काल रात्री वाडीतल्या माडाला वादळ येऊन भेटलं
भेटलं कसलं म्हणता नको तेवढं खेटलं...
शंभर माड झोपवेन असला वादळाचा होरा होता
दहा वादळ झेलीन असला माडाचाही तोरा होता
सोसाट्याच्या वाऱ्यापुढे त्याचा फोक थोडा वाकला
पण छाती पुढे काढून माड पुन्हा उभा ठाकला
वारा त्याला कधी भेलकावत तर कधी वाकवत होता
माड फक्त स्वतः ला तेव्हा एवढंच ऐकवत होता
झेपलं नाही वादळ तर उद्या सागराला कसा चिडवेन
सोसला नाही वारा तर उद्या कल्पवृक्ष कसा म्हणवेन
उध्वस्ततेच्या खुणा ठेवून वादळ जेव्हा शमलं होतं
तेव्हा जेती झुंज देऊन माड पुरतं दमलं होतं
वादळ झेलून वाडीतला माड आज टेचात उभा
आहे
आभाळ कवेत घेण्याचा त्याचा पुढचा मनसुबा आहे
वादळ सोसल्या शिवाय मोठेपण मिळत नाही
माड असो किंवा माणूस असो वादळ कुणा टळत नाही
----प्रशांत जोशी , अंबरनाथ
======================================
कोकण सोडून खय होयत्?
कोरोनाचीच केंड!
मालवण्याक घाबरवणा काय,
बापसाचीच पेंड!
दारु खावन् मरा होतंव,
कारान वायच बदालला!
काय होता कमावला तं,
म्हणनार आता गमावला!
आदीच माणसा दिसतंत खय,
संचारबंदी कसली?
योजना येवंदे खयचिऊ,
कोकणातच फसली!
दोन माणसं एकठय नाय,
काडती खयसून मोर्चे!
जो तो याकच म्हणान् ऱ्हवलो,
आमी आमच्या घरचे!
एक जा दुकान घालीत,
ताच सगळे घालती!
सगळेच मगे एकठय बसान्
खेवशेपणा करती!
जोर काय तो लावीत ईली,
सुनामी नि फयान!
ईली तशी पळान् गेली,
मालवण्यांच्या भयान्!
काजी पडले,कलमा पडली,
कोकणी ताठ उबो!
संद्याकाळी हटकून खायत्
फेल्टवणी नि कोंबो!
आत्महत्या,भीक मागणा,
शिकवल्यान् नाय बापसान!
स्वप्नाच आमची सुंदर केल्यान्
उशयेमदल्या कापसान्!
मरान् आमका न्हेयत नाय,
आमीच मरनाक बोलावतंव!
तेची काय बिशाद लागली,
आमीच तेका झुलवतंव!
छाटण्यो मारण्यात जनम गेलो,
म्हणान् सगळो इस्कोट!
तंबाकू नि चुनो गावल्यार,
उपास सुदा चोकोट!
जोशयांचो पमो.देव्गडातसून..9423513604
No comments:
Post a Comment