Wednesday, August 17, 2022


🌹 *ग्रुप*🌹

*जपायच नातं म्हणून* *creat केला ग्रुप*
*सगळेच आपले म्हणून, भावना जपा खूप*

*कोणी दिला reply म्हणून हुरळून जायचं नाही*
*आणि नाही दिला reply म्हणून खंत मानायची नाही*

*सर्वांची मत कायम,एकसारखी असतील कशी*
*नकारार्थी,सकारार्थी, प्रत्येकाची वेगळी राशी*

*राखायची असेल अबाधित,एकमेकांची साथ*
*तर दयावाच लागतो सर्वांना,प्रेमाचा हात*

*प्रत्येकाच मत, वेगळं असायलाच हवं*
*तरच घडेल इथे,रोज काहीतरी नवं*

*काय बरं होईल नावडत्या jock वर हसलं तर*
*मनातल्या भावना झाकून, थोडसं फसल तर*

*फक्त एकच करा मित्रांनो,वेळ काढा थोडा*
*प्रत्येक जण असावा,दुसर्या साठी वेडा*

*कधी गडबड,कधी बडबड,कधी तरीच शांतता*
*दाखवून दया ना एकदा,अंतरंगातील एकात्मता* 

*दुरावलेल्या दोन मनात,एक पूल बांधणारा*
*एखादा असतोच ना, निखळणारे दुवे सांधणारा*

*ग्रुप असो नात्यांचा,वा असो तो मैत्रिणींचा*
*आपल्या हजेरीने बनवा,स्वप्नांमधल्या चित्रांचा*
            🌹🌹🌹
==========================================

*दीपपूजना निमित्ताने एक जुनी कविता.*

आधी होते मी दिवटी।
शेतकऱ्यांची आवडती।।

झाले इवली मग पणती।
घराघरातुन मिणमिणती।।

समई केले मला कुणी।
देवापुढती नेवोनी।।

काचेचा मग महाल तो
कुणी बांधुनी मज देतो।।

कंदिल त्याला जन म्हणती।
मीच तयातील परि ज्योती।।

बत्तीचे ते रूप नवे।
कुठे मिळाले मज बरवे।।

वरात मजवाचून अडे।
झगझगाट तो कसा पडे।।

आता झाले मी बिजली।
घरे मंदिरे लखलखली।।

नाही ठाऊक काय पुढे।
नवा बदल माझ्यात घडे।।

एकच ठावे काम मला।
प्रकाश द्यावा सकलांना।।

कसलेही मज रूप मिळो।
देह जळो अन् जग उजळो।।

*********************************************

पाऊस ठेऊनी गेला
ओल्या चिंबट खुणा

हिरवा रंग पसरला
राघूचा सुखवी मना

पिवळी हळद ऊन्हाची 
आलीय भेटण्यासाठी 

सृष्टी अवघी सजली
बनून तरणीताठी 

मोल जुन्या साजाला
आज लाभले नवे

विहरती मुक्त कंठाने
माझ्या मनभर थवे

अजित राऊळ
21.07.17
******************************************


कवितेचे नाव : तू मात्र धीर सोडू नकोस


चार महिने होऊन गेलेत व्यवहार सारे ठप्प झालेत .
साठवलेले चार पैसे कधीच सारे फस्त झालेत .
मांडणीच्या वरच्या कप्प्यातले धान्यांचे डब्बे रिते झालेत .
आता मोजून मापून तेलाची फोडणी भाजीला द्यावी लागतेय .
सध्या या साऱ्या परिस्थितीत सामान्य माणूस जगत आहे .
पण तु सुरक्षित तर आहेस ना ?? मग सैरभैर होऊ नकोस
हे ही दिवस जातील तू मात्र धीर सोडू नकोस .......
काळ वाईट आहे पण आपल्या नकळत जगणं शिकवून जातोय .
अन्न वस्त्र निवारा यांचं महत्व पटवून देतोय .
लाखों रुपयांत न होणारी लग्न काही हजारांत होत आहेत .
कित्तेक मुलींच्या बापाच्या खांद्याचे भार हलके होत आहेत .              
बाहेर खेळायला जण्याचा हट्ट मुलांनी कधीच सोडून दिलाय .
गजबजलेल्या रस्त्यांचा आवाज
भयाण शांततेने वेढून गेलाय .
वाहवत चाललेल्या माणसाला एका विश्रांतीची गरज होतीच                                                                            
ती मिळाली पण , तू मात्र हताश होऊ नकोस
हे ही दिवस जातील . तू मात्र धीर सोडू नकोस ........
सर्वात जास्त हाल हातावर पोट असणाऱ्यांचे झालेत ,
दिवसभर राबून संध्याकाळी तेल मीठ आणणाऱ्यांचे झालेत .
व्यापारी वर्ग सद्य परिस्थितीत पुरता कोलमडून पडला आहे .
कमाई शून्य पण मागणाऱ्यांचा त्याच्या डोक्यावर बडगा आहे .
मध्यमवर्गीय माणूस आपलं उघडपण दाखवायला घाबरतोय .
लोक काय म्हणतील ??? या विचाराने अजूनही बावरतोय .
सगळीच माणसं चार भिंतीत मनाविरुद्ध कोंडून बसलीत ,
हा शरीराचा कोंडमारा मनावर जड होऊन देऊ नकोस .
हे ही दिवस जातील तू मात्र धीर सोडू नकोस .......

%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%


सोपं नसत हो 
**********
सोपं नसतं हो 
प्रतिभावंत स्त्रीवर प्रेम करणं !
कारण तिला पसंत नसते 
"जी हुजुरी"
झुकत नसते ती कधी जोवर नात्यांमध्ये प्रेमाची भावना असत नाही
तुमच्या प्रत्येक हां ला हां आणि ना ला ना म्हणणे तिला मान्य नसतं
कारण ती शिकलेलीच नसते 
नकली धाग्यात नाती गुंफणे!!
तिला ठाऊक नसते सोंगाढोंगाच्या
पाकात बुडवून
आपले म्हणणे मान्य
करवून घेणे!!
तिला तर ठाऊक असते बेधडक
खरे बोलत जाणे!!
फालतू चर्चेत पडणे,
तिच्या स्वभावात बसत नाही
मात्र तिला ठाऊक असते 
तर्कशुध्दपणे आपला विचार कसा मांडायचा ते
ती वेळोवेळी दागदागिने, कपडेलत्ते 
यांची मागणी नाही करत
ती तर सावरत असते स्वतःला आपल्या आत्मविश्वासाने
सजवत असते आपले व्यक्तिमत्व ती
निरागस स्मितहास्याने
तुमच्या चूकांविषयी ती तुम्हांला
अवश्य बोलणार!! 
पण अडचणीच्या काळात तुम्हाला सांभाळून पण घेणार
तिला तिची गृहकर्तव्ये नक्की माहित आहेत
तसेच आपल्या स्वप्नांना पूर्ण करणेदेखील माहित असत!! 
कुठल्याही निरर्थक गोष्टींना मानणे तिला जमत नाही 
पौरुषापुढे ती नतमस्तक नाही होत,
झुकते जरुर 
पण ते तुमच्या निःस्वार्थ प्रेमापुढे
आणि या प्रेमासाठी आपलं सर्वस्व
उधळून देऊ शकते!!
धैर्य असेल निभावण्याचे तर आणि तेव्हाच 
अशा स्त्रीवर प्रेम करावे!!
कारण कोसळत असते आतून ती दगाफटका नि कपटाने,
आणि पुरुषी अहंकाराने,
जी पुन्हा जोडली जाऊ शकत नाही
कुठल्याही प्रेमाखातर....!
----------------
पोलंडच्या प्रसिध्द कवयित्री डोमिनैर
यांची ही कविता आहे..
मराठी अनुवाद भरत यादव यांनी केला आहे..
**
======================================

 मराठीही फारशी सोपी नाही..

" *काढा* " पिऊन मग एक झोप " *काढा* ".

" *हार* " झाली की " *हार* " मिळत नाही. 

. " *पळ* " भर थांब, मग पळायचे तिथे " *पळ* ".

" *दर* " वर्षी काय रे " *दर* " वाढवता..??

" *भाव* " खाऊ नकोस, खराखरा " *भाव* " बोल.

. " *वर* " पक्षाची खोली " *वर* " आहे.

. फुलांच्या " *माळा* " केसांत " *माळा* ".

*मराठीची अवखळ वळणे....*

ज्यांना तोंडावर *"बोलून टाकणं"* जमत नाही ते पाठीमागे *"टाकून बोलत"* राहतात. 
.
शहाणा माणूस *"पाहून हसतो"*, निर्मळ माणूस *"हसून पाहतो"*.
.
काम सोपं असेल तर ते आपण *"करून पाहतो"*, अवघड असेल तर *"पाहून करतो"*

एकजण *"लिहून बघतो"* तर दुसरा *"बघून लिहितो"*
.
*ही अशी सुंदर, लवचीक, अवखळ मराठी* 

आता हेच बघा ना,

एखाद्याचा सत्कार करताना आपण देतो *श्रीफळ,* तर हकालपट्टी करताना देतो *नारळ!!*

🙏
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

नाती पाकात मुरलेल्या गुलाबजाम इतकी गोडच असावीत असं नाही. खरंतर ती तशी गोड मिट्ट असूच नयेत. 

ती टपरीवरच्या कांदाभजीसारखी असावीत अगदी साधी पण हवीहवीशी. कधीही कुठंही हाकेला ओ देऊन धावत येणारी.

नाती असावीत गरमागरम चहासारखी, एकदा भुरका मारला की डोकं आणि मन फ्रेश करुन देणारी.

नाती असावीत साध्या वरणासारखी,
नाती पुरणासारखी पचायला जड असू नयेत. ती जितकी मक्याच्या लाह्यांसारखी हलकी असतील तेवढी दिवसेंदिवस फुलत जातात.

नाती सीताफळा सारखी असू नयेत. समज कमी नि गैरसमज जास्त. एकवेळ ती फणसासारखी असतील तरी चालेल. वरुन काटेरी आतून रसाळ.

नाती असावीत सुधारसा सारखी, आपल्या आर्थिक चणचणीच्या काळात पक्वान्न खाल्ल्याचं समाधान देणारी.

नाती कडूही असावीत पण कारल्याइतकी असू नयेत. ती मेथीच्या भाजी इतकी कडवट असावीत त्यांचा कडवटपणाही जीभेला चव आणणारा असावा.

नाती श्रीखंडा सारखी श्रीमंत नसली तरी चालेल पण ताका सारखी शिणवटा दूर करणारी असावीत.

नाती दूधासारखी नासणारी नकोत. तूपासारखी अमर हवीत. पाण्याचा शिबका मारला की कडकड आवाज करणारं तूप त्याच्या घमघमाटानं घर भरुन टाकतं तशी नातीसुद्धा पुरेपूर कढलेली आणि सुगंध पसरवणारी असावीत.

नाती असावीत देवाला दाखवलेल्या नैवेद्याच्या पानासारखी. मात्र नैवेद्याच्या पानात वेगळं मीठ वाढलेलं नसतं. कारण पदार्थां मधलं मीठ बरोबर असतं. हे चवीपुरतं मीठ प्रत्येक पदार्थात असावंच लागतं.

नैवेद्याचं पान देवाने उष्टं केलेलं, त्याला सर्वच मान देतात. मग चटणी कोशिंबीर असो वा पोळीभाजी, नैवेद्याच्या पानातल्या सर्वांना अगदी आदराची, पावित्र्याची वागणूक मिळते.

असंच नात्यामधे असावे एकमेकांचा आदर करून नाती फुलवावी!
🌷🙏💕शुभ सकाळ💕🙏🌷

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

 फक्त एक 
छान मैत्रीण हवी...

पन्नाशीचीच स्त्री आता 
सर्वात तरुण असते
अनुभवांच्या
 शिदोरीसकट
 बोल्डसुद्धा असते

कुरकुरणाऱ्या
 गुडघ्यांना ती 
सहज adjust करते
मुलांबरोबर 
लहान होते
 मुलीचीही 
मैत्रीण होते

संसारात राहूनही
 स्वतः ची स्पेस
 जपते.
गाणी गोष्टी 
मूव्ही नाटक 
हव्वे तेव्हा बघते 

पन्नाशीची स्त्री 
सर्वात स्मार्ट 
म्हणने काही  
वावगं ठरणार नाही 

बाहेर जाण्यासाठी
 आता परवानगी
 लागत नाही
लोक काय 
म्हणतील याची
 काळजी 
करत नाही

साडी आणि 
सासू आता
 discussion 
उरले नाही

विमानाचे पंख 
लावून तिला 
जग फिरायचे 
असते

अंगभर दागिन्यांना
 केव्हाच सुट्टी देते
डायमंडचं मंगळसूत्र
 तेवढं दिमाखात
 मिरवते

जगायचच राहून गेलेलं 
ती आता जगत असते
पन्नाशीचीच स्त्री आता 
सर्वात तरुण असते. 

 देवाला मी आज
 निवांत पाहीलं 
आणि लगेच एक
 फूल वाहिलं 

देवाने हसून म्हटलं 
"मागा, काय जे
 मनात साठलं..."

"देवा मला 
नको काही,
कोऱ्या कागदावर
 सही घे ..."

"एक मिनिट, 
एक मिनिट...
विचारलेच आहेस
 म्हणून मागतोय...

एक छानशी 
मैत्रीण दे...
हवे तर अजुन 
एखादे फुल घे...

दिसायला छान
 नसली तरी चालेल... 
पण बोलायला छान
 असायला हवी

डोळे सुंदर नसले
 तरी चालेल... 
पण नजरेतून
 बोलणारी हवी,

केस लांब नसले 
तरी चालेल...
पण सोबत लांब
 चालणारी हवी

माझ्या प्रत्येक
 दुःखात 
रडली नाही 
तरी चालेल...

फक्त माझ्या 
सुखात थोडे
 हसणारी हवी

यातलेही काही 
कमी असेल 
तरी चालेल...
फक्त एक 
छान मैत्रीण हवी..

मैत्रीण..
 
खरंच खूप छान लेख आहे आणि ज्यांनी लिहले आहे त्याला माझ ही अभिवादन.

किती गोड असते हो आपल्या आयुष्यात एक मैत्रीण असणे,
कारण ती मैत्रीण नाही तर आपल्या प्रत्येक सुख दुःखा मध्ये आपल्या सोबत असणारी आणि देवाने आपल्याला आधार रुपी दिलेली एक मागणी असते,
ती मैत्रीण नसते तर आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारी एक व्यक्ती असते 

पन्नाशीच्या स्त्रिया चें अगदी नेटकं वर्णन, खरेच पन्नाशी नंतर स्त्रियांना पंख फुटल्याचे जाणवते आहे,
मैत्रिणीबद्दल खुपच छान लिहीले.वाचून अगदी मन भरुन आले.
मैत्रीणिची पण आपल्या आयुष्यात एक वेगळीच भूमिका असते.तिच्यासोबतीने कुठल्याही वयात आयुष्याचा स्वच्छंदपणे आस्वाद घेता येतो.

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...