Saturday, November 12, 2022

💐🌻💐🌻💐🌻💐🌻💐🌻💐


*☘️ आपणास समाजात कुणाच्याही वागण्या बोलण्याचा जर त्रास होत असेल, तर त्यांच्या बद्दल आपल्या मनातील असलेला आदर, प्रेम कमी करा...!!!*🌺☘️
 
*🍃 समाजातील कोणतीही व्यक्ती असो, तुमच्याशी विचित्र वागत असेल, तिने तुमचा कुठेही निष्कारण अपमान केला असेल, जाणून बुजुन दुर्लक्ष करीत असतील, तुम्ही केलेल्या उपकारांची त्यांना जाणीव होत नसेल किंवा त्यांना विस्मरण झालं असेल, तर अश्या लोकांशी जास्त जवळचे संबंध हळू हळू कमी करायला घ्या, पुढे त्यांच्याशी दुरून डोंगर साजरे या उक्ती प्रमाणे वागायला शिका व स्वतःला सावरायला शिका...!!!* 

*🍃 आपला जन्म झाला आहे, तो आपली मनातील प्रत्येक अपेक्षा पूर्ती होईलच असे नाही. तर काही अपेक्षा ह्या आपल्या जवळच्या माणसांकडून ही व्हायला पाहिजेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. परंतु त्या तश्या पूर्ण होतच नाहीत. अश्यावेळी उरतात त्या फक्त मनात बाळगलेल्यां स्वप्नातील अपेक्षा व त्यांची व्यथा. माझ्या मते हा जन्म अपेक्षापूर्तीसाठी नाही. ह्याच दृष्टिकोनातून आपण सगळ्या लहान मोठ्या घटनांकडे पाहण्याचा प्रयत्न करा.आणि आपल्या आनंदी जीवनाचा मार्ग शोधत चांगली कर्म करीत राहा, त्यातून तुम्हाला आनंद मिळेल...!!!*

*🍃 समाजातील बऱ्याच कुटुंबात मुलगा आणि सून सासु-सासऱ्याशी नीट आदराने बोलत नाहीत व वागत नाहीत आणि राहात नाहीत. हीसुद्धा समाजातील नवीन पिढीतील शोकांतिका आहे. तुम्ही कोणती तरी मागील कर्माची परतफेड करत आहात. कोणतीही व्यक्ती असो, तुमच्याशी विचित्र वागली, तिने तुमचा अपमान केला, दुर्लक्ष केलं, तुम्ही केलेल्या उपकारांचं कोणाला तरी विस्मरण झालं, तर एकेक करीत अश्या लोकांपासून दूर राहा, असं आजपासून स्वत:ला सांगायला लागा...!!!*

*🍃 आपलं मन जेवढं बलदंड असतं, तेवढंच ते लवचिकही असतं. त्या मनाला सांगायचं, बाबा रे आयुष्यभर तुझं ऐकलं, तुझ्या हुकुमात राहिलो. आता ही गुलामी मी सोडून देत आहे. आजपासून मी तुला मुक्त केले आहे, असे म्हणा...!!!*   

*🍃 आयुष्यात घेण्यापेक्षा देणं महत्वाचेआहे. शत्रुला क्षमा द्या. प्रतिस्पर्ध्याला सहिष्णुता द्या. मित्राला ह्रदय द्या. मुलांना तुमचं उदाहरण द्या. वडिलांना पुज्य भाव द्या. आईला तुमच्या चारित्र्याची भेट द्या...!!!*

*🍃 स्वत:ला आत्मसन्मान द्या, आणि जगाला सेवा द्या. प्रत्येकाला काहीतरी द्यायचंच आहे हे कधीच विसरू नका. घेणार-यापेक्षा देणा-यालाच प्रतिष्ठा मिळत असते. यासर्व गोष्टीला इतिहासही ह्याला साक्षी आहे...!!!*

*

🌳🌺🌳🌺🌳🌺🌳🌺🌳🌺🌳

  *🍁 आपले आयुष्यात जीवन हे अतिशय खुप सुंदर आहे. त्याचा अनुभव तुम्हास येत जाईल. प्रयत्न करायला विसरू नका; मार्ग तुम्हांला सापडत जाईल. आपले जीवन ही एक रंगभूमी आहे. जीवन म्हणजे दोन घडीचा डाव आहे. जीवन हा एक संघर्ष आहे. जीवनाच्या अनेक व्याख्या थोर पुरुषांनी केल्या आहेत. आपले जीवन हा एक अनुभवप्रवाह आहे. प्रत्येक व्यक्तीचे जीवना विषयीचे मत हे त्याला स्वत:ला येणार्‍या अनुभवांवर अवलंबून असते...!!!*    
    
*🍁 प्रत्येकाच्या जीवनात चढउतार हे हटकून येतच असतात. जीवन म्हणजे ऊन-सावलीचा खेळ असतो. सतत सुख किंवा सतत दु:ख असे क्वचितच आढळते. जाईल त्या क्षेत्रात कोणी मागे तर कोणी पुढे जात असतो अशी स्थिती आढळते...!!!*
      
*🍁 आपण नेहमी जीवनात गतिमानच असावे व प्रगतिपथावर राहावेच लागते. ही प्रक्रिया सुरू होण्यात व चालू राहण्यात जीवनाचे खरे सार्थक आहे. खरे म्हणजे जगण्याइतके आनंददायक असे जीवनात काहीच असू शकत नाही...!!!*
      
*🍁 प्रत्येकाच्या जीवनात सर्व कला, क्रीडा, साहित्य, संगीत, संशोधन हे जीवनाचे विलास आविष्कार आहेत. त्यात जे प्रयत्न करुन आवड़ निर्माण करुन रस घेतील त्यांना सविकल्प समाधानाचे सुख लाभेलच. परंतु हे सहज सौख्य काही माणसे कधी कधी विसरतात...!!!*
           
*🍁 आपण नेहमी खेळीमेळीच्या वातावरणात, विचारांच्या आकाशात, आपापल्या मतांचे पतंग समाजाच्या मैदानात सोडावेत आणि प्रसंगी काटावेत, पण हा ऐश्‍वर्यछंद रंगपंचमीप्रमाणे सुखद सोहळाच ठरावा असे राहावे व वागावे...!!!*
        
*🍁 प्रत्येक माणसाच्या जीवन प्रवासातील प्रेम या शब्दाला खूप महत्त्व आहे. प्रेम आणि जीवन यांचे अतुट असे नाते आहे. जीवन ही मानवाला लाभलेली अमोल देणगी आहे. तिचा चांगला उपयोग करणे महत्त्वाचे आहे. माणसाने केवळ क्षुल्लक दु:खाने व्यथित होऊन त्याचा शोक करत बसूच नये...!!!*
      
*🍁 आपण आयुष्यात समाजात जीवन जगताना एखाद्या आंधळ्याचा डोळा व्हावे, लंगड्याचा पाय व्हावे, अनाथाचे पालक सुद्धा व्हावे, दुसर्‍याला आनंद द्यावा. दुसर्‍यासाठी जगावे, आपण सुखात जगत असताना इतरांना सुद्धा तसे जगू द्यावे. जगता-जगता जीवनाकडे पाहावे, जमेल तेवढे जाणावे या जाणिवेचे गाणे गुणगुणत पुढे जात राहावे. त्यावेळी स्वत:ला विसरून वैयक्तिक पातळीवरून जीवनात वैभवाचा स्पर्श जरूर अनुभवावा...!!!*
  
*🍁 माणसाने नेहमी आनंदाने, समाधानाने जगण्याचा प्रयत्न करावा आणि जगावे. हे जग सुंदर व्हावे, यासाठी या जगात जाणीवपूर्वक व जाणतेपणाने रमावे. अशा जगण्यात आपल्या जिवनाचा नेहमी गौरवच आहे...!!!*

*🍁 माणसांजवळ विचारशक्ती आहे, आचारशक्ती आहे, सदसदविवेक बुद्धी आहे. त्यांचा जीवनात चांगल्या व योग्य कामासाठीच वापर करावा. आपल्या जीवनात एखाद्या आजाराप्रमाणे प्रवेश करणारा स्वार्थी खोटेपणा निपटून काढावा व आपण साधे, सरळ जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर "सत्यम शिवम सुंदरम" असेच जीवनब्रह्मचे रूप आपण आयुष्यभर सतत अनुभवत जगत राहाल...!!!*

*🍁 आयुष्य खुप सुंदर आहे. आनंदाने जगा, आपला जिव्हाळा असाच कायम राहो.....!!!* 

*स्वतःची व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या*. *आपल्यामुळे कोणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या. व तसे वागा एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या.*

*जागृत राहा, सतर्क रहा, सुरक्षित रहा*. 

🌹🙏🌹 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
[2/7/2021, 3:14 PM] +91 94233 63843: 🌺🙏🌹🌺🙏🌹🌺🙏🌹🌺🙏

*🌅प्रत्येक कामासाठी वेळेलाच जास्त महत्व असते, त्यासाठी प्रत्येकाने जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर वेळेलाच महत्व देऊन त्याप्रमाणे आवश्यक कार्य करावित...!!!🌄*

*🌻तुम्ही सकाळी किती वाजता उठता? झोपायला कितीही उशीर झाला, तरी रोज मी पाच वाजता उठतो! मोठी माणसं सांगायची, “लवकर निजे, लवकर उठे, त्यास खुप आयुष्य-आरोग्य लाभे !” आणि ते खरं आहे...!!!*

*🌻हेल एरॉल्ड नावाचं एक जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे, ते एक प्रचंड यशस्वी व्यावसायीक होते, मोठ्या जिद्दीने त्यांनी एका अपघातामुळे आलेल्या शारिरीक विकलांगतेवर मात केली होती. पण सन २००८ सालच्या जागतिक महामंदीत त्यांचा प्रचंड लॉस झाला, अब्जोपती हेल कर्जबाजारी झाला. पण तो हार मानणारा नव्हता, यातुन बाहेर कसं पडावं, हे विचारण्यासाठी तो आपल्या एका विश्वासु यशस्वी मित्राकडे गेला, मित्राने त्याला काय सल्ला दिला असेल बरं? ते पाहा👇...!!!*

*🌻“हेल, तु सकाळी लवकर उठ!” “बाकी सगळं आपोआप होईल” या चमत्कारिक सल्ल्याने हेल निराश झाला, त्याला काहीतरी आगळे वेगळे उपाय अपेक्षित होते, काही दिवस त्याने कसे बसे ढकलले, पण दिवसेंदिवस निराशा त्याला घेरत होती, मग नाईलाज म्हणुन त्याने सकाळी चार वाजता उठायची सुरुवात केली, आणि हेल सांगतो, त्याचं आयुष्यच बदलुन गेलं...!!!*

*🌻पहाट आणि सुर्योदय इतके जादुई असतात का? इतक्या सकाळी उठुन काय करावं? ह्या प्रश्नावर हेल यांनी एक सहा अक्षरी "SAVER" हा कोडवर्ड सांगितलाय...!!!*

*☘️🌹 ‘SAVERS’*🌺🌹
======================
*ह्या आयुष्य बदलुन टाकणार्‍या सहा सवयी आहेत.*💐🙏

*१)🌻 Silence – (ध्यान)* =
_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_
*ध्यान म्हणजे आपण शांत बसुन स्वतःच्या आत डोकावणे, म्हणजे ध्यान स्वतःच्या आतल्या चेतनेला स्पर्श करणे. मनाच्या कॉम्पुटरला फॉर्मेट करुन व्हायरस रिमुव्ह करणे म्हणजे ध्यान! मन प्रफुल्लीत आणि ताजतवानं करण्यासाठी आवश्यक असते ध्यान! माणसाच्या गरजा किती कमी आहेत, आणि सगळ्या चिंता किती व्यर्थ आहेत याची आत्मप्रचिती म्हणजे ध्यान! अफाट, अदभुत आणि आनंददायी विश्वशक्तीसोबत स्वतःला जोडून घेणे, आणि स्वतःच्या मन-शरीराचा कणकण प्रफुल्लित करवुन घेण्याची कृती म्हणजे ध्यान...!!!*
----------------------------------------
----------
*२)🌻 Affirmations – (सकरात्मक स्वयंसुचना)*=
_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_
*अफरमेशन्स म्हणजे स्वसंवाद! स्वतः स्वतःला सुचना देणं, प्रचंड शक्तिशाली असलेल्या अंतर्मनावर आपण निश्चित केलेलं ध्येय कोरणं! येत्या पाच वर्षात, येत्या एक वर्षात, पुढच्या एका महिन्यात, पुढच्या एका आठवड्यात, आणि आज दिवस भर मी काय काय करणार आहे, याचं मनातल्या मनात पुन्हा पुन्हा रिव्हीजन करणे म्हणजे स्वयंसुचना! स्वयंसुचनांमुळे कल्पना खोल अंतर्मनात झिरपतात, आणि नाटकीयरित्या सत्यातही उतरतात. अंतर्मनाची शक्ती प्रचंड असल्यामुळे तिथे रुजलेला प्रत्येक विचार मग तो चांगला असो की वाईट, खराच होतो. आपले पुर्वज म्हणायचे, शुभ बोल नाऱ्या!..किंवा जिभेवर सरस्वती असते, आपण बोलु तसेच घडते, जिभेवरचे देवता तथास्तु म्हणते, वगैरे वगैरे या सगळ्या अंधश्रद्धा नव्हत्या, ह्यामागे मनोविज्ञान आहे. एखादी गोष्ट हजारो वेळा बोलली तर ती अंतर्मनात प्रक्षेपित होते, मग अशुभ कशाला बोलायचे? वाईट बोलुन विनाशाला आमंत्रण देण्यापेक्षा, ‘या सुखांनो या’!...!!!*
------------------------------------------------------------
*३)🌻 Visualize – (चांगल्या कल्पना घोळवणे.)*=
-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-;-_-_-_-_-_-_-
*तीव्र इच्छा पुर्ण झाली आहे, अशी मनातुन कल्पना करणं, ती पुर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करणं आणि मनःपटला वर तिला बारीक सारीक रुपात साकारणं, म्हणजे व्हिज्वलायजेशन! कल्पनाशक्ती ही भगवंताने माणसाला दिलेली सर्वात अनमोल आणि सर्वात प्रभावशाली भेट आहे. कल्पनाशक्तीचा योग्य वापर केल्यास साधारण माणसाचं यशस्वी व्यक्तीमध्ये रुपांतर होतं. दररोज आपण आपली ध्येयं पुर्ण झाली आहेत, असं मनात घोळवलं पाहीजे. पोहण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदकांची रास उभी करणारा मायकेल फेल्प्स म्हणतो. ज्यावेळी मला झोप येऊ लागते, तेव्हा मला जे नक्की करायचे आहे, ते मनातल्या मनात बघण्याचा मी प्रयत्न करतो. ऑलंपिकविजेती एथलिट लेन बीचले म्हणाली होती, मागचे चार वर्ष मी एकच निकाल डोळ्यापुढे आणत होते, ते म्हणजे, मी हातात विजेतापदक घेऊन उभी आहे, आणि माझ्यावर शॅंपेनचा वर्षाव होत आहे. मायकेस स्मिथ म्हणाला, मी मला हवे असलेल्या स्वप्नाचे रेखाचित्र कागदावर रेखाटतो, स्वप्नांबद्द्ल टिपण लिहतो, आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्याला डोळ्यांसमोर उभे करतो. प्रसिद्ध उद्योगपती अझीम प्रेमजींना त्यांच्या यशाचे रहस्य विचारले तर ते म्हणाले, “यश दोनदा मिळते, एकदा मनात आणि दुसऱ्यांदा वास्तव जगात!” ...!!!*
-----------------------------------------------------------
*४)🌻 Exercise – (व्यायाम)*=
-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-
*शरीरातुन आळसाला पळवुन लावण्यासाठी, शरीरातील उर्जा वाहती ठेवण्यासाठी, मनाने कणखर आणि आनंदी राहण्यासाठी आवश्यक असतो, व्यायाम! शरीर आळसावलं की मन भ्रष्ट झालंच समजा! व्यायाम, योगासने, प्राणायाम यांच्या माध्यमातुन उर्जेला वळण न दिल्यास ती अतिरिक्त मैथुनाकडे वळते, आणि माणुस वासनांचा गुलाम बनतो. वाईट सवयींचा गुलाम झालेल्या माणसातले चैतन्य हरपते, अशा व्यक्तीला एकाकी असल्याची जाणीव अस्वस्थ करते. तो कशावरच एकाग्र होवु शकत नाही, आणि म्हणुन तो आनंदी होवु शकत नाही, मनात एक अनामिक भय तयार होते. ह्या सगळ्या दुष्ट श्रंखलेला तोडण्याचा एकच उपाय, तो म्हणजे, व्यायाम करा, डिप्स मारा, सुर्यनमस्कार घाला, पुलअप्स करा, ट्रेडमिलवर घाम गाळा, शरीरातले चैतन्य जिवंत ठेवा...!!!*
-----------------------------------------------------
*५)🌻 Reading – (वाचन)*=
-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-
*पुस्तकं वाचणारी माणसं एका आयुष्यात अनेक आयुष्य जगतात. पुढच्याच ठेस, मागचा शहाणा, ह्या न्यायाने दुसर्‍यांच्या अनुभवाने शहाणे होणारे लोक जगावर राज्य करतात. वॉरेन बफे, बिल गेटस, मार्क जुकरबर्ग हे सगळे आठवड्याला दोन पुस्तके वाचून पूर्ण करतात...!!!*
-------------------------------------------------------
*६)🌻 Scribing – (लिहिणे.)*=
-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-
*माझे ठाम मत आहे, की माझ्या आयुष्यातल्या खडतर काळात मी जर लिहीत राहीलो नसतो तर मी आज जिवंत राहीलो नसतो. लिहिल्याने तुमची तुमच्याशी नव्याने भेट होते. लिहिल्याने मन रिकामे होते, दुःख नाहीसे होते, मनात नव्या उर्जेचा संचार होतो. लिहल्याने नवे रस्ते उघडतात, नव्या प्रगतीच्या वाटा खुलतात. म्हणुन संतानी सांगून ठेवले आहे, दिसामाजी काहीतरी लिहीत जावे. लिहणं, हे सुद्धा स्वसंवादाचं प्रभावी साधन आहे. लिहिल्याने विचार पक्के होतात. सकाळी उठल्यावर आज दिवस भर मी काय करणार आहे, ते लिहावं, एखादी समस्या छळत असेल तर ती लिहून त्याचे उपाय लिहावेत, मनाला स्वप्नांच्या आकाशात मुक्त पणे पाठवुन कागदावर स्वप्ने रेखाटावीत. ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मी काय काय करणार आहे, त्याचं प्लानिंग, नियोजनही लिहावं, आणि रोज स्वतःला कामे नेमुन द्यावीत, आणि पुर्ण झाली की स्वतःला विजयी घोषित करावं. लिहिल्यानं मन मोकळं होतं, चिंतांचं ओझं हलकं हलकं होतं! जवळच्या व्यक्तीला पत्रं लिहावीत, कधी प्रेरणादायक किस्से कहाण्या लिहाव्यात. अशाने अंतरंग फुलुन येतात, उर्जेचा स्रोत खळखळत वाहतो...!!!*

*🌻ह्या सहा सवयींपैकी प्रत्येक सवय आयुष्य बदलुन टाकणारी आहे. वरील सहा सवयींपैकी किती सवयी तुम्ही स्वतःला लावुन घेतल्या आहेत. मला ह्या सगळ्या सवयींचा खूप खूप फायदा झाला . तुम्हालाही ह्या सवयी उपयुक्त ठरतील. नसतील तर वापरुन पहा...!!!*

*🌻आपण सुदैवाने म्हणा अथवा दुर्दैवाने म्हणा, पण आता आपल्यापैकी प्रत्येकाकडे भरपूर रिकामा वेळ आहे... तो वेळ नकारात्मक पोस्ट वाचून त्यावर चिंतन करण्यात वाया घालवावा की वरील पैकी कोणत्याही एका किंवा जमत असल्यास सर्वच गोष्टी अमलात आणण्यासाठी प्रयत्न करायचा हे सर्वस्वी आपणच ठरवायचे आहे... कोणतीही गोष्ट अंगवळणी पाडण्यासाठी किमान 21 दिवसांचा सराव आवश्यक असतो... आणि आपल्याकडे आता कदाचित 21 पेक्षा जास्त दिवस रिकामे असणार आहेत.. तेव्हा या वेळेचा सदुपयोग करून भावी जीवनासाठी सशक्त मन आणि सशक्त शरीर बनवू.... अशी वेळ व संधी पुन्हा येणार नाही व ती येऊ ही नये..... वेळ आहे स्वतःवर काम करण्याची.... स्वतःसाठी जगण्याची..... आलेल्या परिस्थीचा फायदा करून घेण्याची..... उगीचच मनात भीती उत्पन्न करणारे मेसेजेस फॉरवर्ड करण्यात आणि वाचण्यात वेळ वाया घालवू नका. आपल्या सर्व कामाची व आरोग्याची काळजी प्रत्येक वेळेतच घ्यायची आहे, आणि निष्कारण काळजी करायची नाही.*




🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹*

*आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी,*
*गुणकारी औषध म्हणजे, कानांपेक्षा डोळ्यांवर जास्त विश्वास ठेवा.*
*नाती जेवढी खोलवर जुळतात ना,*
*तेवढीच ती खोलवर जखमा पण देतात, काही नाती अशी असतात की, ती दोन जन्म सोबत राहून सुध्दा, कुठेतरी अपूर्ण असतात.*
*आणि काही नाती,*
*दोन क्षणांच्या भेटीत दोन जन्म पुरेल इतके प्रेम देऊन जातात.*
*चालता चालता कधीतरी ठेच लागणारच.*
*जगायचं म्हटल्यावर दु:ख हे असणारचं,*
*ठेच लागणार म्हणून चालणं का सोडायचं.*
*दू:ख आहे म्हणून जगणं का सोडायचं.*
*दु:खातही आनंदाला कोठे तरी शोधायचे.*
*आतून रडतानाही दुस-याला हसवायचं.*
*ह्यालाच तर जगणं म्हणायचं.*
*पैशाने पुर्ण झालेली स्वप्न, मरेपर्यत टिकतात. कष्टाने पुर्ण झालेली स्वप्न, इतिहास घडवतात.*
*स्वतःला असे काही बनवा,*
*जिथे तुम्ही असाल,*
*तिथे सर्वच तुमच्यावर प्रेम करतील,*
*तुम्ही निघुन गेलात,*
*तर तिथे तुमची कायमच आठवण काढतील,*
*आणि जिथे तुम्ही जाणार आहात,*
*तिथे सर्वच तुमची आतुरतेने वाट पाहतील...!!*

   *🙏🏻दंडवत प्रणाम🙏🏻*
: 🍃☘️🌷🍃☘️🌷🍃☘️🌷🍃☘️

*🌺 छान लेख आहे... जगायचं तर कुणासाठी... वेळ काढून आवर्जून आवश्य वाचा, आणि विचार करा...!!!*🌹💐🌻🙏

*माणूस जन्माला येतो, लहानाचा मोठा होतो. पुढे सुख दुःखाची अनेक वादळे झेलत आयुष्य जगतो. पण.. आयुष्य का जगतो?, कशासाठी जगतो? आणि कुणासाठी जगतो ? याची मात्र काहीच कल्पना नसते. पोटाची खळगी भरण्यासाठी आयुष्यभर काबाडकष्ट करतो. पैसा मिळवण्यासाठी कुठेतरी नोकरी करतो, लहान-सहान कामे करतो, अंगमेहनतिचीही कामे करतो. पूर्वी ८०/९० वर्षांचे आयुष्य जगायचा, आता ७०/८० वर्षे जगतो आणि मरून जातो. मेल्यानंतर कुटुंबीय, नातेवाईक चार दिवस रडतात आणि विसरून जातात. मेल्यानंतर पृथ्वीतलावरचं आपलं अस्तित्व मात्र कायमचंच संपुष्टात येतं... आपण कितीही चांगले असलो तरी मेल्यानंतर आपली आठवण ही फक्त १५/२० दिवसांपुरतीच असते... कारण आपण जगलेलो असतो ते केवळ आपल्या कुटुंबापुरतंच. मी, माझं कुटुंब एवढंच जग असतं आपलं...!!!*

*मग...जगावं तरी कुणासाठी ? तर... जगावं तर ते समाजासाठी... तुम्ही जगाच्या कोणत्या समस्या सोडवता? तुम्ही काय उभारता? तुम्ही कुणाच्या तरी कामी येता का? यालाच तुमच करियर म्हणतात. तर तुम्ही स्वतःच्या पलीकडे जाऊन जेव्हा विचार करता त्याला शिक्षण असं म्हणतात... करियर म्हणजे केवळ नोकरी मिळवणं किंवा धंदा, व्यवसायात प्रगती करणं एवढाच संकुचित विचार नसावा.. समाजाचा विचार करून जगणं म्हणजेच आयुष्य होय...!!!*

*आजपर्यंत ज्याच्याकडे खूप पैसा, गाडी, बंगला, दागदागिने आहेत म्हणून एखादा माणूस श्रीमंत असतो असं सगळेच समजत असतात परंतु तसे मुळीच नाही. चांगल्या स्वभावाचा, चांगल्या विचारांचा माणूस हाच खरा सर्वात श्रीमंत असतो. पैसा, गाडी, बंगला ही तर केवळ क्षणिक व भौतिक सुखाची साधने आहेत...!!!* 

*यातील एकही वस्तू तुम्ही मेल्यानंतर तुमच्या सोबत घेऊन जाऊ शकत नाहीत. सोबत नेता ते तुमचं कर्म, तुमच्याप्रति असलेली समाजाची आपुलकी, आणि वर्षानुवर्षे काढली जाणारी तुमची आठवण हिच आयुष्यभराची कमाई असते...!!!🙏*

*आजवर पैशाने खूप श्रीमंत असणाऱ्या एखाद्या व्यक्तीची आपण आठवण काढतो असं मला तरी वाटत नाही... पण समाजासाठी झटणारे ते छत्रपती शिवाजी महाराज आणि अनेक थोर समाजसेवक आजही आपल्या स्मरणात आहेत. कारण ते जगले होते समाजासाठी. त्यांनी समाजाला काहीतरी दिलं म्हणूनच आजवर त्यांच्या आठवणी जिवंत आहेत...!!!*

 *उदाहरण घ्यायचच झाल तर आताच काही दिवसांपूर्वी आपण ज्यांची पुण्यतिथी साजरी केले ते संत गाडगेबाबा... काय होतं त्यांच्याकडे... 🤔 फक्त हातात एक खराटा, डोक्यावर फुटलेल्या मडक्याच खापर आणि अंगावर फाटका सदरा. पैश्याचा तर विषयच नव्हता.. चलनाचं एक नाणंसुद्धा खिशात नसायचं. गाव झाडत फिरायचं आणि एखाद्याने दिलेला भाकर तुकडा खाऊन आयुष्य जगायचं. पण त्यांनी जगाला अनमोल शिकवण दिली ती स्वच्छतेची आणि अंधश्रद्धा निर्मूलनाची. याच विचारांमुळे आज ते अजरामर झाले..,!!!*

*आपणही समाजात असं काही करतो का? समाजाला काही देतो का? भले नसेल आपली महती छत्रपती शिवाजी महाराजांएवढी कि लोक आपल्याला वर्षानुवर्षे लक्षात ठेवतील. पण प्रत्येकाने निदान एक पिढी तरी आठवणीत लक्षात ठेवेल एवढं तरी कर्तुत्ववान व्हावं..,!!! 🙏

*एकमेकांचा राग, द्वेष करत आयुष्य घालवण्यापेक्षा चांगलं रहायला शिका. ज्या कुटुंबासाठी आज आपण जन्मलो व जगतोय, ज्या मुलांना लहानाचं मोठं करतोय.. तीच मुलं तुम्हाला म्हातारपणात सांभाळतीलच याची कुठलीही खात्री व शाश्वती नाही... म्हातारे झाल्यावर आई-बाप काहीच काम करत नाहीत म्हणून त्यांना एखाद्या वृद्धाश्रमात नेवून ठेवलं जातं, असे जास्त प्रमाणात शहरी भागात व थोड्या प्रमाणात ग्रामीण भागात दिसत आहे हे असे मुलांचे वागणे योग्य नाही...!!!*

*बालपणासारखंच तुमचं म्हातारपणही जाईल असंही नाही. बालपणी आई-वडिलांनी खुप लाड केलेले असतात पण म्हातारपणी हाल-अपेष्टाही सहन कराव्या लागतात. ज्या मुलांसाठी जगलो तीच मुले एका क्षणात आपल्याला परके करून दूर निघुन जातात हे दुर्दैव आहे...!!!*

*या सगळ्यानंतर जीवनाच्या शेवटच्या क्षणी प्रश्न पडतो कि आपण आयुष्यभर कमावले, सांभाळून ठेवले व ते सर्व जीव लाउन ठेवीत जगलो ते कुणासाठी?.🤔...!!!*

*आपली मूल नातेवाईक आपल्याशी जर नीट वागत नसतील तर आपण समाजासाठी जगा... दान-धर्म करा... भुकेलेल्या माणसांना अन्न द्या.. आनंदात जगून घ्या... कुठे फिरावंस वाटलं तर भरपूर फिरून घ्या...!!!*

*🙏.. परंतु म्हातारपणी फिरावंस वाटल तरी तुमच शरीर मात्र तेवढी साथ देणार नाही, तेव्हा तब्बेत सांभाळूनच प्रवास करा. आपण येताना जरी एकटे आलो असलो तरी जाताना मात्र सर्वांचे होऊन जाण्यातच खरी मजा आहे, धन्यवाद...👍*
🌹

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...