Wednesday, August 17, 2022

 पाय जपावा

वळण्याआधी
तोल जपावा 
ढळण्याआधी

अन्न जपावे
विटण्या आधी
नाते जपावे
तुटण्याआधी

शब्द जपावा
बोलण्या आधी
अर्थ जपावा
मांडण्याआधी

रंग जपावे
उडण्याआधी
मन जपावे
मोडण्याआधी

वार जपावा
जखमे आधी
अश्रू जपावे
हसण्याआधी

श्वास जपावा 
पळण्याआधी
वस्त्र जपावे
मळण्याआधी

द्रव्य जपावे
सांडण्या आधी
हात जपावे
मागण्याआधी

भेद जपावा
खुलण्याआधी
राग जपावा
भांडणाआधी

जीव जपावा
जळण्याआधी
वेळ जपावी
मरण्याआधी...!
=====================================


निवृत्तांची शाळा
**********
पिंपळाच्या पारावर,
निवृत्तांची शाळा भरे।
    प्रत्येकाच्या दफ्तरांत,
     वेदनेची आंबट बोरे।।
नवी कवळी जुना चष्मा,
ठीकठाक बसत नाही।
     बघणे,घेणे,खाणे,पिणे-
     क्रियापदही सोसत नाही।।
नांवापुरता कर्ता उरे,
कर्मभोग जगणे आले।
      भाषणबाजी बंद आतां-
       वेदनेचे गाणे झाले।।
इतिहासी सनावळीत,
जन्मतारीख आठवत नाही।
       भूगोलाच्या अक्षांशाला,
        भाग्यरेखा छेद देई।।
काळ-काम-वेगामुळे,
पोट धरून हसलो नाही।
       गळकी तोटी फुटकाहौद,
       रिकामाच रुसलो नाही।।
अॉफिसात जाणे नाही,
घरचे तर!(बोलू नका)।
      पारावर जा!बसा!!
      सदान् कदा हाच ठेका।।
धापा टाकीत आलो आहे,
लगेच घंटा बडवूं नका।
       शाळा सुटली म्हणून ही,
        कोरी पाटी फोडू नका।।
दफ्तर उघडून बसतांना,
भगवंताला हात जोडले।
       "तुझं बाबा!बरं आहे,"
      *म्हातारपण तुला कुठले*
---------------------------------------------------------------


 *ही कविता लिहिणाऱ्याला सलाम 🙏🙏*

*कसे आहात ?*
*मजेत !*
*मी ?*
*मी पण मजेत !*

*अरे वा काय कमाल* *आहे ?*
*मी मजेत*
*तुम्ही मजेत*
*मग दुःखी कोण आहे ?* 

*दुःखी ?*
*कुठंय कोण दुःखी ?*
*या एका प्रश्नावर*
*सारी जनता मुकी !*

*दुःख कुणी सांगत नाही*
*हेच मोठं दुःख*
*सुखी मात्र कुणीच नाही* 
*एवढं मात्र पक्क !*

*दुःखाला वाटते*
*हसण्याची भीती*
*रोज सोबत राहून सुद्धा* 
*माणसं राहतात रीती !*

*एकमेकाचा रितेपणा*
*घालवावाच लागेल*
*तरच माणूस चार दिवस*
*मजे मध्ये जगेल !*

*बोलता बोलता हासलं की* 
*डोळ्यात येतं पाणी* 
*मग बघा दुःखाचीही*
*होतात गोड गाणी* 

*कुणाच्याही दुःखाची*
*करू नका टिंगल*
*दुसऱ्याला हासल्यावर*
*कसे होईल मंगल ?*

*आपल्या बद्दल इतरांना*
*विश्वास वाटला पाहिजे*
*"आतलं दुःख सांगताना"*
*आधार वाटला पाहिजे*

*काळजाच्या कपारीतली*
*सल सांगत जावी* 
*वेदना कमी करण्यासाठी* 
*फुंकर घालत जावी* 
 
*मग बघा माणसं कशी* 
*आपसूक जवळ येतात*
*एकमेकाच्या दुःखाला* 
*अलगद कवेत घेतात* 

*इथे मजेत राहण्याचा*
*एकच उपाय आहे*
*मन मोकळं* *करण्यासाठी* 
*आपली माणस हवी आहे!!!*

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...