मोबाईल
हाय आवरुसा पन कवर काम करतय
ज्याचे जवल असतय
तो आख्ख जग हातन घेऊन फिरतय
कवरे पन लांब असलू तरी क्षनान जोरतय
मानुस कसा असुदे पन *तो* स्मार्ट असतय
यो असाच हाय नेटवर्क असल त जोरन चालतय
नय त कंपनीचे जोरीला गाल्या खातय
याच्याव सुखाला शुभेच्छाचा पाऊस परतय
न दुखाला सगला लोक नरतय
नेत लोक आयकुन नय घेत त
लाईव येवुन विरोध होतय
संकट आयल क मदतीचा हात देतय
पन ये सगल याच्यावच घरतय
मोबाईल व कवर *फ्रेंड* असल तरी
गरजेचे येलेला कोन मदत करतय
रोज येनारे नवीन अँप्सनी
जाम फायदा केलाय
जीवन एकदम सोप्पा झायलाय
परत्येक गोष्ट आयती मिलतय
मनुन कष्ट शब्दच गायब झायलाय
*कॉपी पेस्ट* मुले आलशी होवुन
स्वताचा विचार मागेच रेलाय
न विचार करन्याची ताकद गमावून
स्वतामधला संशोधक कवाच मेलाय
ये आभासी दुनियेंचे गर्दीन जगून
मानूस जाम खुष असतय
पन खर मनजे आजूबाजूला कोनच नसतय
सोशल मिरीया चे फोटोव तो जाम भारी दिसतय
पन त्याच खर जीवन कोनलाच माहिती नसतय
*स्टेटस* टाकून तो नुसता *लाईक-विव्स* बघतय
विव्सचे नादन खोटे आयुष्यन फसतय
आत मानूस एकटाच असतय
एकटाच नरतय एकटाच हसतय
बाजूबाजूला रेवुन पन तो मोबाईल करतय
न खऱ्या आयुष्यन स्वतालाच हरवुन बसतय
ये सगला मोबाईल मुले घरतय
आवरूसे गोष्टीचे मागे
सगला जग गोल गोल फिरतय
मनून खरच जस हा तसच ऱ्या
आभासी दुनियेंची बाहेर या
आपले खरे आयुष्यन जगा
न आजचे विज्ञानाचे युगन
मोबाईल जरूर बघा
*- तन्मय म्हात्रे ( जूचंद्र )*
No comments:
Post a Comment