Wednesday, August 17, 2022

आज मी जसा आहे...


आज मी जसा आहे तसा राहीन उद्या
सुखसोहळ्याचे गीत मीच गाईन उद्या

कोण काही बोले त्याची खंत नसे मला
चित्त ते प्रसन्न दाखवून देईन उद्या

भय मुळी मनास नाही शिवले आजवरी
या निडर जीवनाचे गीत गाईन उद्या 

मी निघालो एकटा सोबतीस नसो कुणी
ध्येयपुर्तीस मी यशाकडे नेईन उद्या

पंढरीच्या वाटेस मी विठू ओढीने 
वारकरी म्हणुनी पंढरी पाहीन उद्या

मी असा अनंत मस्त हर्ष भोगतो सदा
तोच हर्ष लेकरांस देईन उद्या |
******************************
*****************************
 अनंत देवघरकर
अलिबाग.
९४२०६४५७२८
==================================

 🌹अगत्याचे आमंत्रण🌹

अगत्याचे आमंत्रण |
आत्मानंदाचे सर्वांना
सर्वांनी या माझ्याकडे
दिवाळीच्या फराळाला 

करू अंगतपंगत
आनंदाच्या सणासाठी |
यासाठी या माझ्याकडे
दिवाळीच्या फराळाला ||

एक मात्र नक्की करा
रिते हाती येऊ नका |     
कुणी आणा हो चकली
दिवाळीच्या फराळाला. ||

करंज्या ,शंकरपाळ्या
तसेच विविध लाडू
अनारश्यांची ती मजा
दिवाळीच्या फराळाला. ||

नानाविध चिवडे
चविष्ट बटाटेवडे
जाडी शेव, कडबोळे 
दिवाळीच्या फराळाला ||

चर्वणास आणा बोरे
चवीला भाकरवडी
मिठाई तर चालेल
दिवाळीच्या फराळाला. ||

रंगढंगाच्या नाना कविता
घेऊनी या ह्या सणाला
जमू या हो ,या हो सारे
दिवाळीच्या फराळाला. ||

करू दिवाळी साजरी
दिवाळीच्या फराळाने ||
काव्यरसिकांनो नक्की या 
दिवाळीच्या फराळाला ||


निमंत्रक
अनंत देवघरकर
अलिबाग.९४२०६४५७२८.

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...