Wednesday, August 17, 2022

खरेदी बायकोसंग


 *खरेदी बायकोसंग*
 (हास्यकविता )

बायको संग गेलो
खरेदीला काल..
काय सांगु मित्रहो
झाले माहे हाल..

त्याच असं झालं
सांगतो तुम्हाले गंमत..
ती सांगायले काही
लागते थोडी हिम्मत...

साड्याच्या दुकानात गेल्यावर
मी मुकाट बसलो,
तोंडावरच्या मास्कमुळे
नेमका मी फसलो..

घाईघाईने एक सुंदरी
जवळ माह्या आली,
साडी दाखवायची तीले
भलती घाई झाली...

मले बसली खेटुन, म्हणे
कशी वाटली साडी,
तशी तिनं साडीची
उघडली बा घडी..

दोन तीन साड्याच्या तिनं
मोडल्या मंग घड्या..
माह्या कपाळावर तेवढ्याच 
पडल्या मंग आढ्या..

म्या लगेच मंग
मास्क केला खाली..
मले पाहुन मंग
सुंदरी खजील झाली...

स्वारी स्वारी म्हणे सारी
गफलत अशी झाली..
मँचींग मास्क मुळे
अशी फजीती झाली..

मले वाटलं, म्हणे
आमचे हे च आहेत..
काही काही खरंच
सुंदर पेच आहेत..

त्या दिवसापासून रोज
दुकानात जाऊन बसतो..
घरी आल्यावर मंग
एकटाच मी हसतो.

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...