Wednesday, August 17, 2022

 👌मीच मला सांगतो👌

            *******************

    *झाली साठी,येईल सत्तरी*
*करत नाही मी चिंता*
*प्रत्येक दिवस मजेत जगतो* 
*वाढवत नाही गुंता* 

    *वय झालं म्हातारपण आलं*
*उगीच बोंबलत बसत नाही*
*विनाकारण बाम लावून*
*चादरीत तोंड खुपसत नाही*

     *तुम्हीच सांगा खेळायला जायला*
*वयाचा संबध असतो का ?*
*नेहमी नेहमी घरात बसून* 
*माणूस आनंदी दिसतो का ?*

     *पोटा पाण्यासाठी पोरं*
*घर सोडून जाणारच* 
*प्रत्येकाच्या आयुष्या मधे*
*असे रितेपण येणारच* 

      *करमत नाही करमत नाही*
*सारखे सारखे म्हणत नाही* 
*मित्रां सोबत दिवस घालवतो*
*घरात कुढत बसत नाही*

     *घरातल्या घरात वा बागेत*
*हिंडाय-फिरायला जातो* 
*वय जरी वाढलं तरी* 
*रोमँटिक गाणं गातो* 

     *गुडघे गेले , कंबर गेली*
*नेहमी नेहमी कण्हत नाही* 
*आता आपलं काय राहिलं* 
*हे बोगस वाक्य म्हणत नाही*

     *पिढी दर पिढी चाली रीतीत*
*थोडे फार बदल होणारच* 
*पोरं पोरी त्यांच्या संसारात* 
*कळत नकळत गुंतणारच* 

      *तू-तू , मैं-मैं , जास्त अपेक्षा*
*कुणाकडूनही करत नाही*
*मस्तपैकी जगायचं सोडून*
*रोज रोज थोडं मरत नाही*

       *स्वतःलाच समजून घेतो*
*पुढे पुढे चालत राहतोे*
*वास्तू तथास्तु म्हणत असते*
*हे उमजुन मी जास्तीच जगत असतो*

 🙏🏼 (सेवानिवृत्त आणि ज्येष्ठ मंडळींना समर्पित) 🙏
=====================================


 देव मानावा की मानू नये 
या भानगडीत मी पडत नाही
आपल्या मान्यतेवाचून
देवाचं काही अडत नाही

ज्यांना देव हवा आहे
त्यांच्यासाठी तो श्वास आहे
ज्यांना देव नकोच आहे
त्यांच्यासाठी तो भास आहे..
आस्तिक नास्तिक वादात
मी कधीच पडत नाही....
आपल्या मान्यतेवाचून
देवाचं काही अडत नाही....

हार घेऊन रांगेत कधी
मी उभा रहात नाही...
पाव किलो पेढ्याची लाच 
मी देवाला कधी देत नाही
जो देतो भरभरून जगाला
त्याला मी कधी देत नाही
आपल्या मान्यतेवाचून
देवाचं काही अडत नाही...

जे होणारच आहे ....
ते कधी टळत नाही...
खाटल्यावर बसून
कोणताच हरी पावत नाही
म्हणून मी कधी ...
देवास वेठीस धरीत नाही
आपल्या मान्यतेवाचून
देवाचं काही अडत नाही...

देव देवळात कधीच नसतो
तो शेतात राबत असतो
तो सीमेवर लढत असतो
तो कधी आनंदवनात असतो
कधी हेमलकसात असतो...
देव शाळेत शिकवत असतो
कधी देवच शिकत असतो
म्हणून ....
आपल्या मान्यतेवाचून
देवाचं काही अडत नाही...

************************************************

 लेक_सून

कोण म्हणतं बाईला
लेकच जवळची असते
लेक चार घटका लागते
सून मात्र मरेपर्यंत लागते

माहेरवाशीण लेकीला
चार दिवस खाऊ घालते
आयुष्यभराची पोळी मात्र
बाई सुनेकरताच ठेवते

परक्याच धन बोलून लेकीला
बाई शंभर वेळा टोकते
काहीही झालं तरी आपल्या घरची
म्हणत सुनेला नेहमी माफ करते

घरामधली प्रत्येक गोष्ट
बाई लेकीवरच लादते
मात्र सुनेची प्रत्येक गोष्ट
तिच्याच कलेने घेते

लेकीच बाळंतपण करून
बाई लगेच मोकळी होते
सुनेच्या पोराला मात्र
दुधावरच्या सायीप्रमाणे जपते

कोण म्हणतं सुनेवर 
सासू अत्याचार करते
सासू स्वतःची जागा सोडते
अन ती तर सुनेलाच देते

फरक फक्त एका शब्दाचा असतो
शब्दामुळे बदलेल्या नात्याचा असतो
आईच्या ओरडण्याचं समजावणं होतं
सासुच्या ओरडण्याचं बोल लावणं होतं....

लेकी सुनेच्या ह्या गोष्टी
रूढींनी आधीच मांडल्या
लेक धान्य पेरत जाते...
अन सून माप ओलांडत येते.

सुरेख वाचनीय आणि विचार करायला भाग पाडणारं...
===============================


 *मैत्रांगण,,*

 *कधी कुणी एकत्र येऊन*
*ग्रुप मैत्रांचा केला स्थापन*
*केले त्याचे नामकरण*
*म्हणती याला मैत्रांगण ।।*

*विविध क्षेत्री रमुनी येती*
*सगळे येथे विश्रांतीला*
*सुख दुःखे ही वाटून घेती*
*आधार देती परस्पराला ।।*

*कुणी टाकतो समर्थवाणी*
*कुणी मराठी हिंदी गाणी*
*कधी गीता अन् कधी कविता*
*तर कधी तुकयाची अभंगवाणी ।।*

*कधी हळहळ तर कधी अभिनंदन*
*स्मृतीदिनी कधी थोरा वंदन*
*कधी किस्से,कधी वार्ता ताजी*
*समजून येते,होते रंजन ।।*

*कधी चालते खेचाखेची*
*कधी शब्दांनी बाचाबाची **
*कुणी कधी बसतो रागावून*
*आणती त्याला प्रेम परतून ।।*

*नकोच ईर्षा नको आगळिक*
*करु कागाळ्या लाडिक लाडिक*
*लगेच पण त्या विसरुन जाऊ*
*एकमेका समजून घेऊ ।।*

*मित्रांची या तऱ्हाच न्यारी*
*कुणी लावती नित्य हजेरी*
*कुणी मधे जाती डोकावून*
*कुणी ठेवती लक्ष दुरुन।।*

*किती किती हे रंग वेगळे*
*प्रत्येकाचे ढंग आगळे*
*या सगळ्यांना सामावून*
 *झुलत राहुदे मैत्रांगण ।।*
*फुलत राहू दे मैत्रांगण ।।*

🌹🌾🌷

कवी अनामिक

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...