
*...कान की व्यथा...*
पढें और आनंद लें....
मैं हूँ कान... हम दो हैं... जुड़वां भाई...
लेकिन हमारी किस्मत ही ऐसी है
कि आज तक हमने अपने दूसरे
भाई को देखा तक नहीं
...
...पता नहीं.. कौन से श्राप के कारण
हमें विपरित दिशा में चिपका कर
भेजा गया है
...
...दु:ख सिर्फ इतना ही नहीं है...
हमें जिम्मेदारी सिर्फ सुनने की मिली है..
गालियाँ हों या तालियाँ..,
अच्छा हो या बुरा..,
सब हम ही सुनते हैं...
धीरे धीरे हमें *खूंटी* समझा जाने
लगा...
चश्मे का बोझ डाला गया,
फ्रेम की डण्डी को हम पर फँसाया
गया...
ये दर्द सहा हमने...
क्यों भाई..???
*चश्मे का मामला आंखो का है*
*तो हमें बीच में घसीटने का*
*मतलब क्या है...???*
हम बोलते नहीं तो क्या हुआ,
सुनते तो हैं ना...
हर जगह बोलने वाले ही क्यों
आगे रहते है....???
बचपन में पढ़ाई में किसी का दिमाग
काम न करे तो
*मास्टर जी हमें ही मरोड़ते हैं
...*
...* जवान हुए तो
आदमी,औरतें सबने सुन्दर सुन्दर लौंग,
बालियाँ, झुमके आदि बनवाकर
हम पर ही लटकाये...!!!
*छेदन हमारा हुआ,*
*और तारीफ चेहरे की ...!*
और तो और...
श्रृंगार देखो... आँखों के लिए काजल...
मुँह के लिए क्रीमें...
होठों के लिए लिपस्टिक...
हमने आज तक कुछ माँगा हो तो
बताओ...
कभी किसी कवि ने, शायर ने
कान की कोई तारीफ की हो तो बताओ...
इनकी नजर में आँखे, होंठ, गाल,
ये ही सब कुछ है...
*हम तो जैसे किसी मृत्युभोज की*
*बची खुची दो पूड़ियाँ हैं..,*
जिसे उठाकर चेहरे के साइड में
चिपका दिया बस...
और तो और,
कई बार *बालों के चक्कर में*
*हम पर भी कट लगते हैं* ...
हमें डिटाॅल लगाकर पुचकार दिया
जाता है...
बातें बहुत सी हैं, किससे कहें...???
कहते है दर्द बाँटने से मन हल्का
हो जाता है...
आँख से कहूँ तो वे आँसू टपकाती
हैं...नाक से कहूँ तो वो बहाता है...
मुँह से कहूँ तो वो हाय हाय करके
रोता है...
और बताऊँ...
*पण्डित जी का जनेऊ,*
*टेलर मास्टर की पेंसिल,*
*मिस्त्री की बची हुई गुटखे की पुड़िया*
सब हम ही सम्भालते हैं...
और आजकल ये नया नया *मास्क*
का झंझट भी हम ही झेल रहे हैं...
कान नहीं जैसे पक्की खूँटियाँ हैं हम...
और भी कुछ टाँगना, लटकाना हो
तो ले आओ भाई...
तैयार हैं हम दोनों भाई...!¡!


======================================
*कवी श्री सुरेश भट यांची एक अप्रतिम कविता
*मी कुणाला कळलो नाही*
मित्र कोण आणि शत्रू कोण
गणित साधे कळले नाही..
नाही भेटला कोण असा
ज्याने मला छळले नाही...
सुगंध सारा वाटीत गेलो
मी कधीच दरवळलो नाही..
ऋतू नाही असा कोणता
ज्यात मी होरपळलो नाही..
केला सामना वादळाशी
त्याच्या पासून पळालो नाही..
सामोरा गेलो संकटाना
त्यांना पाहून वळलो नाही..
पचऊन टाकले दु:ख सारे
कधीच मी हळहळलो नाही..
आले जीवनी सुख जरी
कधीच मी हुरळलो नाही..
कधी ना सोडली कास सत्याची
खोट्यात कधीच मळलो नाही...
रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच पण
मी कुणाला कळलोच नाही...!
मी कुणाला कळलोच नाही...!
कवी सुरेश भट
कवी सुरेश भट
==========================================
ज्याक्षणी या शरीरात अडकणं संपेल
तो क्षणच अनंत - चतुर्दशी !
जेंव्हा अहम् आणि त्वम् एकजीव
होतील तीच अनंत - चतुर्दशी !
पाहुणा आहे इथे प्रत्येकजण
बाप्पासारखा काही दिवसांचा
कोणी दीड, कोणी पाच
तर कोणी दहा दिवसांचा...
थोडा वेळ आहोत इथे
तर थोड जगुन घेऊया
बाप्पा सारखे थोडे
लाडु मोदक खाऊन घेऊया...
इथे सर्वच आहेत भक्त आणि
सगळ्यांमध्ये आहे बाप्पा
थोडा वेळ घालवू सोबत
आणि मारु थोड्या गप्पा...
मनामनातले भेद मिटतील
मिटतील सारे वाद
एक होईल माणुस
आणि साधेल सुसंवाद...
जातील निघुन सारेच
कधी ना कधी अनंताच्या प्रवासाला
ना चुकेल हा फेरा
जन्माला आलेल्या कोणाला...
बाप्पा सारखं नाचत यायचे
आणि लळा लावुन जायचे
दहा दिवसांचे पाहूणे आपण
असे समजून जगायचे...
किंमत तुमची असेलही
तुमच्या प्रियजनांना लाख
आठवणी ठेवतील जवळ
अन् विसर्जित करतील तुमची राख...
पाहुणा आहे ईथे प्रत्येकजण
दीड दिवस अन् दहा दिवसाचा
हे जगणे म्हणजे एक उत्सव
हा काळ दोन घडींच्या सहवासाचा.............





चिऊ काऊचा घास हरवला,
कार्टून नेटवर्कसंग तो भरवला.
मोबाईल टीव्हीची आली सुगी,
मुलं अवतरली या युगी!

थालीपीठ कुरमुरे उडून गेले,
लेज,कुरकु-याचे थवे आले.
चटपटी खाऊ घेऊन आली स्विगी,
मुलं अवतरली या युगी!





लिंबोणीच्या झाडामागे झोपली अंगाई,
युट्युब पहायला ओढली रजई.
दिवसा झोप..रात्री जागी,
मुलं अवतरली या युगी!

मैदानी खेळ हातात आले,
पब जी,पी एस मागे धावती मुले.
वाय-फाय,डाटा पसरला जगी,
मुलं अवतरली या युगी!

वह्या पुस्तकांचा गेला जमाना,
पेन ड्राईव्ह,आयपॅडशी केला याराना.
ऑनलाइन शिक्षण झाले उगी,
मुलं अवतरली या युगी!



पालकहो

आधी संस्कार मग द्या साधने,
गाऊ देत मग विज्ञानाचे गाणे.
नाविन्याची घेऊन गुढी
मुलं अवतरली या युगी!
**************************************************
*
!
!
!*
!
!
!**# ती कायम ऑनलाइन असते ...*
ती कायम ऑनलाइन असते तरी
घरात सगळ्यात आधी उठते.
ती कायम ऑनलाइन असते तरी
बराच वेळ किचन मध्ये असते.
ती कायम ऑनलाइन असते तरी
मुलांच्या हाकेवर असते.
ती कायम ऑनलाइन असते तरी
घरच्यांचं रुटीन सांभाळते.
ती कायम ऑनलाइन असते तरी
सगळे सणवार करते.
ती कायम ऑनलाइन असते तरी
जगरहाटी सांभाळते.
ती कायम ऑनलाइन असते तरी
सगळ्यांशी संबंध जपते.
ती कायम ऑनलाइन असते तरी
बाहेरचे व्यवहार बघते.
ती कायम ऑनलाइन असते तरी
ऑफिसची कामं करते.
ती कायम ऑनलाइन असते तरी
तिचे छंद जोपासते.
ती कायम ऑनलाइन असते तरी
एवढा मोठा मित्रपरिवार जपते.
ती कायम ऑनलाइन असते तरी
तिच्या मनात सतत घर असते.
ती कायम ऑनलाइन असते म्हणून
*सलाईनवर नसते तर*
*लाईफलाईन वर असते...*
सगळ्या *online* महिलांना
*माझा सलाम._
*

*
No comments:
Post a Comment