Saturday, November 12, 2022

 *🎤काही गाण्यांसाठी सूत्रसंचालन---*

*1)चिटिंया कलाइया--*
स्वप्न पाहते यौवना
होऊन फुलपाखरांपरी
हर्षित ती आनंदाने 
बागडते हो मोरापरी...
पाहुया या तरुणींचे काय म्हणणे आहे ते या गीतातुन...
*2)चुडी जो खनके--*
सौभाग्यका वरदान चुडियाँ
आनंदकी लहर चुडियाँ
हाथोमें प्यारी लगती चुडियाँ
मिठे बोल बोलती चुडियाँ...
चला तर ऐकुया या चुडिया काय सांगताय ते......या गीतातुन, सादर करीत आहे....
*3)टाय टाय फिश--*
दुसऱ्याला हरविण्यात
मजा असते जीवनाची...
दुसऱ्याला चिडविण्यात
कारणे ती आनंदाची...
अशी चिडवण्याची मजा बघुया या गीतातुन. गाण्याचे बोल आहेत.....
*4)पल्लो लटके रे--*
राजस्थानी घुंघटाची
आहे त-हाच न्यारी...
पदरातही शोभुन दिसते
मर्यादेची अदा भारी...
अशी राजस्थानी संस्कृतीची झलक घेऊन येत आहे आमचे इ....चे बालगोपाल..
*5)आमदार झाल्यासारखं वाटतं--*
खुर्चीचे स्वप्न मजेशीर
भल्याभल्यांना पडतात
चांगल्यांचाही अंदाज चुकल्याने
नकळतच हो आपटतात...
असे आमदारकीचं स्वप्न पाहणारे गीत घेऊन येत आहे.....
*6)मी हाय कोली...*
सागराला दैवत मानतो
त्याचीच पुजा आम्ही बांधतो
सुखदुःखाचा साक्षीदार तो
आम्हा कोळ्यांचा पालनहार तो...
कोळ्यांच्या आनंदाचं वर्णन करणारे मी हाय कोली हे गीत घेऊन येत आहे...
*7)वंदेमातरम्...*
वंदेमातरम् वंदेमातरम्
मंत्रघोष बघा निनादला
भारतभूच्या गगनावरी
तिरंगा डौलाने फडकला...
*8)रोण्या शेरमा रे...*
नवयुवकांना आकर्षण 
शहरातील गोष्टींचे भारी
पळती सारे नवलाईने
ओस पडती खेडी सारी...
अश्याच नवयुवकांना शहरातील कुठल्या गोष्टींचे आकर्षण वाटते ते जाणुन घेऊया ....
*9)एकदंता..अपुनका तुझपे हक...*
सुखकर्ता दुःखहर्ता
गजानना तुजला वंदन
व्हावे सफल कार्य सकल
कार्यारंभी तुझेच पुजन...
*10)मारु सोनानु घडुलो रे...*
पाण्याचे हो महत्व 
जाणुन घेऊनी
पुजुया जगदंबेस 
गरबा तो खेळुनी...
*11)ए दुनिया..I Love my india.,.*
देश मेरा हिंदुस्थान
शान इसकी बढायेंगे
इसके खातीर मर मिटनेकों
तयार हम सदा रहेंगे...

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...