**********
भूतकाळी कधी कधी
मी मनमुराद हसायचो
भूतकाळी कधी कधी
मी संवाद साधायचो
भूतकाळी कधी कधी
मी स्वप्नेही पहायचो
तो भूतकाळ माझा
कधी न मी विसरायचो ...१
वर्तमानात मी विसरलो
असते कसे हसायचे
अन् विसरलो कुणाशी
कसे संवाद साधायचे
परी एक मात्र मी आहे
आता नक्की ठरवले
नेहमी नाक तोंड बांधून
घरातच बसून रहायचे ...२
नाही कधी कुणातही
निष्कारण मिसळायचे
नाही घरीही कुणाच्या
निष्कारण जायचे
नाही घरी कुणाला
चहालाही बोलवायचे
अन् त्या दूष्ट कोरोनाला
भारतातून हरवायचे





---- अनिल पागनीस .
==================================
*
भावपूर्ण श्रद्धांजली
*

भावपूर्ण श्रद्धांजली
*कुणाकुणाला श्रद्धांजली वाहू।
कुणाकुणाला सांत्वना देवू।।2।।
हात जोडतो देवा तुझ्यासमोर।
आता नको आमचा अंत पाहु।।
रोज एक अनामिक भिती।
आज कोणाचं नाव येईल।।2।।
कोणाची आई, कोणाचे वडील।
न जाने कोणाचा जीव जाईल।।
देवा कुणाचहे पाप तू ।
आमच्या माथी टाकलं।।2।।
ह्या करोनाच्या साथीन।
माणुसकीलाही मारलं।।
एकच आर्जव करतो देवा।
उगार तुझे अजस्त्र बाहु।।2।।
नायनाट कर ह्या महामारीचा।
मग आम्ही करोनालाच श्रद्धांजली वाहू।।
मग आम्ही करोनालाच श्रद्धांजली वाहू।।









====================================
Combination
जेवणा खाण्याचं सांगतो एक -
Combination असतं,
कशाहीबरोबर संगतीला घेऊन -
काही खायचं नसतं.
चुकलं चारचौघात सांगा किती -
वाईट दिसतं,
जेवणा खाण्याचं सांगतो एक -
Combination असतं,
कांदेपोह्याच्या बाजुला फक्कड -
चहाच सजतो,
उपमा तिखट सांज्यावर बारीक शेव -
भुरभुरावा लागतो.
साबुदाणा खिचडी खाताना -
कवड्या दहीच रास्त,
जेवणा खाण्याचं सांगतो एक -
Combination असतं,
डाळीची आमटी, गरम भात जोडीला- बटाट्याची काचरी,
वरणभात लोणकढं तूप अन लिंबाची -
फोड साजरी.
दोघांच्या बदलल्या जागा की जेवणच-
सगळं बिनसतं,
जेवणा खाण्याचं सांगतो एक -
Combination असतं,
लुसलुशीत पुरणपोळी, सोबत -
वाटी दुधाची.
खुसखुशीत गुळपोळीबरोबर, साथ -
रवाळ तुपाची,
गोडाच्या शिऱ्याची सांजोरी साथीला -
आंब्याचं लोणचं मस्त.
जेवणा खाण्याचं सांगतो एक -
Combination असतं,
तिखट तिखट मिसळीसंगती हवा -
बेकरी पाव,
गोडुस स्लाईस ब्रेड बिडला, जराही -
इथे ना वाव.
मिसळ-कांदा-लिंबू, नाकातून पाणी -
वहातं नुसतं
जेवणा खाण्याचं सांगतो एक -
Combination असतं,
थालीपीठ भाजणीचं, ताजं लोणी त्यावर,
असेल कातळी खोबऱ्यांची मग कसा -
घालावा जिभेला आवर.
पंचपकवान्नही यापुढे अगदी -
मिळमिळीत भासतं,
जेवणा खाण्याचं सांगतो एक -
Combination असतं,
भाकरी ज्वारीची टम्म, येऊन ताटात -
पडते,
लसणाची चटणी भुकेला, सणसणून -
चाळवते.
झणझणीत झुणका साथीला शरीर -
होतं सुस्त,
जेवणा खाण्याचं सांगतो एक -
Combination असतं,
आमरसाचा टोप, रसभरली वाटी -
ताटात,
डब्यात चवड पोळ्यांची, सटासट -
पोटी उतरतात.
या दोघांच्या जोडीला मात्र कुणीच -
लागत नसतं,
जेवणा खाण्याचं सांगतो एक -
Combination असतं,
दुरदुरीत नारळाच्या रसातली आमटी -
कोळंबीची,
चुरचुरीत साथीला, तुकडी तळलेली -
बांगड्याची.
वाळवून केलेला भात, स्वर्गसुख -
इथेच उमजतं.
जेवणा खाण्याचं सांगतो एक -
Combination असतं,
कशाहीबरोबर संगतीला घेऊन -
काही खायचं नसतं.
चुकलं चारचौघात सांगा किती -
वाईट दिसतं,
जेवणा खाण्याचं सांगतो एक -
Combination असतं,


****************************************************
कोणत्या भगिनीने ही कविता लिहिली आहे ते माहीत नाही.थोडक्या शब्दात अध्यात्म काय आहे हे छान सांगितले आहे....फार सुंदर
*सोssहम्*
माझे माझे चे गाठोडे
तुझ्या चरणाशी वाहिले
तुझे तुझे म्हणताना
किती मोकळी मी झाले ।।
माझे माझे गणगोत
चिंता सर्वांची वाहिली
तुझे तुझे म्हणताना
गुंतागुंत ती सुटली ।।
माझा माझा रे संसार
करिता आयुष्य हे गेले
तुझे तुझे म्हणताना
मुक्त मनोमनी झाले. ।।
माझी माझी मुलेबाळे
मोह सुटता सुटेना
तुझे तुझे म्हणताना
चिंता काहीच वाटेना ।।
माझे माझे हे वैभव
हाच ध्यास जीवनात
तुझे तुझे म्हणताना
मन झाले हे निवांत ।।
माझे माझे हे चातुर्य
करी सदा रे विवाद
तुझे तुझे म्हणताना
ऐकू येई अंतर्नाद ।।
माझे माझे म्हणताना
मोह माया ताप जाली
तुझे तुझे म्हणताना
लागे ब्रह्मानंदी टाली ।।
माझे माझे मी पण
तुझ्या चरणी वाहिले
तुझे तुझे म्हणताना
तुझ्यातच विलोपले ||



शोभा अर्पण 

श्री स्वामी समर्थ 





श्री स्वामी समर्थ 



=====================================
एका छोट्याशा गावात सर्वजण एकमेकांना ओळखत होते.
ठराविक कालांतराने ते सर्वजण एकमेकांना भेटत.काहीतरी कारण काढून एकत्र येण्यावाचून त्यांना चैन पडत नसे.त्यात छोटी मोठी कुटुंबे,मित्रांचे ग्रुप,काही एकटी माणसे असे सर्वजण होती...
एक मध्यमवयीन एकटा रहाणारा एक माणूस या बैठकांचा नियमित सदस्य होता.
सर्व सामुदायिक कार्यक्रमात त्याचा हिरीरीने सहभाग असायचा.त्याची उपस्थिती सर्वांसाठी आनंददायक असायची...
मात्र काही काळापासून या नियमितपणे कौटुंबिक आणि समूहाच्या सभांना नियमितपणे हजर राहणाऱ्या माणसाने, कोणतीही सूचना न देता भाग घेणे बंद केले...
त्याची वाट पाहून काही आठवड्यांनंतर,गावातील वृद्ध सरपंचाने त्याच्या घरी जाऊन कारण शोधण्याचे ठरवले.
एका हिवाळ्याच्या गारठलेल्या संध्याकाळी सरपंच त्या माणसाच्या घरी गेले...
त्या माणसाने शेकोटी पेटवली होती,आणि थंडीत उब मिळवण्यासाठी तो एकटाच शांतपणे बसला होता...
त्या माणसाने सरपंचाचे स्वागत केले.त्यांच्यात फार काही संवाद झाला नाही,नुसते अभिवादन फक्त...
त्यांच्या मूक संवादापेक्षा शेकोटीत जळणाऱ्या लाकडांचा आवाज जास्त होता .
दोघेही शेकोटीच्या ज्वालेकडे शांतपणे बघत बसले...
काही मिनिटांनंतर सरपंच उठले, त्यांनी त्या शेकोटीमधील एक मोठी लाकडाची जाळणारी फांदी शेकोटीतून बाजूला काढली,आणि परत जागेवर जाऊन बसले.
तो माणूस हे सर्व निर्विकारपणे पहात होता...
थोड्या वेळात त्या बाजूला काढलेल्या लाकडाच्या फांदीतील ज्वाळा कमी झाली.अगदी विझलेल्या अवस्थेत आल्यानंतर ती फांदी अगदी काळी दिसू लागली...
थोड्या वेळापूर्वी प्रकाशमान तेजस्वी असणाऱ्या त्या लाकडात आता काहीही उरले नव्हते.तो एक निर्जीव काळा लाकडाचा तुकडा उरला होता...
अजूनही दोन्ही व्यक्तीमध्ये काहीच संवाद झाला नव्हता .
निघण्याची तयारी करण्यापूर्वी, सरपंचाने तो लाकडाचा निरुपयोगी तुकडा उचलला आणि तो पुन्हा आगीच्या मध्यभागी ठेवला.
ताबडतोब तो लाकडाचा तुकडा पुन्हा जागृत झाला,पुन्हा तो तेजस्वी दिसू लागला.
जेव्हा सरपंच निघणार होते आणि दारात पोहोचला होते,तेव्हा तो माणूस म्हणाला,
‘तुमच्या येण्याबद्दल आणि तुमच्या सुंदर शिकवणीसाठी धन्यवाद.मी लवकरच ग्रुपमध्ये परत येईन'...
*आपल्या जीवनात ग्रुप,समुदाय का महत्वाचा आहे?*
कारण मागे राहिलेला प्रत्येक अविकसित सदस्य बाकीच्या मित्रांकडून उर्जा,तेज घेतो.
ग्रुपच्या सर्व सदस्यांना ते एकत्र उर्जेचा,ज्वालेचा भाग आहेत याची जाणीव असणे हे खूप महत्वाचे आहे
हे लक्षात ठेवणे देखील महत्वाचे आणि धीर देणारे आहे,
*कि आपण सर्वजण एकमेकांची ज्योत तेजस्वी ठेवण्यास जबाबदार आहोत.*
ग्रुप देखील एक कुटूंब आहे...
कधीकधी आपण काही मेसेजेस, भांडणे आणि गैरसमजांनी कंटाळलो तरी हरकत नाही.
*एकमेकांशी संपर्क असणे महत्वाचे आहे...*
आपण येथे भेटण्यासाठी,संदेश देण्यासाठी,शिकण्यासाठी, कल्पनांची देवाणघेवाण करण्यासाठी आहोत आणि आपल्यापैकी कोणीच एकटे नसल्याचे जाणून घेण्यासाठी येथे आहोत.
*चला ज्योत जिवंत ठेवूया.*
No comments:
Post a Comment