तुला चोरून बघताना,
मला खुप बरं वाटत...!! 

तुझ्या मागुन फिरताना,
तुझ्या सोबत फिरावस वाटत...!!

तुझं ते निरागस हास्य,
निहारून पहावस वाटत...!!

हातात हात घालून,
तुझ्या सोबत चालावस वाटत...!!

तुझ्या त्या लाजण्याकडे,
एकटक पहावस वाटत...!!

तुझ्या समोर उभा राहून,
तुझा चेहरा मनात भरावसा वाटत...!!

मला खुप खुप खुप,
तुझ्या सोबत बोलावस वाटत...!।

तुझ्यावर जिवापाड,
प्रेम करावस वाटत...!!!

.
.
.
.
.
.
.
सॅलरी स्लीप कडे बघून
केलेली कविता आहे ही ....





No comments:
Post a Comment