*
"खरच आम्ही पण थकलोय हो".......*
*मनोगत एका सिस्टर .चे ...*
*योद्धे म्हणत होतात आजवर,*
*आता शहीद पण होतोय हो....*
*त्राण न उरला देहात आता,*
*खरच आम्ही पण थकलोय हो.......*
*मृत्यू परका ना आम्हा,*
*डोळ्यात डोळे घालून बघतोय ,*
*चिलखत विरल कधीच,*
*नशिब आजमावून लढतोय,*
*उदासीन समाज ,*
*बेफिक्रिने वागतोय,*
*कर्माची फळे मात्र,*
*कोई औरच भोगतोय.....!!!*
*मलई खावून ,*
*कुणी ढेकर देतोय ,*
*सुविधे आभावी,*
*जीवावर जीव जातोय.....!!*
*आज "ती" , उद्या "आम्ही"*
*आणि परवा "तुम्ही" , वाट पाहतोय,*
*गनिम निर्दयी आहे ,*
*कोण जाणे उद्या कोण जातोय .....!!*
*नेता भाऊ दादा,*
*श्रेय आमचं लाटतोय,*
*बिन डोकं लोकांन सोबत काम करत*
*जीव तसाच घुस्मटतोय....!!!*
*ह्यांची होते, रजा, बदली,*
*आमचा बळी जातोय,*
*ह्यांच्या ७ पिढ्या सुखात,*
*आमचा फक्त खेळ होतोय......*
*आठवी नापास*
*"बॉडी का temp चेक कर" म्हणतोय*
*१५ वर्ष घासून झाले,*
*आता ह्यांच्याकडून पुन्हा शिकतोय......!!!*
*मूर्खा चा बाझार सारा,*
*१००० रुपयात मत विकतोय,*
*हॉस्पिटल मध्ये सुविधा नाही*
*म्हणून कॉलर पकडतोय.....!!!*
*ह्या देशात सिस्टर झाले,*
*खरच पश्चाताप होतोय...*
*जीव जाई पर्यंत तरी सुद्धा,*
*एक एक जीव वाचवतोय.....*
*योद्धे म्हणत होतात आजवर,*
*आता शहीद पण होतोय हो....*
*त्राण न उरला देहात आता,*
*खरच आम्ही पण थकलोय हो.......*
No comments:
Post a Comment