"आयुष्यात स्वतःची एक,मैत्रीण असावी."
कुठलाही शिष्ठ पणा न करता,दिल खुलास असावी,
पळस पानी थेम्बा सारखी,ती नितळ असावी;
जी कायम अबोध बालका सारखी,हसत असावी,
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.
जिच्या सोबत संध्याकाळ,एक "स्पेशल" असावी,
पण ती स्वतःकायम,"सोशल"असावी;
मैत्री नात्यात "नथिंग ओफ़िशिअल "असावी;
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.
जिची चाहूल एक, ऋतू पालवी सारखी असावी,
जिची सोबत श्रावण-सरी,ओली असावी,
जिच्या केस घसरणीत,पानगळ असावी;
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.
जिच्या नाती,सर्व धागी अतूट असावी,
जिची हास्य खळखळ,बेछूट असावी;
जिची मन भावना,रेशीम कोमल असावी;
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.
जिच्या वागण्यात,दाणगट पोट्टे-शाही असावी,
कायम माझ्या करिता,शिवी-गाळ असावी;
दोघां मध्ये एक,आगळीच फिल्मी-यारी असावी,
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.
जी माझ्या संगतीस,कायम वेडी असावी,
जिला माझ्या क्षणांची,आतुर गोडी असावी;
माझ्या जोक्स ला कायम,पुरुषी हसावी;
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.
कायम जिने माझी कॉलर,धरूनच असावी,
माझे पसरले केस,ओढूनच असावी;
कधी लाडावून माझी,गळ-मानगूट फासावी,
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.
कधी माझ्या न बोलण्याने,विव्हळ असावी,
माझ्या नजरीत ईशार्याला,चपळ असावी;
कुठेतरी या नात्या बद्दल,खूप हळवी असावी;
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी.
कुठे असेल ती,जरा लवकर गवसावी,
तिची प्रफुल्लीत बहर,लवकर बरसावी;
माझ्या शुभ्र आयुष्याला,तिचीच रंगत असावी;
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी..
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी..
तुझ्यासारखी जीव ओवाळून टाकणारी़़़़
======================================
बापाला बघितलं आहे का?*
मोठा झाल्यापासुन बापाला,
कधी मिठी मारून बघितलं आहे का ?
मारून बघा,
ह्रुदय स्थिर होऊन जाईल.
मोठा झाल्यापासुन कधी
बापाचा मुका घेऊन बघितला आहे का?
घेऊन बघा,
बापाची दाढी गालाला रुतल्यावर,
बापा पेक्षा आपण अजुन छोटच आहे,
याची जाणीव होऊन जाईल .
बापाची चप्पल होते म्हणुन कोणी बाप होत नाही,
त्यासाठी आयुष्यभर दुय्यम स्थान घ्याव लागत ,
कधी घेऊन बघितलं आहे का दुय्यम स्थान ?
घेऊन बघा,
बापाची किंमत कळुन जाईल .
बापाला बुढा, म्हातारा अस म्हणुन बघितल,
साधु लोकांना बाबा म्हंटल,
कधी बापाला बाबा म्हणुन बघितलं आहे का ?
म्हणुन बघा,
खऱ्या संतांची ओळख होऊन जाईल.
बापाचं घरावर नाव नाही,
बापाचं हातावर नाव नाही,
बापाचं छातीवर नाव नाही,
बापाचं गाडीवर नाव नाही,
स्वतःच्या घरात असुन देखील तो परका ,
कधी परका होऊन बघितला आहे का ?
होऊन बघा,
बाप किती खंबीर आहे याची जाणीव होऊन जाईल.
आई च प्रेम जास्त आणि बाबाचं कमी अस कधी नसत .
कधी सुर्य आणि चंद्र यांच्यातला
साम्य बघितलं आहे का ?
बघुन घ्या,
दोघ ही प्रकाश देतात फक्त
वेळा वेगवेगळ्या असतात.
बाप फक्त पाया पडण्यापुरता नसतो,
त्याला कधी निरखून बघितलं आहे का ?
निरखून बघा,
आयुष्यातील सर्वात मोठा मित्र तुमच्या समोर असतो.
*अशीच एक छोटीशी गोष्ट*
*एका पित्याने* अापल्या *मुलीचे* खूप चांगल्या प्रकारे संगोपन केलं. *खूप चांगल्या प्रकारे तिचे शिक्षण केलं*... जेणेकरून मुलीच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यास मदत होईल.......
*काही काळानंतर ती मुलगी एक यशस्वी व्यक्ती बनली.*
आणि *एका मल्टी नैशनल कंपनीची सी.ई.ओ. झाली. उच्च पद ,भरपूर वेतन, सगळ्या सुख सुविधा तिला कंपनीकडून प्रदान झाल्या होत्या.*
*एके दिवशी असाच तिचा विवाह एका चांगल्या मुलाशी झाला तिला मुलंही झाली. तिचा आता आपला सुखी परिवार बनला.*
*वडील म्हातारे होत चालले होते* एक दिवस वडीलांना आपल्या मुलीला भेटायची इच्छा झाली.. आणि ते मुलीला भेटायला तिच्या ऑफिस मध्ये गेले. *त्यांनी बघितलं की मुलगी एका मोठ्या व शानदार ऑफिसची अधिकारी बनलीय. तिच्या ऑफिसात हजारो कर्मचारी तिच्या अधीन राहून काम करत आहेत.*
*हे सगळं बघून वडीलांची छाती अभिमानानं फुलली !*
ते म्हातारे वडील मुलीच्या कॅबिन मध्ये गेले. व *तिच्या खांद्यावर हात ठेवून उभे राहीले.* आणि प्रेमानं त्यांनी आपल्या मुलीला विचारलं की..... *"या जगात सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती कोण आहे "?*
मुलगी स्मित हास्य करत, आत्मविश्वासाने म्हणाली. *"माझ्याशिवाय कोण असू शकतं बाबा ?"*
वडीलांना तिच्याकडून ह्या उत्तराची अपेक्षा नव्हती. त्यांना विश्वास होता की, त्यांची मुलगी गर्वाने म्हणेल की,,,,,
*" बाबा, ह्या जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती तुम्हीच आहात. ज्यांनी मला एवढ्या योग्यतेचं बनवलं!"*
या विचाराने त्यांचे डोळे भरून आले. ते कॅबिनचा दरवाजा ढकलून बाहेर निघायला लागले. *पण न राहून त्यांनी परत एकदा वळून मुलीला विचारलं की,,,, परत सांग "या जगात सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती कोण आहे "?*
मुलगी ह्या वेळेस म्हणाली की,,,, *"बाबा, तुम्हीच आहात ह्या जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती!"*
*वडील हे ऐकून आश्चर्यचकित झाले.....* व ते म्हणाले,,,, अगं, आताच तर तू *स्वतःला* जगातली सगळ्यात *शक्तिशाली* व्यक्ती म्हणत होतीस.... आणि आता *तू मला शक्तिशाली व्यक्ती* म्हणून सांगते आहेस ?"
मुलगी हसत त्यांना आपल्या समोर बसवत बोलली,,, *"बाबा, त्यावेळी तुमचा हात माझ्या खांद्यावर होता.*
*ज्या मुलीच्या खांद्यावर किंवा डोक्यावर वडीलांचा हात असेल. तर ती मुलगी जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तीच असेल ना? हो की नाही बाबा!"*
वडीलांचे डोळे परत भरून आले. त्यांनी आपल्या मुलीला घट्ट छातीशी धरून करकचून मिठी मारली."....
खरंच आहे की,,,,,, *ज्याच्या खांद्यावर किंवा डोक्यावर वडीलांचा हात असेल....ती व्यक्ती जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती असते.*
*आपल्या प्रगती व उन्नतीने फक्त "आई-वडीलच " आपल्या प्रगतीवर खुश असतात.*..........


=======================================
आला आषाढ-श्रावण
आला आषाढ-श्रावण
आल्या पावसाच्या सरी
किती चातकचोचीने
प्यावा वर्षाऋतू तरी.
काळ्या ढेकळांच्या गेला
गंध भरून कळ्यांत
काळ्या डांबरी रस्त्याचा
झाला निर्मळ निवांत.
चाळीचाळीतून चिंब
ओंली चिरगुटे झाली
ओल्या कौलारकौलारीं
मेघ हुंगतात लाली.
ओल्या पानांतल्या रेषा
वाचतात ओले पक्षी
आणि पोपटी रंगाची
रान दाखवितें नक्षी.
ओशाळला येथे यम
वीज ओशाळली थोडी
धावणाऱ्या क्षणालाही
आली ओलसर गोडी.
मनी तापलेल्या तारा
जरा निवतात संथ
येतां आषाढ-श्रावण
निवतात दिशा-पंथ.
आला आषाढ-श्रावण
आल्या पावसाच्या सरी
किती चातकचोचीने
प्यावा वर्षाऋतू तरी.
~ - बा. सी. मर्ढेकर
==================================
किती तरी दिवसांत
नाही चांदण्यात गेलो
किती तरी दिवसांत
नाही नदीत डुंबलो
खुल्या चांदण्याची ओढ
आहे माझी ही जुनीच
आणि वाहत्या पाण्याची
शीळ ओळखीची तीच
केव्हा तरी चांदण्यात
पुन्हा जाईन निर्भय;
गांवाकाठच्या नदीत
होईन मी जलमय
आज अंतरात भीती
खुल्या चांदण्याची थोडी
आणि नदीचा प्रवाह
अंगावर काटा काढी
बरा म्हणून हा ईथे
दिवा पारवा पाऱ्याचा
बरी तोतऱ्या नळाची
शिरी धार, मुखी ऋचा
~ - बा. सी. मर्ढेकर
========================================
आयुष्य हे असं जगायचं असतं
जन्म घेताना रडत येतो...म्हणूनच ....
मरताना समाधानाने हसत जायचं असतं
आयुष्य हे असं जगायचं असतं........
फक्त स्वतःच्या सुखाचा विचार न करता...
इतरांसाठीसुद्धा जगायचं असतं
आयुष्य हे असं जगायच असतं.....
चालताना एकदा ठेच लागली...
म्हणून चालणं सोडायचं नसतं
आयुष्य हे असं जगायचं असतं.....
बऱ्याच गोष्टी नाही करता आल्या...म्हणून
स्वप्न पाहणं मात्र सोडायचं नसतं....
आयुष्य हे असं जगायचं असतं....
मोठ्या पावसाची वाट न पाहत बसता...
छोट्या सरींमधेही...धुंद होऊन चिंब भिजायचं असतं..
आयुष्य हे असं जगायचं असतं....
उद्या काय होणार..ह्या चिंतेने आधिच मरुन न जाता..
क्षण अन क्षण...भरभरुन उपभोगायचा असतो....
आयुष्य हे असं जगायचं असतं....
आज हरलास...रडलास.. म्हणून
हसून लढणं सोडायचं नसतं....
आयुष्य हे असं ...जगायचं असतं...
खूप
काही जरी आयुष्यात नाही करता आलं.
तरीही थोडसं काहीतरी करुन जायचं असतं...
थोडं स्वतःसाठी....खूप काही..इतरांसाठी
आयुष्य हे असंच जगायचं असतं.....



















=====================================
राम युगात दूध मिळाले
कृष्ण युगात मिळाले तूप
कोरोना युगात दारु मिळाली
दूर दूर बसून पी गुपचूप
सगळं जग घेऊन बसलंय
मोठमोठे अणु परमाणू
आणि सगळ्यांना डिवचून गेला
एक छोटासा विषाणू
जेंव्हा निघू लागले
अर्थव्यवस्थेचे वाभाडे
तेंव्हा मात्र शासनाला
आठवले हे दारुडे
काल रात्री हा कोरोना
आला होता माझ्या स्वप्नात
त्याला पाहून घाबरून
मला रडायला आलं जोरात
मला रडतांना पाहून
तो हंसायला लागला
आणि हंसत हंसतच
मला म्हणू लागला
तुम्ही सगळे जण एवढे
का घाबरताय मला
किती रक्षण करणारी
संस्कृती लाभलीय तुम्हाला
ना अंगचटीला येणे
ना सारखे पापे घेणे
दोन्ही हात जोडून मात्र
छान स्वागत करणे
आता कुठून शिकलात
अंगावर स्प्रे मारायला
अन् खोलीतही सुवासासाठी
एवढाले फवारे मारायला
आधी तर तुम्ही छान छान
धूप कापूर जाळायचात
निरांजनात साजूक तुपाची
शांत तेवायची फुलवात
चपला बूट बाहेर काढून
हात-पाय तोंड धुवायला
आजी आजोबांनीच शिकवले ना
कपडे बदलून जेवायला
घरचेच खा, साधे रहा
प्रकृती छान राहील पहा
फास्ट फूड दारु तंबाखू
यांच्या पासून दूर रहा
प्राणीमात्रांवर प्रेम करा
वृक्षवल्लींची संगत धरा
पंचमहाभूतांविषयी
थोडा तरी आदर धरा
पुन्हा पुन्हा हेच सारे कळवळून सांगत होता कोरोना
तुमची संस्कृतीच तुमचा धर्म
तुमचे रक्षण करेलच ना!
*©️डॉ सौ सुषमा खानापूरकर*
No comments:
Post a Comment