Friday, August 19, 2022


❤️❣️❤️❣️❤️❣️❤️❣️❤️
तुझ्यासाठी आज फक्त 
पावसाचा शृंगार केलाय.......
इवल्याशा थेंबांचा 
कंबरपट्टा विणलाय ...
टपोऱ्या थेंबांचे 
डूल घातलेत कानात....
मोठ्ठ्या सरीची 
मोहनमाळ घातलीये गळ्यात ....
लवलवणाऱ्या हिरवाईची 
काकणं भरलीत हातात ...
टपटपणारया पागोळ्यांचा 
नाद गुंफलाय घुंगरात....
चमचमणाऱ्या बिजलीची 
चंद्रकोर रेखलीय कपाळावर .....
आणि सावळया मेघांची 
काजळरेषा पापणीवर .....
सप्तरंगी इंद्रधनू 
ल्यायलेय अंगभर ,
वाऱ्याचा सळसळाट  
घुमतोय पदरावर ......
तुला आवडतं ना म्हणून
मातीच्या सुगंधाचं 
अत्तरही माखलंय ...
अन गोजिरवाणं श्रावणफूल 
केसात माळलंय ...............
बघ तरी सख्या ,
तुझ्यासाठी 
आज 
नखशिखांत 
पाऊस 
बनून 
आलेय.............☔💃☔
🌨⛈🌨🌧💦⛈🌨🌧🌦
===================================

जिवंत प्रेतं 

जिवंत प्रेतं असतात
तुमच्या अवतीभोवती
अगदी हाडामासाची 
चालती बोलती
श्वासही घेणारी . 
ती बघत बसतात उघड्या डोळ्यांनी
आजूबाजूचा अन्याय हिंसा अराजकता . 
ती बघतात समोर होणारा खून
खचाखच गर्दी करुन
थरारत नाहीत त्यांच्या जाणिवा
असतात ती प्रेतं म्हणूनच
करतात ती लाइव्ह चित्रिकरण
जिवंत माणसाला 
वाघ खातानाचं , 
लाथा बुक्क्यांनी तुडवल्याचं 
ती बघत बसतात थंड डोळ्यांनी
घरातल्या आजीला मारलं गेल्याचं 
त्यांच्यातलं स्त्री प्रेतही कळवळत नाही
कि तिच्याच हातचा 
काऊ चिऊचा घास खाल्लेला नातू
फोडत नाही हंबरडा ही हिंसा बघून .
त्याचंही केलेलं असतंय का घरच्यांनी
चालतं बोलतं श्वास घेतं प्रेत ?
घरातल्या अशाच एका प्रेताचे 
हातपाय चालतात आणि
होतं ह्याच आजीच्या 
मारझोडीचं चलचित्र
मोबाइलच्या कॅमे-यात बंदिस्त
होते घटना व्हायरल आणि
पेटतात मग जिवंत मनाची माणसं 
का होईना एफबी वर 
तुटून पडतात ह्या 
चालत्या बोलत्या प्रेतांच्या विरोधात
तिथेच डरकाळी फोडत झेपावते
एक रणरागिणी भक्षावर
माळ घातलेली आजी
करत नाही तक्रार 
माळ घालणा-याच्या विरुद्ध 
तिच्या मानेवरचं
समाजाने दिलेलं परंपरांचं भूत 
बसते जपत भळभळत्या मनानं
मग मात्र वर्दीतला माणूसही
दाखवतो पोलिसी खाक्या
आठवते त्याला त्याची माय त्या अबलेत
आणि करतो तो स्वत:च गुन्हा दाखल ! 
आता प्रश्न असा पडतो कि
कोण निर्माण करतात
 अशी ही जिवंत प्रेतं ?
जाती धर्म पंथ ?
 की परंपरांचं जोखड ?
तुमच्या घरात आहे का असं एखादं
तुमच्या देखरेखीत तयार झालेलं 
चालतं बोलतं खातं पितं
श्वास घेतं प्रेत ?

-ज्योती प्रकाश खांबे

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...