Wednesday, August 17, 2022

 भाजून सोलणे अन्

निवडून ते पहाणे
मी ओळखून आहे
कुठल्या डब्यात दाणे ॥धृ॥

जाता घरातूनी तू
घेईन एक वाटी
खाईन मस्त दाणे
येईल मौज मोठी
हे स्वप्न जीवघेणे
भरतो सुखे बकाणे ॥१॥
मी ओळखून आहे कुठल्या डब्यात दाणे...

हाती डबा जयाच्या
त्याला कसे कळावे
पोटात भूक ज्याच्या
त्यालाच दु:ख ठावे
लपवून लाख ठेवा
शोधू आम्ही दिवाणे ॥२॥
मी ओळखून आहे कुठल्या डब्यात दाणे...

पोटास वेदनांचा
का सांग त्रास व्हावा ?
इतका चविष्ट खाऊ
का औषधी नसावा ?
येवो कळा कितीही
सोडू अम्ही न खाणे ॥३॥
मी ओळखून आहे कुठल्या डब्यात दाणे.......

कविवर्य : अज्ञात

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...