पुनित मातकर, गडचिरोली
*अपूर्ण कविता*
शाळा सुटल्याच्या दीर्घ घंटेचा
आवाज विरत नाही तोच
सुसाट वेगानं मी पोहोचायचो
घराच्या दारात...
पाठीवरलं दप्तर फेकून
घोड्यागत उधळत
पोहोचायचो मैदानात,
मस्तवाल बैलासारखा
धूळमातीत बेभान होऊन
मिरवत राहायचो स्वतःचं
पुरूष असणं..
तीही यायची शाळेतून..
चार रांजण पाणी...
घरअंगणाची झाडलोट...
देव्हा-यातला दिवा लावून
ती थापायची गोल भाक-या
अगदी मायसारखीच
अन् बसून राहायची उंब-यावर..
रानातून माय येईस्तोवर
ती चित्र काढायची..
रांगोळ्या रेखायची..
भुलाबाईची गाणी अन्
पुस्तकातल्या कविता
गोड गळ्यानं गायची....
धुणंभांडी..सडा सारवण
उष्टं खरकटं..सारं मायवानीच करायची
मी पाय ताणून निजायचो,
ती पुस्तक घेऊन बसायची....
दिव्याच्या वातीत उशीरापर्यंत...
एकाच वर्गात असून मास्तर
माझा कान पिळायचे
कधीकधी हातानं....
कधी शब्दानं ...
"बहिणीसारखा होशील तर
आयुष्य घडवशील..."म्हणायचे,
मग करायचो कागाळ्या
मायजवळ...
मॕट्रिकचा गड
मी चढलो धापा टाकत..
तीनं कमावले मनाजोगते गुण,
बाप म्हणला
दोघांचा खर्च नाही जमायचा
त्याला शिकु दे पुढं...
टचकन डोळ्यात आलेलं पाणी
तसच मागं परतवत
ती गुमान बाजुला झाली
पाठच्या भावाच्या रस्त्यातून...
ती शेण गोव-या थापत राहिली..
मायसंग रानात रापत राहिली
काटे तणकट वेचत राहिली...
बाईपण आत मुरवत राहिली
तिच्या वाट्याचा घास घेऊन
मीही चालत राहिलो
पुस्तकांची वाट...
कळत गेलं
तसं सलत राहिलं
तिनं डोळ्यातून परतवलेलं
पाणी...
तिला उजवून बाप
मोकळा झाला..
मायला हायसं वाटलं..
मी मात्र गुदमरतो अजुनही
अव्यक्तशा
ओझ्याखाली...
दिवाळी..रसाळी..राखीला
ती येत राहते
भरल्या मनानं..
पाठच्या भावाच्या वैभवानं हरखते..
बोटं मोडून काढते दृष्ट..
टचकन आणते डोळ्यात पाणी..
पाठच्या भावासाठी
जाताना पुन्हा सोडून जाते..
मनभरून आशीर्वाद...
ती गेल्यावर मी हूरहूरत राहतो
ज्योतीसारखा
जिच्या उजेडात ती
उशीरापर्यंत वाचायची पुस्तक,
पाठ करायची कविता...
*जिची कविता राहिली माझ्यासाठी अपूर्ण....*
*पुनीत मातकर*
गडचिरोली
==============================================
भेट
आयुष्यात भेटणारं कोणीच
अकारण भेटत नसतं
विधात्याने जाणीवपूर्वक लिहिलेलं
आयुष्यातलं ते एक पान असतं
भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून
काहीतरी शिकणं त्याला अपेक्षित असतं
म्हणूनच बहुदा त्याने दोघांच्या
भेटीचं नाट्य घडवून आणलेलं असतं
मित्र असोत वा शत्रू
प्रत्येक जण जणू एक पुस्तक असतं
ते कसं वाचायचं हे प्रत्येकाने
आपापलं ठरवायचं असतं
शंभर टक्के चांगलं किंवा
शंभर टक्के वाईट कोणीच नसतं
प्रत्येकात चांगलं असं
काही ना काही दडलेलंच असतं
त्यातलं चांगलं ते अधिक
आणि वाईट ते उणे करायचं असतं
"मीपण" पूर्ण वजा करून
"माणूसपण" तेवढं जमा ठेवायचं असतं
स्वतःसाठी जगताना दुसऱ्यासाठीही
जगता येतं का पाहायचं असतं
कोणासाठी आधारवड तर कोणासाठी
श्रावणधारा होऊन बरसायचं असतं
म्हणून मला भेटणाऱ्या प्रत्येकाच्या मनात
माझ्यासाठी इवलासा कोपरा असू दे
त्यांच्याही आयुष्यात विधात्याने लिहिलेलं
माझ्या नावचं फक्त एक पान असू दे!
========================================
विवाहित पूरूषांचे कधीही प्रगट न होणारे अंतर्मन सुंदर शब्दांत गुंफलेले एक सुंदर काव्य. प्रत्येक विवाहित स्त्रीने जरूर वाचावे.

||आता पर्यंत बायको वरील कविता ऐकली असेल व वाचली असेल पण नवऱ्या वरील एकदा वाचा ||
*नवरा म्हणजे समुद्राचा*
*भरभक्कम काठ*
*संसारात उभा राहतो*
*पाय रोवून ताठ ll*
*कितीही येवो प्रपंच्यात*
*दुःखाच्या लाटा*
*तो मात्र शोधीत राहतो*
*सुखाच्या वाटा ll*
*सर्वांच्या कल्याणा करता*
*पोटतिडकीने बोलत राहतो*
*न पेलणारं ओझं सुद्धा*
*डोक्यावर घेऊन चालत राहतो ll*
*कधी कधी बायकोलाही*
*त्याचं दुःख कळत नसतं*
*आतल्या आत त्याचं मन*
*मशाली सारखं जळत असतं ll*
*नवरा आपल्या दुःखाचं*
*कधीच प्रदर्शन मांडत नाही*
*खूप काही बोलावसं वाटतं*
*पण कुणाला सांगत नाही ll*
*बायकोचं मन हळवं आहे*
*याची नवऱ्याला जाणीव असते*
*दुःख समजून न घेण्याची*
*अनेक बायकात उणीव असते ll*
*सारं काही कळत असून*
*नवऱ्याला अपमान गिळावे लागतात*
*वेदनांना काळजात दाबून*
*पुन्हा कष्ट उपसावे लागतात ll*
*सगळ्यांच्या आवडी जपता जपता*
*मन मारीत जगत असतो*
*बायको , पोरं खूष होताच*
*तो सुखी होत असतो ll*
*इकडे आड तिकडे विहीर*
*तशीच बायको आणि आई*
*वाट्टेल तसा त्रास देतात*
*कुणालाच माया येत नाही ll*
*त्याने थोडी हौसमौज केली तर*
*धुसफूस धुसफूस करू नका*
*नवऱ्या विरुद्ध विनाकारण*
*दारू गोळा भरू नका ll*
*दोस्ता जवळ आपलं मन*
*त्यालाही मोकळं करावं वाटतं*
*हातात हात घेऊन कधी*
*जोर जोरात रडावं वाटतं ll*
*समजू नका नवरा म्हणजे*
*नर्मदेचा गोटा आहे*
*पुरुषाला काळीज नसतं*
*हा सिद्धांत खोटा आहे ll*
*मी म्हणून टिकले इथं*
*दुसरी पळून गेली असती*
*बायकोनं विनाकारण*
*नवऱ्याला धमकी दिलेली असती ll*
*घरात तुमचं लक्षच नाही*
*हा एक उगीच आरोप असतो*
*बाहेर डरकाळ्या फोडणारा*
*घरी म्यांव म्यांव करीत बसतो ll*
*सारख्या सारख्या किरकिरीनं*
*त्याचं डोकं बधिर होतं*
*तडका फडकी बाहेर जाण्यास*
*खूप खूप अधीर होतं ll*
*घरी जायचं असं म्हणताच*
*त्याच्या पोटात गोळा येतो*
*घरात जाऊन बसल्या बसल्या*
*तोंडात आपोआप बोळा येतो ll*
*नवरा म्हणा , वडील म्हणा*
*कधी कुणाला कळतात का ?*
*त्यांच्या साठी कधी तरी*
*कुणाची आसवं गळतात का ? ll*
*पेला भर पाणी सुद्धा*
*चटकन कुणी देत नाही*
*कितीही पाय दुखले तरी*
*मनावर कुणी घेत नाही ll*
*वेदनांना कुशीत घेऊन*
*ओठ शिउन ' तो ' पडून राहतो*
*सर्वांच्या सुखासाठी*
*एकतारी भजन गातो ll*
*बायको आणि मुलांनी*
*या संताला समजून घ्यावं*
*फार काही नकोय त्याला*
*दोन थेंब सुख द्यावं ll*
*मग बघा लढण्यासाठी*
*त्याला किती बळ येतं*
*नवऱ्याचं मोठेपण हे*
*किती जणांच्या लक्षात येतं ? ll*






=========================================
*दिवंगत जैन मुनि तरुण सागर जी द्वारा रचित कविता*
*"आदमी की औकात"*
*फिर घमंड कैसा*
घी का एक लोटा,
लकड़ियों का ढेर,
कुछ मिनटों में राख.....
बस इतनी-सी है
*आदमी की औकात !!!!*
एक बूढ़ा बाप शाम को मर गया,
अपनी सारी ज़िन्दगी,
परिवार के नाम कर गया,
कहीं रोने की सुगबुगाहट,
तो कहीं ये फुसफुसाहट....
अरे जल्दी ले चलो
कौन रखेगा सारी रात.....
बस इतनी-सी है
*आदमी की औकात!!!!*
मरने के बाद नीचे देखा तो
नज़ारे नज़र आ रहे थे,
मेरी मौत पे.....
कुछ लोग ज़बरदस्त,
तो कुछ ज़बरदस्ती
रोए जा रहे थे।
नहीं रहा........चला गया.....
दो चार दिन करेंगे बात.....
बस इतनी-सी है
*आदमी की औकात!!!!*
बेटा अच्छी सी तस्वीर बनवायेगा,
उसके सामने अगरबत्ती जलायेगा,
खुश्बुदार फूलों की माला होगी....
अखबार में अश्रुपूरित श्रद्धांजली होगी.........
बाद में कोई उस तस्वीर के
जाले भी नही करेगा साफ़....
बस इतनी-सी है
*आदमी की औकात ! ! ! !*
जिन्दगी भर,
मेरा- मेरा- किया....
अपने लिए कम ,
अपनों के लिए ज्यादा जिया....
फिर भी कोई न देगा साथ.....
जाना है खाली हाथ.... क्या तिनका ले जाने के लायक भी,
होंगे हमारे हाथ ??? बस
*ये है हमारी औकात....!!!!*
*जाने कौन सी शोहरत पर,*
*आदमी को नाज है!*
*जो आखरी सफर के लिए भी,*
*औरों का मोहताज है!!!!*
*फिर घमंड कैसा ?*
*बस इतनी सी हैं*
*हमारी औकात...*








म्हणुन मी हल्ली बोलतच नाही.....
मित्रांची नावे ई-मेल आय.डी. असतात,
भेटायच्या जागा चाट-रूम असतात,
कट्ट्यावर कोणी आता भेटतच नाही,
दिलखुलास शिवी कानी पडतच नाही,
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही...
दिसले कि हाय, जाताना बाय
पण समोर असताना प्रश्नचिन्ह, कि बोलायच काय,
अशी खोटी जवळीक मी कधी साधतच नाही,
मुखवट्याआड चेहरा कधी लपवत नाही
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही...
आज इथे उद्या तिथे...कोणासाठी कोणी थांबणार नाही
कोणीतरी साथ द्यावी हा माझा अट्टहास पण नाही,
पण इथुन तिथे जाताना कोणी निरोप तरी देइल कि नाही,
जाताना आपण, कोणी एक अश्रु तरी ढाळेल कि नाही,
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही....
शब्दच हल्ली अर्थ विसरतात,
संवेदनाच हल्ली बधीर होतात,
भावनाच हल्ली बोथट होतात,
अगदी थोडी माणसचं हि कविता शेवटपर्यत वाचलीत.
म्हणुन....................
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही....
***********************************************
ज्याना मिठीच मारावी,
त्यांचा स्पर्श आपण टाळतोय!
मरणासारख्या जगण्यावरती,
तोंड झाकून आपण भाळतोय!
जन्मा आलोय...मरणारच रे,
त्याचं दुःखं वाटत नाही!
हवीहवीशी माणसं टाळतोय,
कुणीच घट्ट भेटत नाही!
डोळे बघतात आपली माणसं,
भिती भेटू देत नाही!
दार सताड उघडं असून,
कुणीच आत येत नाही!
कळप करून कुत्रे फिरतात,
कळप करून गुरं चरतात!
फक्त कळप केल्यानंतर,
सांगा माणसंच कशी मरतात?
गर्दीसुद्धा गरज असते,
कोलाहल पण असतो हवा!
जगणंच गुदमरवते इतकी,
वाईट असते शुद्ध हवा!
मैत्री असते खरा आशय,
तरी डोळ्यामध्ये संशय!
भेट केवढी धुवून पुसून,
संसर्ग हाच असतो विषय!
गाडी बाहेर पडत नाही,
झाडं मागे जात नाहीत!
भूक लागली तरी कुणी,
बाहेर काही खात नाही!
मोकाट झालो म्हणून का ही,
नजरकैद वाढली पानात!
उन्मत्तच झालो म्हणून,
उपमर्द लाभला दानात?
कारणं असोत काहिही पण,
कैद बेड्या, साखळ्या नसून!
घर असून बेघर वाटतंय,
एकांतच हा गेलाय डसून!
संसर्ग वा प्रादुर्भाव,
असले शब्द झिजतात खूप!
प्रवास, मैफिल असले शब्द,
जणू घट्ट गोठलं तूप!



No comments:
Post a Comment