Tuesday, August 16, 2022

*नाच नाचुनी अती मी दमले*

*थकले रे नंदलाला*

💥 हे गाणे जेव्हा फारशी समज नव्हती तेव्हा ऐकतांना ..वाटे कोणीतरी नर्तकी नाचून किती दमलेय मी ते सांगतेय कृष्णाला ..मात्र जेव्हा बऱ्यापैकी समज आली ..पुलाखालूनच नव्हे तर पुलावरूनही बरेच पाणी गेले तेव्हा हे गाणे नीट अर्थासहित ऐकले अन हादरलोच ..वाटले ही तर आपलीच व्यथा सांगतेय ..या मोहमायेच्या चक्रात आपणही असेच नाचतोय ..भरकटतोय ..चकवा लागलाय ..

*निलाजरेपण कटीस नेसले,*
*निसुगपणाचा शेला*
*आत्मस्तुतीचे कुंडल कानी,*
 *गर्व जडविला भाला*
*उपभोगाच्या शतकमलांची, कंठी घातली माला*

💥. जनाची नाही तर मनाची तरी हवी म्हणतात ..तसेच झालेय मनाचीही संपलीय ..कोणीही कितीही निंदा ..आमचा एकच धंदा असेच ..सतत स्वतची स्तुती..प्रशंसा..तारीफ ऐकायला आवडतेय आपल्याला ..हा ' स्व ' विरघळून जाण्याऐवजी आपण त्यालाच कुरवाळत बसलोय ..माझ्या इच्छा ..माझ्या आवडी ..माझे आनंद ..खाण्याच्या पदार्थांपासून ते सर्व भौतिक सुखांचा हव्यास ..तोच ध्यास ..

*विषयवासना वाजे वीणा*
, *अतृप्ती दे ताला*
*अनय अनीती नुपूर पायी,*
* *कुसंगती कर ताला*
*लोभ प्रलोभन नाणी फेकी*
* *मजवर आला गेला*

💥. काम , क्रोध , लोभ , मद , मोह , मत्सर हे सारे विकार नेहमी मनात कोणती ना कोणती अभिलाषा उत्पन्न करतात ..त्या भोगांच्या आशेने जीव सुखावतोय..काही न काही हवेच आहे ..' समाधान ' मात्र अजिबात नाही ..या विकारांच्या कुसंगतीत अतृप्ती अजूनच पेटणार ...वेग येणार हव्यासपूर्ती साठी ..

*स्वतःभोवती घेता गिरक्या,*
 *अंधपणा की आला*
*तालाचा मज तोल कळेना,*
 *सादही गोठून गेला*
*अंधारी मी उभी आंधळी,*
 *जीव जीवना भ्याला*

💥. हे असे किती काळ ? मी ..माझे सुख ..माझा आनंद ..माझी मजा ..यातच आयुष्य निघून जाते ..अगदी आयुष्याच्या संध्याकाळी समजते आपण कुठेच पोचलो नाही ..त्याच त्याच ठिकाणी रमतोय ..मनावर निबरपणाचा थर साचतो ..जेव्हा गात्रे थकतात..हाकेच्या अंतरावर मृत्यू वाट पाहतोय असे जाणवते तेव्हा खरी भीती वाटू लागते ..भूतकाळाच्या सावल्या मानगुटीवर बसतात ..वर्तमान धूसर होत जातो तर पुढे अंधार ..छे असे काही होण्यापूर्वी सावरता आले तर किती छान ..

हे विकार..हेवेदावे ..हव्यास ..अट्टाहास..काही काही सोबत येणार नाहीय ..त्याऐवजी जर कोणाशी चार गोड शब्द बोललो ..कोणाला संकटात मदत केली ..कोणाच्या भावना जीवापाड जपल्या ..तर तर ..आधीच सावरता येईल हे नक्की ,,
त्या विध्यात्याने जसे मानवाला विकार दिलेत तसेच मोक्षाचेही ज्ञान दिलेय ..मुक्तीचाही मार्ग दाखवलाय *..आता हे नाचणे बंद करावे हेच खरे !*

*ग.दि . माडगुळकर, सुधीर फडके , आशा भोसले*


 *आपल्याला साष्टांग दंडवत !*

🙏🙏🙏

=================================================
 *||आज मी जसा आहे||*

आज मी जसा आहे
तसाच हो राहीन उद्या
ह्या सुखाच्या सोहळ्यात
गीत मी गाईन उद्या॥

कोण काही बोले त्याची
खंतही नाही मला
मन कसे प्रसन्न हे
दाखवून देईन उद्या॥

भय मुळी मनास ह्या
नाही शिवले आजवरी
याच सत्य जीवनाचे
गीत ते होईल उद्या॥

मी निघालो एकटा
सोबती असो नसो
ध्येयपूर्तीला आता मी
यशाकडे नेईन उद्या॥

पंढरीची वाट धरली
ओढ विठूच्या दर्शनाची
वारकरी मी भागवताचा
पंढरी पाहिन उद्या॥

मी असा अनंत हा
आनंद भोगतो सदा
तोच हर्ष लेकरांस
देऊन जाईन उद्या||

*अनंत केशव देवघरकर*
*(अलिबाग)*
*९४२०६४५७२८*

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...