*वऱ्हाडी हास्य कविता* 
*“हॅप्पी अधिक मास”* 
(..डॉ. स्वप्नील मानकर )
*अधिकमास आला म्हणून*
*मी भाय खुश झालो होतो*
*सासुरवाडीच्या बुलाव्याची*
*वाट पाहुन रायलो होतो*
*आज यिन उद्या यिन वाटे*
*पण निरोपाचा नोता पत्ता*
*वाटलं कोरोना बाबा यंदा*
*हुकवते वाटते जांगडबुत्ता*
*शेवटी आला बॉ फोन म्हणे*
*जवाई अधिकमासाले या ना*
*बयाच मनलं तंगीचे वर्ष हाये*
*जमत नसल तर राहू द्या ना*
*म्हणे काही जरी झालं तरी*
*आम्ही रूढी इसरणार नाई*
*मनलं इतल्या मिनता करता*
*तर यावच लागन सासूबाई*
*पोचल्यावर आमाले त्यायनं*
*कोठ्याशेजीची खोली देली*
*म्हने सरकारी नियमाप्रमाणे*
*क्वारन्टाईन व्यवस्था केली*
*मंग काय सांगता हाल भौ*
*दाराबाहेर आणून ठेवे ताट*
*शेणाचा वास घेतघेत जेवो*
*भांडे घासून लागली वाट*
*तीन दिवस निंगुन गेले पण*
*कोणी एक शब्द बोले नाही*
*पण दान भेटते म्हणून माये*
*पाय काई तिथून हाले नाही*
*शेवटी मनलं थकलो आता*
*आमी गावाले वापेस जातो*
*सासूबाई बोलली थांबा जरा*
*अधिक मासाचं दान देतो*
*मोठाज्यात डब्बा देला हाती*
*म्हणे घरी जाऊनच खोलजा*
*गिफ्ट आवडलं का नाही ते*
*एकाद फोन करून बोलजा*
*भल्ल्या खुशीत घर गाठलं*
*पयले गिफ्टचं पॅक उघडलं*
*अंदरला नजारा पाहून दादा*
*माय तर बॅलन्सच बिघडलं*
*मास्क अन सॅनिटाईजर होतं*
*ज्याचा आला मले उग्र वास*
*संग चिठ्ठी देली होती लिहून*
*जवाईबापू हॅपी अधिकमास*
*थंड डोस्कं ठेवून ईचार केला*
*हे दान खरंच जीवनदान होतं*
*सोनं चांदी पैसा अदला सबन*
*आपल्या जीवापेक्षा मोठं नोतं*
*सोनं चांदी पैसा अदला सबन*
*आपल्या जीवापेक्षा मोठं नोतं*
...शीघ्
शब्दार्थ :-
भाय :- खूप
बयाच :- उगीउगी
या बारिले :- या वेळेला
मिनता :- विनवणी
मनल :- म्हटलं
कोठ्या शेजीची :- गोठ्याच्या बाजूची
वापेस :-परत वापस
सबन :- सगळं










No comments:
Post a Comment