Tuesday, August 16, 2022


खरेच माझा जगावयाचा विचार होता…

खरेच तो एक जीवघेणा जुगार होता !

तुझा इथेही कसा कळेना, सुगंध आला ?

कसा तुझा तो फुलावयाचा प्रकार होता !

दिसूनही दार तो तिथे थांबलाच नाही,

खरेच दात्याहुनी भिकारी हुशार होता !

अजाणता खोल मी जिथे नेमका बुडालो,

तिथेच कोठेतरी नदीला उतार होता !

अजूनही मी कधीकधी मोहरून जातो…

कितीकिती लाघवी तुझा तो नकार होता !

कुणी न हेलावले, कुणी ढाळले न आसू…

खरोखरी हुंदकाच माझा भिकार होता !

हरेक वेळी तुला दिली दूषणे, जगा, मी,

हरेक वेळी तुझा खुलासा तयार होता !

अखेर गावामधून त्या मी निघून गेलो

तिथे उषेचा प्रकाशही जातवार होता

- सुरेश भट
========================================

*टिंब*

एकदा एक टिंब
इकडे तिकडे हिंडलं
शब्दांच्या बागेत
उगीचच हुंदडलं !!
               नदीचा केला नंदी
               माडीची केली मांडी
               बाबूचा झाला बांबू
               अन् कुडी झाली कुंडी !!
शेडी झाली शेंडी
''अग" झाले अंग
भाडे बनले भांडे
अन् रग बनला रंग !!
                हिंडून हिंडून असे
                पार दमून गेले
                वाक्याच्या शेवटी गेले
                अन् पूर्णविराम बनले !!

एका *टिंबा* ची एवढी *गफलत* झाली, 
की
*मंदिरा* ऐवजी *मदिरा* खुली झाली.
=====================================


 एक दिवस तु मरशील
सर्व जण रडतील
उद्या सर्व हसतील
परवा पोटभर जेवतील
*सांग ना स्वतः साठी*
*तु कधी जगशील...* 

एक दिवस पैसा अडका
स्वतः चा कपडा लत्ता
काजु बदाम भत्ता
इथेच सर्व सोडशील
*सांग ना स्वतः साठी*
*तु कधी जगशील...*

एक दिवस सोन्या चांदीने
भरलेली आलमारी
वातानुकूलित चार चाकी
इथेच सर्व सोडुन जाशील
*सांग ना स्वतः साठी*
*तु कधी जगशील...*

एक दिवस बगीचाने
भरलेली तुझी शेती
धान्याने भरलेली पोती
गळ्यातला सोन्याचा मोती
इथेच सर्व सोडुन जाशील
*सांग ना स्वतः साठी*
*तु कधी जगशील...*

एक दिवस तुझा तो 
आलिशान बंगला
सोन्यासारखी बायको
हिर्‍या सारखे पोरं
सर्व इथेच सोडून जाशील
*सांग ना स्वतः साठी*
*तु कधी जगशील...*

*सांग ना स्वतः साठी*
*तु कधी जगशील...🙏 🙏 🙏*

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...