वतःला कधीच कमी समजू नका...!!!*
    
  *🍁आपल्या आयुष्यात कोण येणार ही "वेळ" ठरवते.. आयुष्यात कोण यायला पाहिजे हे "मन" ठरवते, पण आयुष्यभर कोण टिकून राहणार हे मात्र आपला "स्वभावाच" ठरवतो. म्हणून आपण वेळ, मन व स्वभाव सांभाळा सर्व चांगलेच होईल..!!!* 

*🍁छत्तीसच्या आकड्याचा विचार केला तर, तीन आणि सहा दोन्ही आकडे एकमेकांकडे कधीच पहात नाहीत. दोघेही टाईट पणाने पाठीला पाठ लावून उभी आहेत. एकमेकांचं तोंडही पहात नाहीत...!!!*

*🍁त्याप्रमाणे माणसांच असतं. छत्तीसचा आकडा हा चाळिशीच्या आतला आहे. म्हणून चाळीशीच्या आत माणूस सुद्धा अहंकाराने, ताकदीने, पैशाने, परिपक्व असल्यामुळे तो नेहमीच अहंकारी असतो. कमीपणा घेत नाही. मला कोणाचीच गरज नाही, मी त्याचं तोंड पाहणार नाही, असे शब्द त्याच्या तोंडात असतात. सख्ये भाऊ पक्के वैरी होतात. आणि हातात हात न घेता पाठीला पाठ लावतात...!!!*
     
 *🍁आता ६३ आकडा पहा. या आकड्याने साठी ओलांडल्या मुळे आता हे दोघेही नम्र झालेत. दोन्ही आकडे एकमेकांकडे पाहतात. हातात हात घेतात. एकमेकाला आलिंगन देतात. माणसाचं असंच असतं, एकदा साठी ओलांडली की, नम्र होतो. कारण ना ताकद, ना तारुण्य, ना पैसा, ना सत्ता, काहीच राहत नाही. म्हणून हा नम्र होतो. तुम्ही पहा, माणूस तरुणपणी बालपण विसरतो, लग्न झाल्यावर आई वडिलांना विसरतो, मुलं झाल्यावर भावांना विसरतो, पैसा आला की आपले नातेवाईक विसरतो, आणि म्हातारपणी जेवढ्यांना विसरला त्यांची आठवण काढत बसतो. ६३ च्या आकड्या प्रमाणेच म्हणून जो आकडा बदलतच नाही त्या आकड्या प्रमाणे जगा...!!!*
 
*🍁संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे. कारण एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो...!!!*   

 *🍁वयाने कोणी कितीही लहान मोठा असु देत. वास्तवात तोच मोठा असतो, ज्याच्या मनात सर्वासाठी निस्वार्थी प्रेम, स्नेह व आदर असतो...!!!*

*🍁आयुष्यात तुमच्या सगळ्या अडचणी सोडवू शकेल अशी व्यक्ती कधीच शोधत बसु नका. हे जग स्वार्थी आहे, येथे मतलब बघुन माणसे जवळ येत असतात. तर तुम्हाला कोणत्याही अडचणीत कधीच एकटे सोडणार नाही अशी निस्वार्थी व्यक्ती शोधा, असे लोक खुप कमी भेटतील परंतु ते तुम्हाला कधीच एकटे पडू देणार नाहीत नेहमीच अडचणीत मदतीला धाउन येतात...!!!*

*🍁कुठल्याही शक्य असलेल्या कामाच्या सीमा जाणून घेण्यासाठी आपण प्रथम अशक्य कामाच्या सीमा शोधून त्यातील अडचणी सोडऊन त्यांच्या पुढे निघून जाण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.त्यामुळे यश तुमच्या सोबत येईल..!!!*
  
 *🍁 प्रत्येकाच्या जीवनात "आनंद" हे अमृत आहे, परंतु हे अमृत प्राप्त करून घेण्यासाठी त्याचे "मंथन" व "चिंतन" करणे आवश्यक आहे. तसेच दुःखाचे "मंथन" व "चिंतन" देखील केल्याने त्यातील आनंदरूपी विचारांचे अमृत प्राप्त केले पाहिजेत, इतर वाईट विचार मनातून काढून टाकले पाहिजेत...!!!* .
        
*🍁समाजात इतरांना खाली खेचणारा व्यक्ती ताकदवान नसतो तर खाली पडलेल्यांना उचलणारा व्यक्तीच खरा ताकदवान असतो... श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते, कायम टिकणारी गोष्ट एकच, ती म्हणजे "स्वभाव आणि माणुसकी..!!*" 
  

*🍁आयुष्य खुप सुंदर आहे. ते आनंदात जगा, आपला जिव्हाळा कायम राहो.....!!!* 

*🍁स्वतःची व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या*. *आपल्यामुळे कोणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या. व तसे वागा एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या.*

*जागृत राहा, सतर्क रहा, सुरक्षित रहा*. 

🌹🙏🌹 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
[2/18/2021, 11:47 AM] +91 94233 63843: 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

*🌳आपण ब-याच वेळा परगावी गेलो की परत आपल्या गावी केव्हां यायचे हे ठरलेले असते. तसंच आपण या जगात आलो आहोत तर परत जायचं आहे हे नक्की! पण मनुष्यस्वभाव.. लोभ, मोह, माया, प्रपंच सुटत नाही त्याचा हव्यास असतोच आणि हे करायच, ते राहिल ही आशा, अपेक्षा असतेच...!!!*

*🌳त्यामुळे या परतीच्या प्रवासाला मन पटकन तयार होत नाही. थोडा अध्यात्मिक व व्यावहारिक विचार केला तर लक्षात येईल की आता आपण पन्नाशीच्या नंतर आपले गृहस्थाश्रमातून वानप्रस्थाश्रमाकडे वाटचाल करण्याचे वय सुरू झाले आहे, पण आपण ते मान्य करत नाही. सरकारने सुध्दा सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन ठरवले आहे. म्हणजे शारीरिक व आरोग्य दृष्टीने सुद्धा आपण फिट नसतो. मग आपण आता नामस्मरणाकडे वळले पाहिजे. ते सुद्धा लगेच जमत नाही कारण लहानपण, तारूण्य, जबाबदारी, करिअर यापुढे याचा विचारच कधी केलेला नसतो. तर त्याची सवय खूप आधीपासून करावी लागते, तरच या वयात ते जमत...!!!*

*🌳आपण आपल्याला हवेसे वाटत असतो पण आपलेच जवळचे लोक याना नकोसे होतो. हे जे आपलं हवेपण-इतरांचे नकोसेपण यामध्ये जे अंतर असत, ते म्हणजे आपल्यावरच आपल प्रेम कमी होत नाही. तर मग कुठलतरी त्यांत मानसिकता आजारपण येत व ते स्वीकारावे लागते. हे नको असेल तर आपण त्या आधी आपल्यातूनच एक्झिट व्हायचे.. म्हणजे आपला सगळा मीपणा, अहंकार, सगळं सोडून द्यायच. दुस-यांना हवेसे वाटत असतानाच एक्झिट होणं म्हणजे जीवनाची इतिकर्तव्यता...!!!*

 *🌳 आपण सगळया जबाबदाऱ्या पुढच्या पिढीकडे सोपवून आपण फक्त "नामस्मरण" करत पुढील काळ आनंदात व्यतीत करायचा असतो. मोक्षप्राप्तीसाठी तेच तर महत्वाचे आहे, मग घाबरायचे कशाला? परतीच्या प्रवासाला सद्गुरू आपल्या पाठीशी असतातच, तेव्हां सर्व भार विश्वासाने त्यांच्यावर टाकून आपण निवांत राहायचं असत..! जय जय श्री राम!! जय जय श्रीराम...!!!*

*🌳आयुष्य सुंदर आहे.आनंदात जगा, आपला जिव्हाळा कायम राहो.....!!!* 

*🌳स्वतःची व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या*. *आपल्यामुळे कोणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या. व तसे वागा एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या.*

*जागृत राहा, सतर्क रहा, सुरक्षित रहा*. 

🌹🙏🌹 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...