Wednesday, August 17, 2022

- मैत्री -

मैत्री असते जशी
गो...ड शब्दांची लेखणी
लिहावं आपण तशा
गुंफते सुंदर ओळींची वाचणी

मैत्री असते गोड गाणं
जसं असतं मनातलं बोलनं
मैत्री असते दुखः जाणणं
जसं असतं आनंदाने जगनं

मेत्री असते थंड सावली
जशी वृक्षवेढीत मणाली
मैत्री असते जाळीदार वेली
जशी असते पहाटेची लाली

मैत्री असते निर्मळ पाणी 
मैत्री असते नव तराणी
जशी असते सोबतीची आखणी
मैत्री असते व-यावणी

मैत्री असते आनंदी स्वर्ग 
जसा दिसतो धरती निसर्ग
मैत्री आसते कोवळे ऊन
त्यातून घ्यावे चांगले गुण

मैत्री असते गोष्टींचे जग 
मैत्री असते निळे नभ
जसे आसतात आकाशात ढग
मैत्री असते उडते खग
    ...सुप्रभात...
=========================

: ळ' ने सुरू होणारे मराठी शब्द आहेत का?
'ळ' ने सुरु होणारे कोणतेही मराठी शब्द नाहीत पण 'ळ'कार हा शद्ब 'ळ' ने सुरु होणारा आहे असे म्हणू शकतो, नाही का (?) 😜 असो. मी ळ ने सुरु होणारी एक कविता लिहीली होती ती इथे देत आहे. आशा आहे ह्या कवितमुळे ळवरील अन्याय दूर होईल

'ळ'कार

'ळ'कार आढळे

सकाळी आभाळी

जळी तो स्थळी तो

ना काष्ठी-पाषाणी

कळ्यांच्या कपाळी

तळ्याच्या तळाशी

अवकाळी हळव्या

डोळ्यांत पावसाळी

'ळ'कार भासे

मज हो दळीद्री

शद्बांतरी मेळ

प्रारंभी नाही...

गौरव जोशी, 
QUORA वरून


*************************************************

: *देवा आवरतं घ्या !*
--------------------------------

*बस झालं देवा अजून*
*किती जीव घेता ?*
*का हळूहळू असं करून*
*सगळ्यालाच नेता ?*

*काही केल्या कोरोनाची*
*थांबत नाही वारी*
*प्रत्येकालाच वाटायलंय*
*लागती काय की बारी*

*अर्धे अधिक लोकं तर*
*धस्कटूनच मेले*
*तिकडून तिकडच म्हणे*
*मसनवाट्यात नेले*

*बॅक्टेरिया का व्हायरस*
*सायंटिस्टलाच कळंन*
*कोणतं घ्यावं औषध*
*याचं उत्तर मिळंन*

*माणसाला वाटत होतं*
*फार प्रगती केली*
*चंद्रावर मंगळावर*
*त्याने यानं नेली*

*खरंच बाबा तुझ्यापुढे*
*आम्ही नाही कोणी*
*नाक घासून पाया पडतो*
*हात जोडतो दोन्ही*

*जाउद्यानं देवा आता*
*तुम्हीच काढा मार्ग*
*थोडे दिवस जगू द्या*
*नको आत्ताच स्वर्ग*

*बघा बघा सगळं जग*
*कसं भकास झालं*
*देवळाचं दार सुद्धा*
*गच्च बंद झालं*

*अल्ला हो अकबरची* 
*बांग येत नाही*
*राम कृष्ण हरि आणि*
*पालखी निघत नाही*

*चार भिंतीत माणूस कोंडला*
*येत नाही मजा*
*बस झालं देवा अजून*
*किती देणार सजा ?*

*जाणं येणं हिंडणं-फिरणं*
*सारं झालं बंद*
*मातीचा फुलांचा*
*संपून गेला गंध*

*धबधबे हिरवी झाडं*
*टीव्हीत पहात बसतो*
*सहलीचे फोटो पाहून*
*खोटं खोटं हसतो*

*हात जोडून विनंती आहे*
*देवा आवरतं घ्या*
*तुम्हीच आता कोरोनाला*
*तुमच्या सोबत न्या*

(सदर कविता माझी नाही मला आवडली शेअर केली लिहिणाऱ्यालां सलाम!)
========================================


 नवरात्रीच्या नवविध माळा
घेऊनि आल्या नवरंगांना
नवी झळाळी पानफुलांना
नवी नव्हाळी तृणपात्यांना

नवस्वप्नांना रंग नविनसे
नवपंखांना चंग गगनिचे
नवनवलाई धरणी वरती
नवनवलाई अस्मानावर

नवागतांचे स्वागत सुखकर
नवरात्रांचे आंदण शुभकर
स्त्रीशक्तीचे पूजन मनभर
निसर्ग देतो शुभ हा अवसर

अजित राऊळ
25.09.2014

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...