नागरीक मी भारत देशाचा
हातात सगळं *आयतं* पाहिजे .....!!
*वीज* कधी वाचवणार नाही
*बील* मात्र *माफ* पाहिजे .....!
*झाड* एकही लावणार नाही
*पाऊस* मात्र चांगला पाहिजे .....!!
*तक्रार* कधी करणार नाही
*कारवाई* मात्र लगेच पाहिजे .....!
*लाचेशिवाय* काम करणार नाही
*भ्रष्टाचाराचा* मात्र *अंत* पाहिजे .....!!
*कचरा* खिडकीतून बाहेर टाकीन
शहरात मात्र *स्वच्छता* पाहिजे .....!
कामात भले *टाईमपास* करीन
दर वर्षी नवा *वेतन आयोग* पाहिजे .....!!
*धर्माच्या* नावाने भले काहीही करीन
देश मात्र *धर्मनिरपेक्ष* पाहिजे .....!
मतदान करताना *जात* पाहीन
म्हणेल, *जातीयता बंद* झाली पाहिजे .....!!
*कर* भरताना पळवाटा शोधीन
*विकास* मात्र जोरात झाला पाहिजे .....!
नागरीक मी भारत देशाचा
हातात सगळं *आयतं* पाहिजे .....!!
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@2
*वो कागज की दौलत ही क्या*
*जो पानी से गल जाये और*
*आग से जल जाये*
*दौलत तो दुआओ की होती हैं*
*न पानी से गलती हैं*
*न आग से जलती हैं...*
*आनंद लूट ले बन्दे,*
*प्रभु की बन्दगी का।*
*ना जाने कब छूट जाये,*
*साथ जिन्दगी का।।*
*"परमात्मा से मेरी एक ही अरदास है..*
*"महंगी घड़ी" सबको दे देना* !
*लेकिन.....*
*"मुश्किल घड़ी" किसी को न देना*
********************************************
*आहे हे असं आहे*....
एखाद्या रात्री कधीतरी
जमा होतात सावल्या,
गरम होतात डोळे नि
तडतडतात बाहुल्या...
मुक्यानेच सांगू लागतं
दुखलेलं पाणी,
“इतकं हळवं चुकूनसुद्धा
असू नये कोणी..."
गाऊ नये कोणी कधी
उदास उदास गाणी,
कळावीत सारी दुःखं
इतकं होऊ नये ज्ञानी...
वाचूच नये मुळात कुठलं
जाडजूड पुस्तक,
विचारांपासून शक्यतो
दूर ठेवावं मस्तक...
जशी नजरेस दिसतात
तशीच पहावीत चित्रं,
जसे आपल्याशी वागतात
तसेच समजावेत मित्र...
उगाच फार खोल आत
नेऊ नये दृष्टी,
खऱ्या समजाव्यात
साऱ्या सुखांताच्या गोष्टी...
पेनाच्या जिभेवरच
सुकू द्यावी शाई,
फार त्रास होईल
असं लिहू नये काही...
हळवं बिळवं करणारे
मुळात जपूच नयेत छंद,
करून घ्यावीत काळोखाची
सगळी दारं बंद...
सायंकाळी एकटं एकटं
फिरू नये दूर,
समुद्रकिनारी लावू नये
आर्त, उत्कट सूर...
चालू नये सहसा फार
ओळखीची वाट,
भेटलंच अगदी कुणी
तर मिळवावेत हात...
जमल्यास चारचौघात
बघावं थोडं मिसळून,
लहान मुलासारखं कधीतरी
भांडावं उसळून...
आवडणार नाही
पंचमीच्या चंद्राची कोर,
एवढंसुद्धा कोणी कधी
होऊ नये थोर...
घट्ट घट्ट बसलेल्याही
सुटतातच गाठी,
कपाळावर म्हणून सारखी
आणू नये आठी...
साकळू देऊ नये फार
खोल खोल रक्त,
कुणापाशीतरी नियमित
होत जावं व्यक्त...
माणसांचं मनास
लावून घेऊ नये फार,
होऊ द्यावा थोडा हलका
त्यांचासुद्धा भार...
तुटून जावीत माणसं
एवढं पाळू नये मौन,
वरचेवर करत जावा
प्रत्येकालाच फोन...
ठेऊ नये जपून
वहीत पिंपळाचं पान,
साध्यासुध्या गोष्टीत
असा गुंतवू नये प्राण...
जमा होत राहील
सारखा पापणीआड थेंब,
इतकंसुद्धा मन लावून
करू नये प्रेम...
श्वास घेणंसुद्धा अगदीच
वाटू लागतं व्यर्थ,
शोधत बसू नये म्हणून
जगण्याचा अर्थ...
वाटलं जर केव्हा
सगळं सगळं आहे शून्य,
आहे हे असं आहे
हे करून घ्यावं मान्य..”
इतकं समजावूनसुद्धा
जमा होतात सावल्या,
गच्च गच्च होतात डोळे,
थरथरतात बाहुल्या...
आतून आतून सगळ्याचीच
मग येत राहते चीड,
दिवस जितका सुटसुटीत
तितकीच रात्र गिचमीड...!
&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&
आता मला जमायला लागलय*
आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर
जे जे मला दुखवत गेले
त्या त्या सगळ्यांना
न दुखावता सोडून देणं
*आता मला जमायला लागलयं.*
संघर्षाच्या किंवा वादविवादाच्या क्षणी
वाद न घालता तेथून दूर
निघून जाण्यातंच खरी परिपक्वता असते
*हे ही समजायला लागलय.*
माझ्या बरोबर घडणाऱ्या
अनेक वाईट गोष्टींचा
उहापोह करून त्यात
शक्ती खर्ची घालून
आजूबाजूला जे जे उत्तम आहे त्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोनच बदलून जातेय
*हे ही जाणवायला लागलयं.*
आलेल्या अनुभवांतून बाहेर पडत
स्वतःला सावरून,
इतरांना आनंदी करणे
*मला आता जमायला लागलय.*
कोणत्याही न पटणाऱ्या गोष्टींवर
काहीही न बोलणे म्हणजे
त्यांना संमती असणे, गरजेचे नाही,
कधी-कधी काहीही न बोलणं
किंवा कोणतही प्रत्युत्तर न देणं
खूप काही बोलून जातं
आणि सांगूनही जातं.
*हे ही कळायला लागलंय .*
आपण लोकांवर किंवा
त्यांच्या विचारांवर
बंधन आणू शकत नाही
पण स्वतः च्या मनावर मात्र
बांध घालू शकतो.
आपण अशा लोकांचे वागणे
किती मनावर घ्यायचे,
त्यांना किती महत्व द्यायचं,
त्यांनी बोललेल्या गोष्टी
किती डोक्यात साठवायच्या
आणि स्वतःचे आयुष्य
खराब करून घ्यायचं का
हे ठरवणं गरजेच असतं
*हे ही कळायला लागलयं.*
कधी कधी परिस्थितीला
आहे तसच सोडून देणं
आणि शांत राहणं सोईच ठरतं
लोकांना कुठल्याही गोष्टीचं
स्पष्टीकरण देत बसणं
आणि त्यांनी तुम्हाला
समजून घेण्याची अपेक्षा करणं
बावळटपणाचं आहे हे कळल्यावर
मी आता मला ,
*त्या दृष्टीने घडवायला लागलयं*
मी इतके दिवस ज्याचा
प्रकर्षाने शोध घेत होते
ती मन:शांती,समाधान
मला मिळालं तेव्हा ठरवलं
की, मी अशा लोकांपासून
लांब राहावे.
ज्यांच्या दृष्टीने मी चांगली नाही
अन् मला स्वतःला
त्यांच्या साच्यात बसवणं
शक्य नाही.
त्यांच्यापासून अंतर ठेवणं
*आता मला जमायला लागलयं*
सतत वादविवाद वा
भावना नसलेले संबंध
मनाला त्रास देतात.
तोंडावर गोड बोलून
मागे वाईट वागणाऱ्या,
वरवर संबंध ठेवणाऱ्या लोकांना
आता मी कटाक्षाने
दूर ठेवायला हवं.
*हे पटायला लागलयं*
माझ्या स्वतःच्या आनंदाचा
ठेवा मला सापडलायं,
आणि उशीरा का होईना
पण मी आता त्या वाटेवर
समाधानानं पावलं टाकायला लागलय.
त्या वाटेवर स्थिर राहणं,
*आता मला जमायला लागलयं*
No comments:
Post a Comment