Wednesday, August 17, 2022

 वडिलोपार्जित प्रॉपर्टीवर *

* ठेऊ नका डोळा *
* एकत्र या गोड बोला *
* मार्ग निघतील सोळा *

* नाते संबंध बिघडण्याचे *
* हे एक मुख्य कारण *
* आपल्याच माणसाचं *
* करू नये वस्त्रहरण *

* योग्य वाटे केल्यामुळे *
* नाते टिकून राहातील *
* कार्य प्रसंगी बहीण-भाऊ *
* जवळ जवळ येतील *

* दुःख , चिंता आणि क्लेश *
* नक्की होतील कमी *
* आरोग्य उत्तम रहाण्याची *
* थोडी फार हमी *

* येणे जाणे खुंटले की *
* माणूस विचार करतो *
* म्हणून तर आपला बी.पी.*
* खाली वर होतो *

* डॉक्टर देतात गोळ्या *
* पण विचार कसे जातील..? *
* E C G मधल्या रेषा *
* कशा पाहिजे तशा येतील ..? *

* त्यातून पुढे छातीत कळ *
* किंवा पॅरालिसिस *
* उगी कशाला चान्स देता *
* शुगर नावाच्या घुशीस *

* पैसा अडका प्लॉट शेती *
* करता कशासाठी *
* एक किंवा दोन लेकरं *
* प्रत्येकाच्या पोटी *

* प्रॉपर्टीच्या कागदापेक्षा *
* माणसं करावीत गोळा *
* नाती-गोती जपून ठेवावी *
* करूने चोळामोळा *

* क्वालिफाईड ,गडगंज *
* झालात म्हणे तुम्ही * 
* पुतणे ,भाच्चे सोडून देऊन *
* करता टॉमी- जिमी *

* कुत्रं प्रामाणिक असलं तरी *
* बोलता येत नसतं *
* मन हलकं करण्यासाठी *
* जिवंत माणूस लागतं*

* रिलेशन जपल्यामुळे *
* गोळ्या होतील कमी *
* दीर्घ आयुष्य मिळण्याची *
* ती एक हमी *

* भावाकडे जात जा *
* आणि बहिणालाही बोलवा *
* वहिनीला मान देऊन *
* साऱ्यांची मनं फुलवा *

* अरे वेड्या याच्यामुळेच *
* नेहमी राहशील फिट *
* जगण्याचा तुला कधीच *
* येणार नाही वीट *
🌹 🌹

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

एक सुंदर कविता ...

असाच एक दिवस 
मनासारखा पार पडला  
जरा कुठे टेकतो तोच 
देव उभा राहिला 
म्हणाला केंव्हा पासुन 
लक्ष्य आहे तुझ्यावर 
फार मेहनत घेतोस  
तु तुझ्या कामावर

मी आज तुझ्यावर 
प्रसन्न झालो आहे 
बोल काय आशीर्वाद 
तुला हवा आहे 
देवाला म्हणालो काय ते 
तुच समजुन देऊन टाक 
देव म्हणाला वेड्या
मनात असेल ते मागुन टाक 

विचार करून सांगेन म्हटले  
तर त्याला घाई होती 
दुस-या दिवशी बोलावून येईल
याची मला खात्री नव्हती 

विचार केला आणि म्हटले 
एक blank आशीर्वाद दे 
जेंव्हा इच्छा होईल तेंव्हा 
कॅश करायची सोय करून दे 

तेंव्हा पासुन खिशात एक 
कोरा आशीर्वाद घेऊन फिरतो आहे
सगळं व्यवस्थित दिलंय देवाने 
आणखी काय मागु 
असा विचार करतो आहे
 🙏
=======================================

 *कधीकधी केराचा डबाही,*
*मला मनापेक्षा बरा वाटतो.*
*दिवसातून एकदा का होईना,*
*निदान तो रिकामा तरी होतो..*

*आपण मात्र मनात किती,*
*दुःखद आठवणी साठवतो.*
*काय मिळवतो यातून आपण?*
*स्वतःचे दुःखच नुसते वाढवतो..*

*घडून गेलेल्या वाईट गोष्टी,*
*वर्षानुवर्षे मनात ठेवतो.*
*त्या घडल्या ज्यांच्यामुळे,*
*त्यांचा पुढे तिरस्कार करतो..*

*केराच्या डब्यासारखच आता,*
*रोज मनही साफ करायचं.*
*विसरून जुने दुःख सारे,*
*नव्या आनंदाने ते भरायचं..*

*सुखी जीवनाचे तंत्र आता,*
*आपण सर्वांनीच शिकायचं.*
*स्वतः आनंदी रहायचं आणि,*
*दुसर्‍यांना नाही दुखवायचं..*


🙏🏻 *मन साफ सब माफ* 🙏🏻
🌞 *शुभ सकाळ* 🌞
=========================================

कोरोना डायरीज
------------------------

चार भिंतीत कोंडून घेतलं
बंद केल्या दाही दिशा
उंब-यावरती आखून घेतली
ठळक ठळक लक्ष्मणरेषा

तरी घरी काही न काही
सतत म्हणून संपत असतं
करायला घ्यावं तेव्हा कळतं
नेमकं तेवढंच घरी नसतं

मास्क ग्लोवज् केसही झाकून
झोकात जेव्हा उतरावं खाली
कळेना मला, तेव्हाच नेमकी 
खाज यावी का नाकाखाली

आपल्याच घरी परतून येता
आपलीच आपल्याला येते कीव
स्मशानातून आल्यासारखी
पाळावी लागते शिवाशिव

आपल्यासाठीच होतं परकं
आपल्याचं घराचं उघडं दार
डेटॉल सॅव्हलॉन सॅनिटायझर
किती करायचे सोपस्कार

आणलं सामान धुताना
मनात इतकं भय असतं
प्रश्न पडतो -नसतंच आणलं
अडलं तरी काय असतं

>> तरी आपण बुवा काळजी घेतोच !....

दुधाच्या पिशवीचा कोपरा कोपरा 
सतरांदा मी धुवून घेते
पातेल्यात पडल्यावर दूधही चक्क
आंघोळ झाल्यागत मिरवून घेते

कोथिंबीरीची काडी काडी 
नळाखाली विसळताना
कितीदा पाहिलंय बिचारीचं
हाड न् हाड निखळताना

मिरच्यांच्या तर कितीदा तरी 
नाकातोंडात शिरलंय पाणी
पाण्यातच त्या तोंड लपवत 
डोळे पुसत होतं कोणी

काकडी गाजर बीट मुळा
खसाखसा घासलं जातं
मळकं आलं- चोळून चोळून
उभं आडवं तासलं जातं

पालेभाजीची प्रत्येक जुडी
चारदा तरी बुचकळते..
वॉशिंग मशिनची वॉशिंग ट्रीक
तीन महिन्यानंतर कळते

>>बरं तसं स्वत:लाही आम्ही असे
सोडत नाही हां ..............!

रिकामपोटी आर्सिनीक घेत
आयुषमंत्रालयावर वाचत पाढा
हळदीचं दूध, गरम पाणी
उकळून निम्मा केला काढा

बी विटॅमीन-सी विटॅमिन
च्यवनप्राशही साक्ष आहे
काहीच बाकी ठेवलं नाही
रामदेवबाबांवरही लक्ष आहे

>>पण तरी टेन्शन असतंच, नुसत्या कोरोनाचंच आहे, असंही नाही ना.........

भविष्याच्या विचाराने
सारी स्वप्नं मोडल्यावर
झोप येईना, थकून भागून
अंथरूणात पडल्यावर

पण पुढच्याच क्षणी....... 
तिरमिरत उठते, मनात म्हणते
निराश हताश होतंय कोण
कोरोना हरवायला हवा म्हणे
सकारात्मक दृष्टीकोन

कवितांचे व्हिडिओ-झुम ड्युओ
मनाला ठेवत राहते व्यस्त
कोरोनाने मला हरवावं-
इतकं नसावंच आपण स्वस्त

पण थकले रे कोरोन्या आता
अजून किती दिवस ? -सांग
बोटं मोडत म्हणते मग
त्या चिन्यांच्या नानाची टांग !!!

- अनुराधा म्हापणकर

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...