Tuesday, August 16, 2022

जीणे जगणे |


जीणे जगणे जगणे
कधी हसणे रडणे
खरे असो खोटे काही
अंतरात साठविणे
जीणे जगणे जगणे ||

मन रमते बाल्यात
चिंता खंत ना मनात
असो दिन असो रात
मांगल्याची बरसात
जीवनाची सुरुवात
स्वप्नसुखात रमणे
जीणे जगणे जगणे ||

तारुण्याची रंगभूमी
अभिनय ठायीठायी
रंगरंगोटी भरते
अभिनव अभिनयी
जीवनाच्या मध्यावर
आता थोडे विसावणे
जीणे जगणे जगणे ||

वार्ध्यक्याच्या पावलांनी 
जीवन सरे पुढती
विश्वंभर तो पाठीशी
जरी गात्रे ती थकती
उरलेल्या काही क्षणी
हरिभजनी रमणे 
जीणे जगणे जगणे ||

-अनंत देवघरकर
अलिबाग.
९४२०६४५७२८

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...