Friday, August 19, 2022

 जेव्हा भेटते मैत्रीणींची टोळी

बापरे! किती वेड्यासारख्या हसतात
गाल दुखायला लागतात
कारण आता सवयच नसते
असे विनाकारण हसण्याची....१... 

जेव्हा भेटते मैत्रीणींची टोळी
किती मोठ्या- मोठ्याने बोलतात
गोंधळ घालतात अगदी
एकमेकींचे ऐकतात तरी की नाही?
कारण घरात असतात तोंड बंद ठेवून...२... 

जेव्हा भेटते मैत्रीणींची टोळी
एकमेकींच्या वजनावर आणि
दिसण्यावर चर्चा करत रहातात
कारण हल्ली सवडच नसते त्यांना
आरशात शांतपणे पाहण्याची....३... 

जेव्हा भेटते मैत्रीणींची टोळी
किती मन मोकळं बोलतात
पूर्ण अधिकार आणि विश्वासाने
सगळं खुशाल सांगून टाकतात
कारण इतरांना वेळच नसतो
त्यांच्या या सबबी, समस्या ऐकायला...४... 

जेव्हा भेटते मैत्रीणींची टोळी
चेहऱ्यावर विलसते आगळेच तेज
अगदी पिसासारख्या हलक्या होऊन
घरी येतात गाणे गुणगुणत
पाहून त्यांना जळू लागते जग त्यांच्यावर
*खरचं का भेटते मैत्रीणींची टोळी*?🥳🥳
========================================

 आयुष्य झालंय Busy तरी 
नात्यांमध्ये अजूनही 'ओढ 'आहे...

कोणी दाखवत उघड उघड 
काहींचा Silent mode आहे...

बरीच एकटी मनं आज 
Mobile मुळे रमतात....

न भेटताही गप्पांचे अड्डे , 
Whatsapp कट्ट्यावर जमतात..

दूरदेशी गेलेल्या मुलाशी 
'Skype' मुळे chat होतो..

विरहाच्या दुःखाचा 
एक क्षणात Format होतो...

हजारो मैलांची अंतरे, 
एका बटनाने मिटतात,

गणपती,दिवाळीला भेटणारे 
भाऊ -बहीण, 
रोज 'Group' वर भेटतात...

शाळा संपते अन 
मित्र-मैत्रिणींच्या 
आठवणींना पूर येतो....

Facebook वर 
एका search ने 
हाही Problem दूर होतो...

काही समस्या 
Upload करताच, 
Solution सहज 
Download होतं...

कठीण वाटणारं 
आयुष्याचं कोडं 
सहजपणे 'Decode' होतं...

Internet च्या जाळ्यामुळेच 
आपण दूर असूनही 
'Close' आहोत...

भेटू वर्षातून 
एकदा कदाचित 
पण सोबत 'Online' 
रोज आहोत....

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ! ❣️🌹🙏🏻

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...