*कसं आहे ना?*
एक कागदाचं
पान असतं...!!
*'श्री'* लिहलं, की
पूजलं जातं ...
*प्रेमाचे* चार शब्द
लिहले, की
जपलं जातं...
काही *चुकीचं*
आढळलं, की
फाडलं जातं...
एक कागदाचं
पान असतं...!!
कधी त्याला
*विमान* बनवून
भिरकावलं जातं...
कधी *होडी* बनवून
पाण्यात सोडलं जातं...
कधी *भिरभिरं* बनवून
वाऱ्यावर फिरवलं जातं...
आणि कधी तर
*निरुपयोगी* म्हणून
चुरगाळलंही जातं...
एक कागदाचं
पान असतं....!!
जे लेखकाच्या
*लेखणीला* हात देतं...
जे चित्रकाराच्या
*चित्राला* साथ देतं...
जे व्यापाऱ्याच्या
*हिशोबाला* ज्ञात ठेवतं...
आणि हो,
वकीलासोबत *कोर्टात* गेलं,
की *साक्षही* देतं...
एक कागदाचं
पान असतं.....!!
*पेपरवेट* ठेवला, की
एकदम गप्प बसतं...
काढून घेतला, की
*स्वच्छंदी* फिरतं आणि
कशांत अडकलं, तर
*फडफडायला* लागतं...
एक कागदाचं
पान असतं.....!!
ज्यावर बातम्या छापल्या,
की *वर्तमानपत्र* बनतं...
प्रश्न छापले, की
*प्रश्नपत्रिका* बनतं...
विवाहाचं निमंत्रण छापलं,
की *लग्नपत्रिका* बनतं...
तर कधी आदेश~संदेश
लिहले, की तेच *टपालही*
बनतं...
एक कागदाचं
पान असतं....!!
*माणसाच्या* जीवनांत
आणि *त्यांत* खूप
*साम्य* असतं...!! 

एक कागदाचं
पान असतं...!

==========================
मालवणी बोला
मालवणी आयका
मालवणी निजा
मालवणी ऊठा
मालवणीची मजा
मालवणी खाजा
मालवणी माणूस
मालवणचो राजा
मालवणची भाषा
मालवणची शान
मालवणच्या माणसाक
जगभर मान
मालवणी खाणा
नंबराक एक
मालवणी माणसाचो
इरादो नेक
मालवणी गाळ
पायात चाळ
बैलांच्या गळ्यात
घुंगराची माळ
मालवणी माणसाक
देवा तू पाव
मालवणी म्हणता
फटकेक गाव
..........अजित. .........
10 जून 16 12.58 am
======================================
*वारी विठ्ठलाची* 
बातमी ऐकून, चकित झाली
विठ्ठलाकडे धावत , रखुमाई आली
अहो ऐकलं का??, वारी रद्द झाली
कोरोना ची बघा , कुठपर्यंत मजल गेली
दुःखामध्ये पूर्ण , बुडाला आहे वारकरी
इतक्या वर्षांची परंपरा , आता मोडणार खरी
ज्ञाना , तुका , निवृत्ती , नामदेव आणि मुक्ताई
यांना आता कशी , भेटेल बरे विठाई??
ऐकून सारा प्रकार , स्तब्ध विठ्ठल झाला
आणि विचार करून , म्हणाला रखुमाईला
चल या वेळी , आपणच करू वारी
या वर्षी जाईल, देवच भक्ताच्या दारी
ज्ञानाची आळंदी , आणि तुकोबांचे देहू
अजान वृक्ष आणि इंद्रायणी आपणही पाहू
भेटीची माझ्या , त्यांना लागली असेल आस
त्यांच्या साठी मीही, तितकाच व्याकुळ आणि उदास
आषाढी च्या मुहूर्तावर, पोहचू वारकऱ्यांच्या घरी
प्रत्येक वारकऱ्याचे , घरचं होऊ दे पंढरी
********************************************
खूप छान ग्रामीण कविता :-
काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता,
माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता ।।
कशी ऊन्हात, ऊन्हात तळतात माणसं ।
कशी मातीत, मातीत मळतात माणसं ।
कशी खातात जिवाला खस्ता,
माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता ।।1।।
काळ्या बापाचं, बापाचं हिरवं रानं ।
काळ्या माईनं, माईनं पिकवलं सोनं ।
पण त्यांच्या घामाचा भाव लय सस्ता,
माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता ।।2।।
ईथं डब्यात तुला साखर लागतीया गोड ।
तिथं शेतात माझ्या बापाच्या अंगाला फोड ।
पण भाव ठरतो त्याला न पुसता,
माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता ।।3।।
जवा दुष्काळ, दुष्काळ घिरट्या घाली ।
तवा गावाला, गावाला कुणी न वाली ।
कसं सुगीत घालतात गस्ता,
माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता ।।4।।
या भुमिचा, भुमिचा मुळाधिकारी ।
बाप झालाय, झालाय आज भिकारी ।
गाव असुन झालाय फिरस्ता,
माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता ।।5।।
काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता ,
माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता ।।।।।
No comments:
Post a Comment