Wednesday, August 17, 2022

*जपायचं नातं म्हणून,* 

*निर्माण केला ग्रुप..*
*सगळेच आपले म्हणून,*
*भावना जपा खूप..*
 
*कोणी दिला रिप्लाय,*
*म्हणून हुरळून जायचं नाही..*
*आणि नाही दिला रिप्लाय,* 
*म्हणून खंत मानायची नाही..*

*सर्वांची मतं कायम,*
*एकसारखी असतील कशी..*
*नकारार्थी, सकारार्थी,*
*प्रत्येकाची वेगळी अशी..*

*राखायची असेल अबाधित,* 
*एकमेकांची साथ..*
*तर द्यावाच लागतो सर्वांना,*
*प्रेमाचा हात..*

*प्रत्येकाचं मत,* 
*वेगळं असायलाच हवं..*
*तरच घडेल इथे,* 
*रोज काहीतरी नवं..*

*काय बरं होईल,* 
*नावडत्या जोकवर हसलं तर..*
*मनातल्या भावना झाकून,*
*थोडसं फसलं तर..*

*फक्त एकच करा मित्रांनो,*
*वेळ काढा थोडा..*
*प्रत्येक जण असावा,*
*दुसऱ्यासाठी वेडा..*

*कधी गडबड, कधी बडबड,*
*कधी बरीच शांतता..*
*दाखवून द्या ना एकदा,*
*अंतरंगातील एकात्मता..* 

*दुरावलेल्या दोन मनांत,*
*एक पूल बांधणारा..*
*एखादा असतोच ना,*
*निखळणारे दुवे सांधणारा..*

*ग्रुप असो नात्यांचा,*
*वा असो तो मित्रांचा..*
*आपल्या हजेरीने बनवा,*
================================



आईने मोजलेच नाही...

आयुष्याच्या तव्यावरती 
संसाराची पोळी
भाजता भाजता 
हाताला किती बसले चटके
आईने मोजलेच नाही...

नवर्‍यासह लेकराबाळांचे 
करता करता
मोठ्यांचा मान राखता राखता
कितीदा वाकले गेले ,          
आईने मोजलेच नाही...

जरा चुकले की 
घरच्यांची, बाहेरच्यांची
किती बोलणी खाल्ली,
काळजाला किती घरं पडली , आईने मोजलेच नाही...

याच्यासाठी त्याच्यासाठी
आणखीही कुणासाठी
जगता जगता ,
स्वतःसाठी अशी 
किती जगले ,आईने
मोजलेच नाही...

पाखरे गेली फारच दूर 
डोळा आहे श्रावणपूर
पैशाचा हा नुसता धूर
निसटून गेले कोणते सूर ,
आईनेमोजलेच नाही...

*सर्व आईंना समर्पित..*🙏🙏🙏🙏

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...