Tuesday, August 16, 2022

हाक ऐकुनी धावत पहिली येते ना आई?

हाक ऐकुनी धावत पहिली येते ना आई?

तशीच दुर्गा जगन्माऊली धावुनिया येई!

हाकेमध्ये हवी आर्तता,
प्रतिध्वनिच्या आधी पूर्तता!
देवीच्याही ओठातुन मग येते अंगाई!

शक्तीरूप ती शिवासाठीही,
पुढे उभी नि दक्ष पाठीही,
लाख जन्मही गहाण ठेऊन नाही उतराई!

तिची रुपे तर आजुबाजुला,
सबला,अचला,विदुला,विपुला,
आई,भगिनी,पत्नी,वहिनी अनंत नवलाई!

शक्तिपिठाशी झुकतो माथा,
तिची स्तुतीने तरती गाथा,
अवघे जग का झाले काटा,ही होई जाई!

नऊ रात्री का व्हावे वंदन,
युगानुयुगे झिजु दे चंदन,
विट्ठलसुद्धा होई विठाई,ज्ञाना ज्ञानाई!

प्रमोद जोशी. देवगड.9423513604

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...