कोण.....कुणाला....कठे....केव्
आणि
का "भेटणार नाही"...
ह्याला प्रारब्द्ध म्हणावं लागेल ....
भेट ह्या शब्द संकल्पनेे विषयी थोडंसं काव्यात्मक विवेचन...
भेट कधी थेट असते
कधी ती गळाभेट असते
कधी meeting असते
कधी नुसतंच greeting असते
भेट कधी 'वस्तु' असते
प्रेमाखातर दिलेली
भेट कधी देणगी असते
क्रृतज्ञापूर्वक स्वीकारलेली
भेट कधी 'धमकी' असते
..."बाहेर भेट"....म्हणून दटावलेली
भेट कधी 'उपरोधक' असते
"वर भेटु नका" म्हणून सुनावलेली...
भेट थोरा-मोठ्यांची असते
ईतिहासाच्या पानात मिरवते....
भेट दोन बाल-मित्रांची असते
फारा वर्षांनी भेटल्यावर पिकल्या केसांचा अंदाज घेत चापपलेली.....
भेट कधी अवघडलेली
'झक' मारल्या सारखी....
भेट कधी मनमोकळी
मनसोक्त मैफील रंगवलेली....
भेट कधी गुलदस्त्यातली
कट-कारस्थान रचण्यासाठी....
भेट कधी जाहीरपणे
खुलं आव्हान देण्यासाठी!!!!
भेट कधी पहिली- वहिली
पुढल्याची ओढ वाढवणारी
भेट कधी अखेरची ठरते.....
मनाला चुटपुट लावुन जाते
भेट कधी अपुरी भासते
बरच काही राहुन गेल्या सारखी
भेट कधी कंटाळवाणी
घड्याळाकडे पाहुन ढकलल्या सारखी....
भेट कधी चुकुन घडते
पण आयुष्यभर पुरून उरते
भेट कधी 'संधी' असते
निसटुन पुढे निघुन जाते.....
भेट कोवळ्या प्रेमीकांची
लाजरी-बुजरी नुसतीच नजरानजर
भेट घटस्फोटीतांची ही असते
हक्क सांगण्यासाठी......मुलांवर!!!
भेट एखादी आठवणीतली असते
मस्त nostalgic करते....
भेट नकोशी भूतकाळातली
.....सर्रकन अंगावर काटा आणते
भेट .....
विधीलिखीत...काळाशी ...
न टाळता येण्याजोगी....
भेट ....
कधीतरी
आपलीच आपल्याशी
अंतरातल्या.....स्वत:शी !!!
आयुष्याच्या नाजुक वळणापाशी.........
==================================
देवघराच्या कोपऱ्यात
स्वामी बसले रुसून....
कोणीच पहात नव्हतं तेव्हा
डोळे घेतले पुसून..
मी म्हणालो का हो स्वामी
बसलात असे रुसून
तुमचं भजन म्हणतो ना
तुमच्या समोर बसून
तुम्हांसाठी स्वामी बघा
काय काय केलं...
सागवानी देव्हाऱ्यात तुम्हाला
सिंहासनी बसवलं..
तुम्हां साठी स्वामी बघा
किती फुले आणली
सोन्या चांदीची स्वामी
आरास बघा केली
तुम्हांसाठी स्वामी बघा
पंचपक्वान्न केले...
शुद्ध तुपाचे स्वामी
निरांजन लावले...
तरी स्वामी असे कसे
तूम्ही बसलात रुसून...
आशीर्वाद द्या ना हो
गालात जरा हसून
स्वामी म्हणे मग मला
देव तुला कळला नाही
पेढ्यांची लाच घायला
मी भ्रष्ट झालो नाही
दीन झाले आईबाबा
त्यांना जरा बघ...
अरे वेड्या त्यांचे आहे
तुझ्या पुरतंच जग...
भजने माझी गातोस रे
किती किती सुंदर...
जाणून घेतले आहेस का रे
माता-पित्याचे अंतर...
माझ्याशी बोलण्यापेक्षा
त्यांच्याशी तू बोल...
त्यांच्याविना माझी भक्ती
शून्य आणि फोल....
म्हातारपण असत बाळा
दुसरं लहानपण...
किती समजून घेतलं तुला
आठव तुझं बालपण...
स्वामी स्वामी करतोस वेड्या
असा मी भेटेन का...
आई बाबा जर उपाशी
मी तुपाशी खाईन का
स्वामी असे बोलले मला
डोळ्यात त्यांनी घातले अंजन
दाटून आले अश्रू नयनी
धूसर झाले निरांजन...

||श्री स्वामी समर्थ||
===========================================
फोन पुर्वी ही होता, आता ही आहे
फोनचा दोष नाही, माझा त्याच्यावर रोष नाही
मीच नेहमी त्याच्या ताब्यात जातो
३४ वेळा दिवसातुन,त्याच्याकडे हात जातो
दारुड्यासारख माझं ही व्हायला लागलयं
तो सांगले तसा मी वळायला लागलोय
मी सोशल मिडीयाच्या गळाला लागलोय
घड्याळाचा गजर कधीच शांत झालाय
नोटीफिकेशन टोन उठवायला लागलाय
झोपलेले डोळे लागलीच उघडतात
पटकन मोबाईलचा मेसज पाहतात
साखर झोप माझी मी विसराया लागलोय
तो सांगले तसा मी वळायला लागलोय
मी सोशल मिडीयाच्या गळाला लागलोय
मेसेज पडला, वाचला आवडला
लाईक दिला, फॉरवर्ड केला
त्याला मी आता माझाच समजायला लागलोय
लाईकच्या वर्षावात भिजायला लागलोय
खोट्या अभिमानात रहायला लागलोय
तो सांगले तसा मी वळायला लागलोय
मी सोशल मिडीयाच्या गळाला लागलोय
फॉरवर्ड करता करता, हरवल्या गोष्टी
नवीन शोधायची हरवुन गेली दृष्टी
कोणावर तरी अवलंबुन रहायला लागलोय
चांगल्या मेसज ची वाट पहायला लागलोय
हे असेच करायचे, गळी उतरवायला लागलोय.
तो सांगले तसा मी वळायला लागलोय
मी सोशल मिडीयाच्या गळाला लागलोय
फॉरवर्ड करण्यास लागत नाही कारण
ज्ञान असो, नृत्य असो, विनोद असो की राजकारण
कशाला कशाचा नाही मेळ, माहीतीच्या समुद्राची झालीया भेळ
सगळेच सगळ्यांना शिकवायला लागलेय
मोगऱ्याच्या झाडाला कुरुमुरे लागलेय
तो सांगले तसा मी वळायला लागलोय
मी सोशल मिडीयाच्या गळाला लागलोय
भानुदास साटम
======================================
मैत्रिण
माणसाने
प्रेमात पडावेच
असे काही नाही,
पण प्रेमाहून जास्त,
जणू मैत्रीत
असे काही.!!
प्रत्येकाला एक
प्रेयसी असावीच
असे काही नाही,
पण प्रेयसीहून
समजूतदार एक मैत्रिण
अशी काही.!!
रस्त्यावरून चालताना
जिने हात धरावाच
असे काही नाही,
पण सोबत चालताना
कधी साथ न सोडावी
अशी काही.!!
जिने मनातले
सर्व काही सांगावेच
असे काही नाही,
पण माझ्या मनातले
नकळत जाणून घ्यावे
अशी काही..!!
जिला कॉफीसाठी विचारताच
हो म्हणावेच
असे काही नाही,
पण घरी नेऊन
सर्वांसमोर कॉफी पाजावी
अशी काही.!!
तिला गिफ्ट देता
तिने स्वीकारावेच
असे काही नाही,
पण वाढदिवशी
हक्काने मागणारी
अशी काही..!!
मला भेटण्यासाठी
घरी थाप द्यावीच
असे काही नाही,
पण उशीर झाल्यास माझ्यासोबतच होती
असे सांगणारी
अशी काही..!!
जगात प्रेमाचेच नाते
म्हणजे सारे काही असते
असे काही नाही,
तर प्रेमाहूनही
अधिक जपता येणारे,
जसे *"मैत्रीचे नाते"*
असे काही.....!!!
*निखळ..आणि..निस्वार्थ ..*
***************************************
जीव गुंतवणारे स्टेशन
-------------------
तिच्या स्टेशनात माझी गाडी थांबत नाही
हे ठाऊक असूनसुद्धा
ती रात्रभर बसून राहिली माझ्या प्रतिक्षेत
डॊळ्यात ओथंबलेली स्वप्ने घेऊन...
पहाटे गाडी धडधडत स्टेशनात शिरली तेव्हा
तिच्या काळजाचा रुमाल हलताना बघून
मी गलबललो आतून
वाटले गाडी थांबवावी अशीच
उतरावे खाली आणि भेटावे तिला उराउरी
घ्यावे मिठीत आणि जावे तिच्यात विरघळून
तर गाडीचा वेग त्या अनोळखी इंजिन ड्रायव्हरच्या हातात
आणि मी अगतिक असहाय्य....
का येते असे स्टेशन आयुष्यात
जिथे आपली गाडी कधीच थांबणार नाही
हे ठाऊक असुनसुद्धा गुंतून रहातो जीव
व्याकुळ करत रहाते ती आणि तिचे वाट पहाणे
तडफड्त रहाते काळीज लगातार...
गाडी निघून गेलेली असते तोवर
कोसो मैल दूर, अज्ञाताच्या दिशेने
आणि मग हलत रहातो डोळ्यासमोर
तिच्या काळजाचा अगतिक रुमाल
घायाळ करत रहातो आयुष्यभर...
का येते असे स्टेशन आयुष्यात...!
का येते असे स्टेशन आयुष्यात...!!
- प्रसाद कुलकर्णी
=============================================
*थोड जगलं पाहिजे.........!!*
आयुष्याच्या अल्बममध्ये
आठवणींचे फोटो असतात,
आणखी एक कॉपी काढायला
निगेटिव्हज् मात्र शिल्लक नसतात.
गजर तर रोजचाच आहे
आळसाने झोपले पाहिजे,
गोडसर चहाचा घोट घेत
Tom & Jerry पाहिलं पाहिजे.
आंघोळ फक्त दहा मिनिटे?
एखाद्या दिवशी तास घ्या,
आरशासमोर स्वतःला
सुंदर म्हणता आलं पाहिजे.
भसाडा का असेना
आपल्याच सुरात रमलं पाहिजे,
वेडेवाकडे अंग हलवत
नाचण सुध्दा जमलं पाहिजे.
गीतेचा रस्ता योग्यच आहे
पण एखादा दिवस पाडगावकराना द्या,
रामायण मालिका नैतिक थोर
"बेवॉच" सुध्दा एन्जॉय करता आली पाहिजे.
कधी तरी एकटे
उगाचच फिरले पाहिजे,
तलावाच्या काठावर
उताणे पडले पाहिजे.
संध्याकाळी मंदिराबरोबरच
बागेत सुध्दा फिरलं पाहिजे,
"फुलपाखराच्या" सौंदर्याला
कधीतरी भुललं पाहिजे.
द्यायला कोणी नसलं
म्हणून काय झालं?
एक गजरा विकत घ्या
ओंजळ भरुन फुलांचा नुसता श्वास घ्या.
रात्री झोपताना मात्र
दोन मिनिटे देवाला द्या,
एवढया सुंदर जगण्यासाठी
नुसतं थँक्स तरी म्हणा..!!
पाहता पाहता मोठे झालो
सगळेच गणित बदलत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले ।।ध्रु ।।
आजीने घातलेल्या आंघोळीने
मन सुद्धा स्वछ होई
देवपूजा पाहताना तिची
देव सुद्धा मुग्ध होई
मायेन भरवलेल्या तिच्या घासांनी
दिवसभराची भूक भागे
तिच्या सुंदर गोष्टी-गाण्यांनी
शांत सुखाची झोप लागे
पाहता पाहता मोठे झालो
सगळेच गणित बदलत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || १ ||
७ वाजताच्या बातम्या पाहणे
हा आजोबांचा नियम असे
'बातम्या नको,कार्टून लावा'
असा आमचा गलका असे
बाजारातून घरी आल्यावर आजोबा
सारे त्यांच्याभोवती जमत असू
त्यांनी आणलेला खावू
सारे वाटून खात असू
आता फक्त आठवणी राहिल्या
ते दिवस भरभर सरत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || २ ||
खेळापेक्षा अभ्यास हि गोष्ट
महत्वाची वाटायची नाही
'खेळून झाल्यावर अभ्यास'
हि गोष्ट घरातल्यांना पटायची नाही
गल्लीमध्ये क्रिकेट खेळणे
म्हणजे मोठी धमाल असे
दोन दगडांच्या stumpa मध्ये
world cup ची मजl असे
सागरगोटे,पतंग,भोवरे
सोबती सारेच सोडून गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || ३ ||
शनिवारच्या सकाळी शाळेचे
आवरताना धांदल होई
आणि म्हणता म्हणता दंग्यांमध्ये
रविवार हळूच निघून जाई
वर्गातील भांडणे सोडवताना
शिक्षकांच्या नाकी दम येई
आम्हाला 'वळण' लावायच्या नादात
शेवटी घरातल्यांनाच 'बाक' येई !
आता फक्त वीकेंड आले
त्यातले निरागसपण संपून गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || ४ ||
स्पर्धेच्या जगातले सर्वात पहिले
दहावीचे वर्ष आले
पाहता पाहता सर्व सवंगडी
अभ्यासाच्या मागे लागले
क्लासेस, college, tution च्या गडबडीत
'परीक्षा' हेच उद्देश बनले
आणि बालपणीचे सुंदर दिवस
आयुष्याच्या डायरीत मागे पडले
पाहता पाहता मोठे झालो
सगळेच गणित बदलत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || ५ ||
आजच्या मोठ्या पगारामध्ये
साठवलेल्या भिशी ची मजा नाही
मधल्या सुट्टीच्या डब्याची चव
office च्या lunch -break ला नाही
आजच्या फोर व्हीलर long driveला
सायकल च्या डब्बल सीटची सर नाही
रात्रभर मारलेल्या गप्पांची गम्मत
आजच्या whatsapp chatting ला नाही
गुंफता गुंफता नात्यांचे बंध
किस्से सारे आठवत गेले
आज थोडे थांबून मागे पाहताना............
*अश्रू माझे ओघळून गेले ||*


No comments:
Post a Comment