कोणी पाठवली माहीत नाही पण खूपच सुंदर आहे।



पाहता पाहता मोठे झालो
सगळेच गणित बदलत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || 

आता फक्त आठवणी राहिल्या
ते दिवस भरभर सरत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || 

खेळापेक्षा अभ्यास हि गोष्ट
महत्वाची वाटायची नाही
'खेळून झाल्यावर अभ्यास'
हि गोष्ट घरातल्यांना पटायची नाही

गल्लीमध्ये क्रिकेट खेळणे
म्हणजे मोठी धमाल असे
दोन दगडांच्या stumpa मध्ये
world cup ची मजl असे

सागरगोटे,पतंग,भोवरे
सोबती सारेच सोडून गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || 

शनिवारच्या सकाळी शाळेचे
आवरताना धांदल होई
आणि म्हणता म्हणता दंग्यांमध्ये
रविवार हळूच निघून जाई

वर्गातील भांडणे सोडवताना
शिक्षकांच्या नाकी दम येई
आम्हाला 'वळण' लावायच्या नादात
शेवटी घरात्ल्यानाच 'बाक' येई !

आता फक्त वीकेंड आले
त्यातले निरागसपण संपून गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || 

स्पर्धेच्या जगातले सर्वात पहिले
दहावीचे वर्ष आले
पाहता पाहता सर्व सवंगडी
अभ्यासाच्या मागे लागले

क्लासेस, college, tution च्या गडबडीत
'परीक्षा' हेच उद्देश बनले
आणि बालपणीचे सुंदर दिवस
आयुष्याच्या डायरीत मागे पडले

पाहता पाहता मोठे झालो
सगळेच गणित बदलत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केवच उडून गेले || 

आजच्या मोठ्या income मध्ये
साठवलेल्या भिशी ची मजा नाही
मधल्या सुट्टीच्या डब्याची चव
office च्या lunch -break ला नाही...!

आजच्या फोर व्हीलर long drive la
सायकल च्या डब्बल सीटची सर नाही
रात्रभर मारलेल्या गप्पांची गम्मत
आजच्या whats app chatting ला नाही...!

गुंफता गुंफता नात्यांचे बंध
किस्से सारे आठवत गेले
आज थोडे थांबून मागे पाहताना
अश्रू माझे ओघळून गेले |

=============================================
*निवृत्त मी झालो,पण निवांत ती झाली*
सकाळच्या पहिल्या चहाची
जबाबदारी माझ्यावर आली
दूध ऊतू जाऊ न देण्याची
काळजी माझ्या शिरी आली
निवृत्त मी झालो,
निवांत ती झाली ।
आजचा नाष्टा ठरवायची
आणि, करायची पाळी माझ्यावर आली
कांदा चिरताना आसवे गाळायची वेळ आता माझ्यावर आली,
निवृत्त मी झालो,
निवांत ती झाली ।
कुकरच्या शिट्यां मोजण्याची
आता मला सवय झाली
तव्यावरची गरम पोळीही
आताशा चटके देईना झाली
निवृत्त मी झालो,
निवांत ती झाली ।
दुधाचा खाडा,पेपरचा खाडा
फोन बिल, लाईट बिल
हिशोब ठेवताना माझी
त्रेधातिरपीट झाली
निवृत्त मी झालो,
निवांत ती झाली ।
घड्याळाच्या काट्याबरोबर
फिरण्यातून, ती मुक्त झाली
लवकर उठण्याची सवय
आता, तीने सोडून दिली
निवृत्त मी झालो
निवांत ती झाली ।
माझ्यासाठी धावणारी ती
आता जरा थकू लागली
थकलेल्या तिच्या पावलांची
आता मला चाहूल लागली
निवृत्त मी झालो
निवांत ती झाली ।







नात्यातील* *फराळ*
बहिणींचे नाते चकलीसारखे खमंग,
वरून काटे पण आत मायेचा श्रीरंग।।
भावाचे नाते श्रीखंडासारखे आंबट गोड
तर मैत्रिणींचे नाते जिलेबीसारखे मधुर।।
मामा -मामीचे नाते बासुंदीसारखे नितळ
तर आजीचे नाते अनारशासारखे अलवार।
नातवंड खसखशीसारखी
चिकटतात हळुवार।।
आते, मामे, मावस, चुलत ही बहिणावळ, जणु शंकरपाळ्या,
येता जाता तोंडात टाकाव्या।।
काका, काकू म्हणजे कुरकुरीत शेव चिवडा
धाक असा की आवडले तरी एकच निवडा।।
आत्या आणि मावशीचे नाते
करंजीसारखे खुसखुशीत,
जरा कौतुक केले की
स्वारी येते खुशीत।।
वडील म्हणजे चिरोट्यासारखे
पाकात टाका किंवा पिठीसाखर पेरा
प्रेमाचे पदर सुटणारच।।
आई म्हणजे बुंदीचा लाडू
जशा बुंदीच्या कळ्या, तशा ममतेच्या पाकळ्या।।
असे हे नात्यांचे कडबोळे
हसू आणि आसूचे बोलके डोळे।।
-----------------------------------------------------------
: ◆◆ *नातवंडावर कविता*। ◆◆
नातवंड म्हणजे काय चीज असतं ,
आजी आजोबा मध्ये दडलेलं सँडविच असतं.
नातवंड म्हणजे काय चीज असते ,
आई रागावली की आजी कडील धाव असते.
नातवंड म्हणजे लोण्याचा गोळा,
पाळण्यातून अलगद काढून घ्यावा.
नातवंड म्हणजे गुलाबाची पाकळी
पुस्तकात जपलेली पानावरची जाळी.
नातवंड म्हणजे विड्यातला गुलकंद
सगळ्या चवींना बांधतो एक संध.
नातवंड म्हणजे खव्याचा पेढा
अखंड आनंद घ्या हवा तेवढा.
नातवंड म्हणजे त्रिवेणी संगम
तिस-या पिढीचा असतो उगम.
नातवंड म्हणजे आनंद तरंग
आनंदाच्या डोहात डुंबते अंतरंग.
*ग्रुप मधील सर्व आजी आजोबांसाठी*
◆◆ *समर्पित* ◆◆

आभाळमाया

No comments:
Post a Comment